- निशांत वानखेडे
आताचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे, हे नव्याने सांगायला नको. जो तंत्रस्नेही असेल तोच या काळात टिकेल, असे म्हणणो अतिशयोक्ती ठरणार नाही. कोरोनाने ही वेळ थोडी लवकर आणली, हे नक्की. पण मग जंगल-पहाडात, दुर्गम भागात राहणारा आदिवासी तरु ण या तंत्रज्ञानाच्या युगात पुन्हा मागे पडेल का? - हा प्रश्न आहेच.गेल्या कित्येक पिढय़ा दुर्गम भागात जगणा:या आदिवासी समाजाच्या नव्या पिढीतील तरुणाला आता कुठे शहरी धावपळीची ओळख होऊ लागली आहे. डिजिटल जगाची ओळख सांगणारे स्मार्टफोन आता कुठे त्यातील थोडय़ांच्या हातात पोहोचायला लागले आहेत. अशात वेगाने बदलणा:या घडामोडी त्यांच्या हातातून निसटतात की काय, असे वाटणारच. बदलत्या परिस्थितीत डिजिटल साहित्य हे रोजगाराचे महत्त्वाचं माध्यम झालं असताना ही साधनं आदिवासी तारुण्याशीही जोडली गेली पाहिजेत, ते गरजेचं आहे.त्यासाठीच केंद्र सरकारच्या आदिवासी कल्याण मंत्रलयाकडून एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याला ‘फेसबुक’ची जोड मिळाली आहे. ‘गोइंग ऑनलाइन अॅज लीडर’ अर्थात ‘गोल’ असं या कार्यक्र माचं नाव आहे.या कार्यक्रमातून शासनाचा नेमका ‘गोल’ काय आहे, याविषयी प्रा. डॉ. केशव वाळके यांच्याकडून माहिती जाणून घेतली. डॉ. केशव वाळके हे मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत. केंद्र शासनाच्या या उपक्रमाविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आदिवासी तरुणांना सहभागी करण्यासाठी स्वत:हून ‘गोल’चा प्रचार करणं सुरूकेलं. 60- 70आदिवासी तरुणांची या उपक्रमासाठी नोंद केली असून, 31 जुलैर्पयत 2क्क् तरु णांना यात सहभागी करून घेण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘गोल’ नेमकं काय आहे?ग्रामीण आदिवासी तरुणांना डिजिटल साक्षर करणो, तंत्रस्नेही बनविणो आणि त्या माध्यमातून विविध क्षेत्रतील रोजगाराचे, नेतृत्वगुण विकसित करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहेत.फेसबुकच्या सहकार्याने केंद्रीय आदिवासी मंत्रलयाद्वारे हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. देशातील पाच हजार आदिवासी युवकांना डिजिटली प्रशिक्षित करण्याचं या उपक्रमाचं लक्ष्य आहे.हा संपूर्ण उपक्रम ऑनलाइन चालणार आहे. आदिवासी तरुणांना ऑनलाइन नोंदणी करायची आहे. नोंदणीनंतर निवडलेल्या तरुणांना सात महिने ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मार्गदर्शनासाठी देशातील 25क्क् मेंटारची नियुक्ती करण्यात येत आहे. हे मेंटार कृषीपासून उद्योग क्षेत्र, समाजकारण ते राजकारण आणि आयटीआयपासून आयटीपर्यंतच्या क्षेत्रचे जाणकार असतील. एक मेंटार (प्रेरक) दोन आदिवासी युवकांना त्यांनी निवडलेल्या विषयावर मार्गदर्शन करेल. हे मेंटार प्रत्येक आठवडय़ाला दोन तास मार्गदर्शन करतील. म्हणजे महिन्यात आठ तास आणि सात महिन्यात 52 तासांचे प्रशिक्षण होईल. यात महत्त्वाची म्हणजे ज्या आदिवासी तरुणाकडे स्मार्टफोन नाही त्यांना फेसबुककडून स्मार्ट फोन आणि वर्षभरासाठी इंटरनेटची व्यवस्था मोफत दिली जाणार आहे.सात महिन्याचे प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांनी निवडलेल्या क्षेत्रतील कंपनी, एखादी संस्था किंवा इतर ठिकाणी दोन महिने इंटर्नशिप (आंतरवासिता) करण्याची संधी प्रशिक्षणार्थी तरुणांना मिळेल. 18 ते 35 वयोगटातील कोणताही तरुण ‘गोल’च्या प्रशिक्षणात सहभागी होऊ शकेल. त्यासाठी शिक्षणाची कुठलीही अट नाही. चौथा-पाचवा वर्ग शिकलेला तरुणही या कार्यक्रमाद्वारे प्रशिक्षण घेऊ शकतो. प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र, औद्योगिक भेट आणि अन्य गोष्टींचा लाभ दिला जाणार आहे.डॉ. केशव वाळके यांच्या मते, ‘गोल’ उपक्रमातून विविध विषयाचे मार्गदर्शन देण्यात येणार आहे. आजही अनेक आदिवासी तरु णांचे शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन आहे. मात्र या कृषिक्षेत्रतही नवीन काही शिकण्याची संधी गोलमध्ये मिळेल. ज्यांना उद्योग करण्याची इच्छा असलेल्यांसाठी स्टार्टअपचे मार्गदर्शन. कृषी, शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, राजकारण अशा आदिवासी तरुणांनी निवडलेल्या कोणत्याही विषयाचे मेंटारद्वारे मार्गदर्शन मिळेल आणि इंटर्नशिप करण्याची संधी त्यांना मिळेल. त्यानंतर एकतर ते स्वत: काही करतील किंवा सोबतच्या इतर तरुणांना मार्गदर्शन करतील. त्यांच्यात लीडरशिपच्या क्वालिटी निर्माण होतील.अर्थात दुर्गम भागात इंटरनेट कव्हरेज मिळेल काय, मेंटारशी त्यांचा संवाद नियमित होईल काय, या प्रशिक्षणाचा तरुणांना लाभ होईल का, असे प्रश्न आजही आहेत; पण एका नव्या उपक्रमाची सुरुवात होते आहे, त्याला यश लाभलं तर उत्तमच आहे.अधिक माहितीसाठी ही साइट पहा.https://goal.tribal.gov.in/(निशांत लोकमतच्या नागपूर आवृत्तीत वार्ताहर आहे.)