- प्रज्ञा शिदोरेतुम्हाला रिचर्ड डॉकिन्स माहिती आहे? माहिती नसेल तर ताबडतोब माहिती करून घ्या !डॉकिन्स कदाचित आपल्या पिढीच्या काही सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञांपैकी असेल. तो खरंतर उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ आहे. त्याचा मनुष्य (प्राणी) आणि त्याचा इतिहास यांचा अभ्यास आहे. त्यात परत शास्त्र आणि धर्म यामध्ये त्याने खूप मूलभूत लेखन केलं आहे. आपल्यापैकी सगळ्यांना त्याचं ते कमाल पुस्तक, ‘गॉड डिल्युझन’ हे वाचायला आवडेलच असं नाही. म्हणूनच त्या पुस्तकामध्ये मांडलेल्या सिद्धांतांवर आधारित एक डॉक्युमेण्टरी फिल्म तयार केलेली आहे. या माहितीपटाच्या सुरुवातीलाच तो म्हणतो की, आज मानव समाज ज्या कारणांनी त्रस्त आहे, ज्या गोष्टींचा त्याला त्रास होतो आणि ज्यामुळे सर्वात मोठे नवे प्रश्न निर्माण होत राहतात, ज्याने माणूस एकमेकांपासून तुटतो, तो विषय म्हणजे ‘धर्म’. त्याच्या मते आपल्यापैकी अनेक जण असे असतील जे कोणत्यातरी एका देवाला, धर्माला घाबरत असतील. काही जणांना त्यांचा धर्म सोडून द्यावा आणि इतर कोणता तरी धर्म पत्करावा असं वाटत असेल, काही जणांना एखाद्याला स्वत:हून असं करता येतं याची कल्पनाही नसेल. एखाद्याला धर्म म्हणजे काय हे कळतही नसेल. अशा सर्वांसाठी डॉकिन्सने ते पुस्तक लिहिले आणि आता त्यावर अधिकारीत डॉक्युमेंटरीदेखील तयार करण्यात आली आहे. त्याच्या मते माणूस कितीही शिकलेला असेल, त्याने जग बघितलं असेल तरीही जेव्हा तो प्रश्न विचारणं सोडून देतो, एखाद्या गोष्टीवर अंधविश्वास टाकतो तेव्हा त्याच्या अधोगतीला सुरुवात होते. एवढंच नव्हे, तर तो अशा विचारांबद्दल आक्रमकही होतो. अमेरिकेत ट्विन टॉवर्सवर झालेल्या हल्ल्यानंतर काहीसं तसंच घडलं असं यात म्हटलं आहे. ही डॉक्युमेंटरी ‘फेथ’ किंवा एखाद्या गोष्टीवर विश्वास असणं म्हणजे नक्की काय या प्रश्नाकडे डोळसपणे पाहण्याचा प्रयत्न करते. हा विश्वास कसा वाढवला जातो, लहानपणापासून एखाद्या व्यक्तीवर कसा बिंबवला जातो हे सारं यात पाहता येऊ शकतं. धर्मामध्ये असं काय आहे, ज्यामुळे तो अशा कोणत्याही पुराव्या गोष्टींवर विश्वास ठेवतो? डॉकिन्सच्या मते, ‘धर्म’ या विषयाकडे अतिशय डोळसपणे पाहण्याची गरज आहे, त्यात सांगितलेल्या गोष्टींकडे पूर्वग्रह सोडून पाहिले पाहिजे. आपल्या डोक्याला चांगला ताप आणि खुराक देणारा, विचार करायला लावणारा हा माहितीपट बघायलाच हवा. त्यासाठी ही लिंक पहा..https://www.youtube.com/wat
७ अब्जांत आपला नंबर कितवा?२०११ साली ‘७ अब्ज’ या आकड्यानं सगळ्यांनाच भुरळ घातली. त्याची दखल प्रसार माध्यमांनी अनेक प्रकारांनी घेतली. हा आकडा म्हणजे आपल्या पृथ्वीवरच्या लोकसंख्येचा. जगप्रसिद्ध नियतकालिक नॅशनल जिआॅग्राफिक यांनी त्यावर्षी जागतिक लोकसंख्येवर वर्षभर एक मालिका चालवली. त्यानिमित्ताने त्यांनी तयार केलेली एक फिल्मही इतरांपेक्षा वेगळी ठरते. ७ अब्ज ह्या आकड्याला मध्यवर्ती ठेवून त्याची अनेक परिमाणं अतिशय सुंदररीत्या दाखवली आहेत. या तीन मिनिटांच्या फिल्ममध्ये एकही संवाद नाही. केवळ ग्राफिक्स आणि अप्रतिम साउण्डट्रॅक आहे. आकडेवारी केंद्रस्थानी असूनही आकड्यांच्या पलीकडे जात, लोकसंख्या या विषयाला ही फिल्म एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. ही फिल्म बघण्यासाठी नॅशनल जिआॅग्राफिकच्या संकेतस्थळावर 7 billion असं शोधा.