शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

कोरोनाकाळात नोकरी टिकवायची तर आपलं काम दिसलं पाहिजे, ते कसं दिसावं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 5:22 PM

काम बोलेल, तुम्हीही बोला!

ठळक मुद्देआपलं काम दिसणं ही आपली जबाबदारी आहे, हे नव्या काळात विसरू नका. 

- निशांत देवरे

आता काळ असा आला आहे की, काम करण्यापेक्षा ते काम चार लोकांना दिसणं, ते नीट ‘दाखवता’ येणंही फार महत्त्वाचं झालं आहे.हार्डवर्क नाही तर स्मार्टवर्कचा जमाना आहे हे तर आपण कोरोनापूर्वकाळापासून ऐकत आहोतच.आणि आता तर सगळंच ऑनलाइन. त्यात पीपीटी करा, व्हिडिओ करा, झूम मीटिंग, वेबिनार यात झळका.अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की हे सारं करणारे, सर्वत्र झळकणारे, साहेबाला सतत आयडिया देणारे आणि त्याच्या नजरेत येणारे नक्की काम कधी करतात.कारण आपण तर कामच करत असतो आणि ते काम प्रेङोण्ट करणं राहूनच जातं.पुढे पुढे करणारे, काम दाखवून देणारे पुढे जातात आणि नुस्तं काम करणारे कुणाला दिसतही नाही हे वास्तव जितकं काल खरं होतं, तितकंच आजही खरं आहे. पण आज त्यावर उत्तर शोधलं नाही तर वर्क फ्रॉम होमच्या या जमान्यात इमिजिएट बॉससह कुणालाच आपलं काम दिसणार नाही आणि ओङयाचा बैल बनून राहण्यापलीकडे आपल्या हातात दुसरं काहीही येणार नाही.कोरोनासह जगताना सगळं प्रोफेशनल जगणंच ऑनलाइन गेलं आहे. त्यात आता प्रेङोंटेशन स्किल या कौशल्याला मोठं महत्त्व येणार आहे. जो दिसेल तो टिकेल, जो दिसणार नाही तो मागे पडेल असं एकूण चित्र आहे.गुणवत्ता असणं तर महत्त्वाचं आहेच; पण या स्पर्धेत जिथं नोक:यांवरच गंडांतर आलेलं आहे, तिथं आपल्याच गुणवत्तेला, मेहनतीला न्याय द्यायचा असेल तर आपल्या कामाची चर्चा  व्हायला पाहिजे. ते दिसलं पाहिजे.कामाचा दर्जा अजिबात कमी न करता, आपल्या कामाचाच एक भाग म्हणून आता या प्रेङोंटेशन स्किलकडे पहावे लागेल. ते येत नसेल तर शिकून घ्यावं लागेल. कोर्सेरासारख्या साइट्सवर त्यासंदर्भातही प्रशिक्षण मिळू शकतं. तेही मोफत.त्यामुळे नव्या काळात नुसतं टिकायचंच नाही तर जोमानं वाढायचं असेल तर आपल्याला नवीन स्किल शिकूनच घ्यावी लागतील. नुसतं उत्तम पीपीटी करणं, आपला प्रोजेक्ट काय, विषय काय आहे ते मांडणं इथंच काम संपत नाही तर इथं आता ते सुरूहोणार आहे.ते तंत्र शिकून त्यापद्धतीनं प्रेङोंटेशन करणं ही नव्या काळात आवश्यक गोष्ट आहे. ती शिकून घ्यायलाच हवी.

त्यासाठी काही गोष्टी आता घोटून अंगीकाराव्या लागतील.1. बोला. सांगा. आपण जे काम केलं ते साहेबाच्या लक्षात येईल, असं नम्रपणो मांडा. दाखवा. शोशाईन नाही केली तरी केल्या कामावर प्रतिक्रिया, प्रतिसाद मागा.2. नव्या कल्पकतेनं कामाची मांडणी करा. जे विषय कुणी करत नाही, त्याला हात घाला.3. संवाद कला. न बोलून सोनंही विकलं जाणार नाही, त्यामुळे बोलून, लोकांना आपलंसं करून, आपल्या कल्पना विकता यायला हव्यात.4. आत्मविश्वास ठेवा. जी कौशल्यं कमावली, त्यावर भरवसा ठेवा. त्यांच्या जोरावर आगे बढो असं सांगा स्वत:ला.5. स्पष्ट, खणखणीत बोला. तुमची बॉडीलॅँग्वेज तुमच्या विषयी बरेच काही सांगून जाते. 6. सगळ्यात महत्त्वाचं आपलं काम दिसणं ही आपली जबाबदारी आहे, हे नव्या काळात विसरू नका.