-चिन्मय लेले
तशा अपेक्षा ‘त्यांच्या’कडूनही असतात, आहेतच, मात्र त्यांनी अतिभव्यदिव्य यश मिळालं तरच त्यांचं कौतुक होणार.एरव्ही मात्र एवढं तर करायलाच पाहिजे होतं असा एकूण माध्यमांसह समाजाचाही अॅटिटय़ूड असतो.अर्थात या मुलींची कप्तान असलेल्या राणी रामपालला मात्र यासार्याचं आताशा काहीही वाटत नाही. तिला सवय झाली आहे. भारतासाठी ती 241 सामने खेळली आहे आणि आजवर तिने 124 गोल केले आहेत. एवढा दीर्घकाळ भारताकडून खेळणारी आणि सर्वाधिक गोल करणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू.तर तिची आणि तिच्या संघाची ही गोष्ट. जी एकमेकांपासून आपण वेगळी काढूच शकत नाही.आणि आता तर त्या गोष्टीत टोक्यो ऑलिम्पिक 2020चं एक नवीन स्वपA हाका मारत उभं आहे.या भारतीय तरुण हॉकीपटू ऑलिम्पिक क्वॉलिफाय करतील असं कुणालाच वाटलं नव्हतं. यावेळी काय ते रिओ ऑलिम्पिकच्या वेळीही वाटलं नव्हतं. मात्र तरीही चार वर्षापूर्वी म्हणजे 36 वर्षाच्या दीर्घकाळानंतर भारतीय महिला हॉकी संघानं ऑलिम्पिकर्पयत धडक मारली. मात्र रिओत त्यांचं अक्षरशर् पानिपत झालं आणि पुन्हा तोच एक राग आळवला गेला की येतं काय या मुलींना? करतात काय?त्याचं उत्तर त्यांनी चार वर्षात शब्दानं दिलं नाही. कप्तान राणी स्वतर्ही कायम संयत शांत होती. मात्र नव्या कोचसह त्यांनी जोरदार सराव सुरू केला. तो हॉकीचा तर होताच; पण फिटनेसचाही होता. अगदी यो यो टेस्ट देणं आणि त्याचा 17च्या आसपास स्कोअर आणून दाखवणंही या मुलींना जमलं. मात्र प्रश्न फक्त हॉकीच्याच सरावाचा नव्हता तर भाषांच्या सरावाचाही होताच.अनेकजणी भारताच्या विविध भागातून आलेल्या. इंग्रजी-हिंदीचा प्रश्न. काही ज्युनिअर मुली मात्र जिद्दीच्या त्यांनी इंग्रजी-हिंदीही शिकून घेतलं. राणी सांगते, मी त्यांना सांगत होते. इंग्रजीचा सराव करा, परदेशात इतर खेळाडू, पंच, अधिकारी यांच्याशी इंग्रजी बोलण्याचा ताण त्यातून कमी होईल.परदेशी अनेक सामने या मुली गेल्या 4 वर्षात खेळल्या. बाहेरच्या वातावरणाचा आता त्यांना अंदाज आहे. त्यांच्या गावातलं वास्तव मागे ठेवून त्या हॉकीचा ग्लोबल अंदाजही मोठय़ा कष्टानं घेत आहेत.ओरिसाच्या तिघी एक्का, लिलीमा मिंझ आणि नमिता टोप्पो या मुली तर आदिवासी भागातून थेट राष्ट्रीय हॉकी संघात आपलं हुनर दाखवत आहे.राणी सांगते, ‘रिओमध्ये फार काही हाती लागलं नाही कारण आमची टीम नवखी होती. आता आमची तयारी पूर्ण आहे. ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे आमची पूर्ण शक्यता आहे. कारण आमची क्षमता आहे आणि त्यासाठीची तयारी आणि जिद्दही.’ती जिद्द काय असते हे त्यांनी अमेरिकन संघाला क्वॉलिफायरमध्ये हरवून दाखवून दिलं आहेच. मात्र विशेष असं की आम्ही आमच्या क्षमतांवर जिंकू शकतो हे सांगण्याइतपत तयारी महिला हॉकी संघाची कप्तान करते हा खरा हॉकीतला बदल आहे.आता येत्या जुलै 2020 मध्ये जेव्हा ऑलिम्पिकचा बिगुल वाजेल तेव्हा राणीच्या या संघाकडे लक्ष ठेवा..त्या वेगळी कहाणी लिहायच्या तयारीत आहेत..