शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
2
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
3
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
4
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
5
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
6
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
7
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
8
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
9
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
10
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
11
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
12
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
13
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
14
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
15
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
16
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
17
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
18
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
19
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
20
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 

मीच माझी मैत्रीण झाले...

By admin | Published: June 25, 2016 5:43 PM

काय लिहू? ज्या मुलीनं बोर्डात यावं, इंजिनिअरिंग करावं, खूप शिकावं असं आईबाबांना वाटत होतं.. ती मी?

- मैथिली जोशी
काय लिहू? ज्या मुलीनं बोर्डात यावं, इंजिनिअरिंग करावं, खूप शिकावं असं आईबाबांना वाटत होतं..
ती मी?
प्रेमात पडले. हरवून गेले त्याच्यात? इतकी की माझी स्वत:चीच ओळख विसरले. माझं ना काही ध्येय उरलं, ना करिअर करायची इच्छा ना कसलं जगाचं भान?
मी खरंच प्रेमात पडले होते?
हा प्रश्न विचारतेय मी आज स्वत:ला?
खरंच प्रेम होतं ते?
की फक्त सवय. त्याची सवय. सोबत असण्याची. आपलं कुणीतरी आहे या फसव्या भावनेची..
आज वाटतं प्रेम कसलं, ती सवय होती, मनाला झालेली कुणावर तरी अवलंबून राहण्याची सवय.
आणि त्या सवयीलाच प्रेम समजण्याची घोडचूक करत मी त्याच्यामागे वाहवत गेले.
तो म्हणाला तसं वागले, तशी बोलू लागले. तसे कपडे घालू लागले. त्याच्या नजरेनंच जग पाहू लागले..
आणि मग एकदिवस तू फार टिपीकल आहेस,बोअर आहेस म्हणत तो मला सोडून निघून गेला..
मी खूप रडले. किती दिवस रडले. घरच्यांनी समजून घेतलं. साथ दिली. मानसोपचारही करवले.
पण मी मात्र मला सापडत नव्हते. एक दिवस माझ्या डोक्यावरुन हात फिरवत माझी आज मला म्हणाली, ‘ मिथी, अगं कुणावाचून कुणाचं काही राहत नसतं. आपण आपल्यात नसलो तर आपल्याला दुसरा कुणी का मोजेल? तुझ्यासारखी तूच उरली नाही तर तो त्याच्यासारखा का उरेल? तू तुला शाध, त्याला सोड आणि स्वत:चा हात धर..’
मला माहिती नाही, मला काय झालं मी मनोमन धरलेला त्याचा हात सोडला आणि स्वत:चा धरला..
खरं सांगते. हरले होते. खचले होते. पण स्वत:ला शोधलं तर माझी मी पुन्हा सापडले..
आता माझा आनंद कुणावर अवलंबून नाही, माझी मी आनंदात जगतेय..
आता परदेशी आलेय, तर असं वाटतंय की, जग किती मोठंय आणि करण्यासारखं बरंच काही..
आता माझ्यासाठी, माझ्याआनंदासाठी जगत मीच माझी मैत्रीण झालेय..
 
 
वाचक कट्टा
 
 
हा कट्टा खास तुमच्यासाठी.
मनातलं सारं शेअर करण्याची एक खास जागा. तुमचाही लेख या वॉलवर झळकू शकतो. या कट्टयावर त्याची चर्चा होऊ शकते.
तेव्हा लिहा आणि तुमचे लेख आम्हाला oxygen@lokmat.com वर मेल करा.
निवडक लेखांना या वाचक कट्ट्यावर झळकण्याची संधी