-ऑक्सिजन टीम
वाचन संस्कृतीचं कसं होणार? याची चिंता जगभर वाहिली जातेच. त्यातही तरुण मुलं वाचत नाही ही तर नेहमीचीच तक्रार. त्यात वाचनातलायात तर तरुण मुलं फिरकतंच नाही हे सरसकट विधान.
पण ते खरं आहे का?
आपल्याकडचं माहिती नाही, पण इंग्लंडमधली ही बातमी मात्र वेगळी माहिती सांगते. 15 ते 24 या वयोटातील 51 % मुलांचं वाचनालयात जाण्याचं प्रमाण गेल्या पाच वर्षात 9 % वाढलं आहे. Carnegie UK Trust ने केलेल्या सव्र्हेक्षणानुसार तरुण मुलं वाचतात आणि इंटरनेटवरच्या मर्यादित माहितीसह विविध वाचनालयातील पुस्तकंही वाचत आहते. या सव्र्हेक्षणाचे मुख्य कार्यकारी संचालक सांगतात, ‘आजही सार्वजनिक वाचनालयं तरुण मुलांमध्ये लोकप्रिय आहेत. माध्यमिकच नाही तर प्राथमिक शिक्षण घेणारी मुलंही वाचनालयात जाऊ लागली आहेत ही आशेची गोष्ट आहे.
आपल्या देशाच्या संदर्भातही अशी बातमी लवकरच वाचायला मिळावी, अशी आशा ही माहिती वाचताना ठेवायला हरकत नाही.