या निमित्ताने त्यांनी जे जे लेख लोकांसमोर आणले आहेत त्यासाठी त्यांच्या वेबसाइटवर एक स्वतंत्र पानच त्यांनी राखून ठेवले आहे. यामध्ये नव्या युगातला माणूस कसा असेल यावर एलिझाबेथ कोलबर्टने सुंदर वर्णन केलं आहे. ती तिच्या लेखांमध्ये या मानवाचे वर्णन अँथ्रोपोसिन असं करते, म्हणजे ‘मनुष्यानेच व्यापलेलं जग’. हे जग कसं असेल यावर पुढे अनेक लेख या मासिकाने प्रसिद्ध केलेले आहेत. हे सर्व लेख तुम्ही त्यांच्या संकेतस्थळावर वाचू शकता. याबरोबरच या लोकसंख्येवर आधारलेली अजून एक कमाल वेबसाइट आहे. आॅक्टोबर २०११ मध्ये जगाच्या लोकसंख्येने ७०० कोटींचा आकडा गाठला. या अवाढव्य यादीत आपण कितव्या नंबरचे आहोत हे कळलं तर केवढी मजा येईल! किंवा हे जग सुरू झाल्यापासून आजपर्यंत जन्मलेल्या व्यक्तींच्या यादीमध्ये आपण कितव्या क्र मांकावर आहोत हे कळलं तर?हेच सांगण्याचा प्रयत्न ही वेबसाइट करते. बीबीसीच्या संकेतस्थळावर एक टूल आहे, ज्यात तुम्ही तुमची जन्मतारीख दिलीत तर जगाच्या लोकसंख्येत तुम्ही कितव्या क्र मांकाची व्यक्ती आहात हे तुम्हाला कळू शकतं. तुमचा देश दिलात तर देशातील त्यावेळची लोकसंख्या कळते. तुम्ही स्त्री आहात का पुरु ष ते सांगितलं तर तुमची वयोमर्यादा कळते आणि शेवटी पुढच्या काही वर्षात तुमच्या देशात लोकसंख्येची वाढ कशी होणार आहे आणि त्याचे परिणाम कसे असतील ते दाखवते.हे सारं फार भन्नाट आहे.त्यासाठी वाचा..उन्हाळ्यातली ‘कूल’ ट्रीपपरीक्षा आता संपत आल्या..एव्हाना तुमचे प्लॅन्स सुरू झाले असतील, उन्हाळी भटकंतीचे..दोस्त मिळून कुठं फिरायला जायचं, एखाद्या भन्नाट ट्रेकला, जंगलात, कुठं आडवाटेवरच्या गावी किंवा डायरेक्ट बायकिंग करत फिरायचं देशभर..काहीजण तर तडक हिमालयातच जायचं ठरवतील..प्लॅन काहीही असो..तुम्ही दोस्तांनी मिळून अशी एखादी भारी ट्रिप केली असेल तर त्या जागेची माहिती, त्या ट्रिपची धमाल आणि एक मस्त फोटो आम्हाला पाठवा..www.lokmat.com/oxygen या आॅक्सिजनच्या वेबसाइटरवर तुम्हालाही फोटोसकट झळकता येऊ शकेल..आणि मुख्य म्हणजे त्यातून राज्यभरातल्या अनेक तरुण मुलामुलींना नवनवीन वेगळ्या ठिकाणांची माहितीही मिळेल आणि दोस्तांबरोबर ट्रिपला जाऊन नवीन गोष्टी शिकण्याची प्रेरणाही..मग तुमच्या ट्रिपचा आनंद घ्या वाटून.. तातडीने!* तुमच्या ट्रिपचा फोटो आणि माहिती तुम्ही आम्हाला मेलही करू शकता..oxygen@lokmat.com किंवापोस्टानंही पाठवता येईल.त्यासाठी आमचा पत्ताशेवटच्या पानावर तळाशी दिला आहेच..पाकिटावर उन्हाळ्यातली ‘कूल’ ट्रीप असा उल्लेख जरूर करा..