-प्रज्ञा शिदोरे
दुस-याच्या घरात काय सुरू आहे यात रस असलेली आपण माणसं. त्यामुळे आपल्या शेजारी काय चाललंय हे बघण्यासाठी आपण उत्सुक. तेच मोठमोठ्या अवकाश यांनांसंदर्भातही होतं. त्यामुळेच सुरुवातीच्या काळात अवकाश सफरी आणि अंतराळ अभ्यासात पृथ्वीच दुर्लक्षित होती.अमेरिकेची नासा म्हणजेच अंतराळ अभ्यास करणारी संस्था यापेक्षा जरा वेगळा विचार करत होती. पृथ्वीविषयी ज्ञान गोळा करण्यासाठी त्यांनी लँडसॅट कार्यक्रम तयार केला. या कार्यक्र मांतर्गत अनेक उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आले. पृथ्वीच्या पल्याड बघण्यासाठी नाही तर पृथीवर नजर ठेवण्यासाठी! याआधी काही अवकाश कार्यक्र मांमध्ये हे काम होत होतंच, नाही असं नाही. पण त्याचा उपयोग जास्त करून मिलिटरी एजन्सीज करून घेत. ते काम होतं अतिरेकी कारवायांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी. पण लँडसॅटमध्ये कोणत्याही प्रकारची हेरगिरी करण्याचा उद्देश नव्हता. उद्देश होता तो मानवजातीने पृथ्वीवर कशा प्रकारचे आणि किती प्रमाणात बदल केले आहेत तो पाहण्याचा. साधारण दोन पिढ्यांनंतर, आठ उपग्रहांच्या मदतीने आणि कोट्यवधी छायाचित्रांच्या मदतीने आपल्याला आपल्या ग्रहाबद्दल खूप महत्त्वाची माहिती मिळाली आहे. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पृथ्वीवर गेल्या काही वर्षांमध्ये कसे बदल केले आहेत याची झलक आपल्याला बघायला मिळते.काही दशकांपूर्वी सौदी अरेबिया हा म्हणजे एक विशाल वाळवंटाचा भाग होता. दुबई, आज जिथे उभं आहे तिथे काही वर्षांपर्यंत फक्त आणि फक्त वाळू असायची. सौदीच्या काही ठिकाणी आता शेतीही होते. या चित्रांमधून अगदी आश्चर्य वाटावं असंच चित्र आपल्याला बघायला मिळतं. कारण तिथे आता आहे काही ठिकाणी शेतीदेखील होते. म्हणजे वाळवंटामध्ये माणसाच्या बुद्धीने फुललेलं छोटं नंदनवनच ते. इथे जशी आपल्याला ही चांगली बातमी कळते तशी या टाइम लॅप्स फोटोग्राफीमधून एक दु:खद घटनाही दिसते. ते म्हणजे अलास्कामधले हिमनग. छायाचित्रांमधून जसे आपल्याला हे हिमनग कमी झालेले दिसतात त्याच प्रकारे अॅमेझॉनचे जंगलदेखील मोठ्या प्रमाणात कमी झालेले दिसते.ही छायाचित्रे आपल्याला आपल्या नशिबात एकमेव असलेल्या अशा पृथ्वीची थोडी चांगली थोडी वाईट कहाणी सांगतात. या गोष्टींमधून आपल्याला आपली पृथ्वी नक्कीच काहीतरी सांगते आहे. आपल्याला हे ऐकायला वेळ आहे का? पण हा वेळ आपल्याला काढायला लागणार, नाहीतर मग वेळ निघून गेलेली असेल.त्यासाठीच वाचा- http://world.time.com/timelapse/Time lapsपृथ्वी वाचवायची कशी?आपलं पर्यावरण धोक्यात आहे ही काही नवीन गोष्ट नाही. मानवाच्या शास्त्रीय प्रगतीमुळे ही वेळ ओढवली आहे हेही तितकंच खरं. पण पर्यावरण हा-साला आपणच कारणीभूत आहोत हे आता माणसाच्या लक्षात येतंय हे काय कमी आहे.जोहन रॉकस्टॉर्म हा ‘शाश्वत विकास’ म्हणजे नक्की काय आणि तो गाठण्यासाठी आपल्याला काय करायला हवं या विषयावर काम करतो. आणि त्याचं असंच काहीसं म्हणणं आहे. तो म्हणतो की सध्याचे हे वातावरणाचे बदल हे इतके मोठे आहेत आणि याचा परिणामही इतका मोठ्या प्रमाणावर होतो की माणसाला त्वरित आपल्या जीवनशैलीत सुधारणा करावी लागेल.त्याने टेड टॉकमध्ये मस्त कल्पना लढवली आहे.तो म्हणतो की, वातावरणातले बदल आणि ते थांबविण्यासाठी आपण काय केलं पाहिजे या चर्चेमध्ये जी सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती असली पाहिजे ती पृथ्वी आपण कधी मध्ये आणत नाही. पण तिच्या अवतीभोवती आपली शास्त्रीय माहिती झाडत बसलो असतो. तो म्हणतो की, या पृथ्वीवर असणारं वातावरणच आपली ही विकासाची दिशा यापुढे ठरवेल. त्यामुळे पृथ्वी वाचवायची असेल तर कोणता पर्याय स्वीकारायचा असा प्रश्न असेल तर कृपया आपण पृथ्वीकडे डोळसपणे बघा!हे डोळसपणे म्हणजे कसं बघायचं? पृथ्वीला कसं ओळखायचं हे हा शास्त्रज्ञ आपल्याला सांगतो. मानवजातीने पृथ्वीवर जरासा जास्तीच भर टाकला आहे हे तर आपण अनेक ठिकाणी वाचत आणि ऐकत असतोच. पण जोहन रॉकस्टॉर्मसारखा शास्त्रज्ञ आपल्याला या गोष्टीची शास्त्रोक्त पद्धतीने जाणीव करून देतो. त्याच्या अभ्यासामुळे त्याच्या नऊ गोष्टी लक्षात आल्या आहेत, की ज्या आपण केल्या तर आपल्याला आपल्या एकमेव घराचं रक्षण करता येईल.तेव्हा हा टेड टॉक नक्की बघा, आणि आपल्या पृथ्वीला समजून घ्या!!‘लेट दि एन्व्हायर्नमेंट गाइड अवर डेव्हलपमेण्ट’ हे याचं नाव आहे!पाहा-https://www.ted.com/talks/johan_rockstrom_let_the_environment_gui