धनश्री संखे (ब्युटी एक्सपर्ट) - दिवाळीत आपण एकदम झागरमागर कपडे घालणार, खास ट्रॅडिशनल, ब्राईट कलरचे तेही संध्याकाळी.पण मेकअपचं काय?अनेकजण तर इतके ऐनवेळेस तयार होतात की, तोंडाला नुस्ती पावडर चोपडतात आणि परफ्यूम मारतात, झालं काम! असं करू नका. दिवाळीत मिनिमम मेकअप करावा, फार काही रंगरंगोटी करू नये हे खरं कारण कपडेच आपण खूप सुंदर घातलेले असतात. मात्र तरीही ‘खासमखास’ दिसण्यासाठी काही गोष्टी नक्की करताच येतील.१) मेकअप मिनिमम. मात्र मुलींनी कानात मोठे झुमके किंवा कानातले घालावेत त्यानं सेलिब्रेशन लूक परफेक्ट दिसतो.२) मेकअप लावण्यापूर्वी चेहर्याला टोनर लावा. त्यानं मेकअप जास्त काळ टिकतो. आय प्रायमर आणि फेस प्रायमर वापरायलाही हरकत नाही.३) तुमच्या स्कीन टोनपेक्षा लायटर टोनचं फाउंडेशन किंवा कन्सिलर वापरा.४) डोळ्यांना आयलायनर लावा. मस्कारा वापरा. कलर काजळही वापरायला हरकत नाही. मोरपंखी, हिरवा, निळसर करडा, पर्पल पिंक या रंगाच्या काजळ पेन्सिल ग्लॅम लूक देतील.५) लिपस्टिक लावताना एक नियम लक्षात ठेवा. दिवसा टॅँगी रंग वापरा. क्रिमी शेड्स संध्याकाळी वापरा. लिप ग्लॉस वापरा. सिल्व्हर, ब्रॉन्झ, मेटॅलिक गोल्ड कलरचे ग्लॉस तुम्हाला एक कम्प्लिट लूक देतील.६) सगळ्यात शेवटचं, पण महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गालांना हायलाईट करायला विसरू नका. ऑयली स्किन असेल तर मॅट ब्रश आणि ड्राय स्किन असेल तर क्रिमी ब्रश वापरा. तुमचा ग्लॅम दिवाली लूक तयार!
Glam दिवाळी Look कसा मिळवाल ?
By admin | Published: October 16, 2014 6:34 PM