माय करिअर इज माय लाईफ’ ‘नथिंग अॅज आयएम्पी अॅज माय ड्रीम’
‘वर्क कम फस्ट’
‘पिपल कॅन वेट, वर्क कॅन नॉट’
-ही सारी माझी फेसबुक, व्हॉट्स अॅप, आणि जीमेल स्टेटस आहेत.
मला माझा मुद्दा सिद्धच करायचा होता.
मुलगी? आणि मेकॅनिकल इंजिनिअर?
काहीही !
असं मी इंजिनिअरिंगला अॅडमिशन घेण्यापूर्वी खुपदा ऐकलं होतं.
वर्गातही अनेकदा टॉण्ट सहन केले होते.
आणि इंजिनिअर होऊन बडय़ा कंपनीत नोकरी लागल्यावरही अवतीभोवतीचं वातावरण मला कायम स्वत:ला सिद्ध करायला भाग पाडत होतं.
माङयाही नकळत मी स्वत:ला त्या स्पर्धेत ढकललं आणि दिवसरात्र काम करायला लागले.
आणि एक दिवस एका मैत्रिणीच्या लगAाला जायचं म्हणून आरशासमोर उभी राहिले आणि दचकलेच.
ही मी आहे?
*****
कॉलेजात मी किती स्लिम होते. नुस्ती स्लिम नाही तर फिटही होते. चुकून कधी घरचा डबा चुकवला नाही. फार जंक खाल्लं नाही.
बाहेर शिक्षणासाठी राहिले तेव्हाही मेसवाल्या काकू जो काय प्रेमानं डबा द्यायच्या तोच खायचे.
पण नोकरीला काय लागले बिघडलंच सगळं.
सकाळी सात वाजता ऑफिसला जायचं ते रात्री दहाला घरी.
नाष्ता ऑफिसमध्ये.जे मिळेल ते.
जेवण ऑफिसात.त्याचीही वेळ नक्की नाही.कॅण्टिनमध्ये जे मिळेल ते किंवा सरळ पंजाबी डिशेस नाहीतर पिङझा खायचं.वडापाव, बर्गर, वेफर्स हेच खाणं.
रात्री पुन्हा जे मिळेल ते.
हे असं महिनोंमहिने चाललं.
कधी नास्त्यावर दिवसभर काढला तर कधी रात्री जेवलेच नाही.
अॅसिडीटी होऊन होऊन छातीत वणवा पेटायला लागला. उलटय़ा करकरुन आणि त्यासाठीची औषधं घेऊन घेऊन तब्येतीची वाट लागली कधी हे कळलंही नाही.
पन्नास किलोवरचा काटा 72 किलोर्पयत पोहचेर्पयत काय करत होते मी?
स्वत:ला सिद्ध?
आणि ते करण्यासाठी स्वत:च्या तब्येतीची किंमत मोजली?
*****
आणि अवतीभोवती पाहिलं तर काय दिसतं.
माङया वयाच्या सा:या मित्रमैत्रिणींची हीच अवस्था.
सगळ्यांची हीच रडकथा.
साधी जेवायला फुरसत नाही.व्यायाम नावाची तर गोष्टच माहिती नाही.
पाच किलो वजन हातात घेऊन चालायचं तर घाम फुटतो. धाप लागते.
जीव घामाघूम होतो.
आणि अॅसिडीटी, बीपी हे सारं आम्हाला वयाच्या पंचविशीत येऊन चिकटलं.
*****
परवा तर आमच्याच कंपनीतला तिशीतला एक सहकारी हार्ट अॅटॅकने गेलाच.
तो धक्का अजून आम्ही कुणीच पचवू शकलेलो नाही.
असा कसा वयाच्या तिशीत हार्टअॅटॅक येतो.?
आता मी स्वत:लाच विचारतेय की, का नाही येणार?
त्यालाच काय मलाही उद्याही हार्टअॅटॅक येऊच शकतो.
आफ्टरऑल, यू आर व्हाट यू इट!
आणि आम्ही काय खातोय जंक फूड?
सगळा गंज घुसवतोय शरीरात,
मग आमच्या शरीराला ऊर्जा कुठून मिळणार?
जान है तो जहान है, हे कळतं आम्हाला.
पण मला तरी ते वळलेलं नाही.
तब्येतीची वाट लागल्यावर आणि अॅसिडीटीनं तोंडाची पार चव गेल्यावर आता कळतंय की, ऐन तारुण्यात आपण पार खंगायला आणि गंजायला लागलो आहोत.
*****
माङया सत्तर किलोच्या देहाकडे पाहून मी स्वत:लाच विचारतेय की, माझं असं का झालंय?
माङया मित्रमैत्रिणींचं असं काय झालंय?
म्हणजे आज वय वर्षे 25. अजून पुढची किमान 35 वर्षे जर आम्हाला काम करायचं असेल तर आमचं हे शरीर देईल साथ?
राहू आम्ही फिट?
अमिताभ बच्चन ज्या उमेदीनं काम करतात, जो फिटनेस सांभाळतात, ते त्या वयात आम्हाला जमेल?
विचारतेय मी स्वत:ला?
*****
काही पश्नांची खरी खरी उत्तरं आपल्यालाच फार त्रस देतात.
पण मी ठरवलंय की, करिअरवर करते तेवढं प्रेम स्वत:वरही करायचं.
फार नाही तर निदान वेळेवर जेवायचं, थोडा व्यायाम करायच्या, थोडय़ा हेल्दी हॅबिट स्वत:ला लावून घ्यायच्या.
भेळपुरी खावून जगावं इतपत आयुष्याची पचका पाणीपुरी करू नये.
आणि ती झालीच. तर मग काय.
लागणारच आपल्याला आयुष्य भराची मिर्ची.
त्यापेक्षा.आजच हेल्थ इंडिकेटर लावलेलं बरं.
मी लावते.
आणि तुम्ही?