Wanting to be someone else is a waste of the person you are..- मर्लिन मन्रोचंजगप्रसिद्ध वाक्य आहे..ती म्हणते,दुसºया कुणासारखंतरी होण्याचा प्रयत्न करणंम्हणजे आपण स्वत:लावाया घालवण्यासारखं आहे..असं वाया घालवतो काआपण स्वत:ला?- नाही म्हणतो आपण.पण ते खोटं असतं.जगात आपल्यालाअनेक माणसं आवडतात,पण त्या आवडत्यामाणसांच्या यादीत स्वत:चं नाव सहसा नसतंच.अगदी प्रामाणिकपणे सांगा,जब वी मेट मधली गीत कशी दिलखुलासपणे सांगते,मै अपनी फेवरिट हूं!तसं आपण म्हणतो स्वत:विषयी?म्हणणं सोडा, असं वाटतं आपल्याला स्वत:विषयी!नाही वाटत,कारण आपण नसतोच स्वत:चे फेवरिट.बहुतेकांचं तर आयुष्यातसगळ्यात मोठं भांडण स्वत:शीच असतं..सगळ्यात मोठा शत्रू कोण?तर स्वत:च.सगळ्यात जास्त राग कोणाचा येतो?तर स्वत:चाच?बदलवून टाकावंसं वाटतं स्वत:लाअगदी पायाच्या नखापासूनडोक्यावरच्या केसांपर्यंतकाहीच आवडत नाही..एवढंच कशाला, स्वत:चं रंगरूप आवडत नाहीदात आवडत नाहीत, नाक आवडत नाही,वजन आवडत नाही ते ठीक..पण स्वत:चं गाव, आडनाव,आईवडील, त्यांचं साधंभोळं असणं,आपली आर्थिक परिस्थितीकाही काहीच आवडत नाही..आणि यासगळ्याशी युद्ध पुकारल्यागत जगणं सुरू होतं..ज्याच्यावर प्रेमच नाही,त्याला बदलवायला निघतो आपण?स्वीकारलंच नाही स्वत:ला आधी,तर चांगले बदल तरी कसे होणार स्वत:त?कसं आपण मायेनं कमी करणार स्वत:चं वजन,जो चेहराच आवडत नाही,तो गोºया होण्याच्या क्रीम चोपडूनथोडाच आवडणार आहे?नाहीच आवडत?मग म्हणायला आपण म्हणतो की,मी फार प्रेम करतो इतरांवर,पण लोक माझ्याशी चुकीचं वागतात..ज्याचं स्वत:वर प्रेम नाही,ज्याच्याकडे प्रेम ही भावनाच नाहीतो इतरांना ते कसं देणार?म्हणून या दिवाळीत,डोक्यातली ही जळमटं काढून टाकू,स्वत:वर प्रेम करायला लागू..आणि मग म्हणू की,प्यार बांटनेसे बढता है..
मै अपनी फेवरिट हूं..या दिवाळीत, डोक्यातली जुनाट जळमटं काढू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 5:00 AM