शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

Innovation Scholars 4 : जंगलातला सुगंध

By admin | Published: March 14, 2017 4:13 PM

अगरबत्ती यंत्रांनी आदिवासी बायका होताहेत स्वयंनिर्भर!

 देशातली ही सर्वसामान्य माणसं. त्यांच्या त्यांच्या गरजेतून त्यांनी काही संशोधन सुरू केलं. रुढार्थानं यातील कोणीही संशोधक नाही. काही तर अगदी अल्पशिक्षित.पण ही संशोधनं त्यांच्यापुरती मर्यादित न राहता हजारो लोकांसाठी उपकारक ठरली. त्यांच्या या नाविन्यपूर्ण शोधानिमित्त राष्ट्रपतींनीही त्याचा गौरव केला आणि राष्ट्रपती भवनात त्यांच्या या उपयुक्त संशोधनाचं प्रदर्शन भरवलं. अशा प्रतिभावंतांची ही ओळख..दुर्गम आदिवासी आणि अतिशय ग्रामीण भागातील लोकांसाठी चरितार्थाचं मुख्य साधन काय?यातील बहुतेकांकडे ना स्वत:ची जमीन ना त्यांच्याकडे कुठलं स्किल, ना रोजगारासाठी तिथे कोणता उद्योगधंदा.मजुरी आणि आसपासच्या जंगलावरच त्यांना प्रामुख्यानं अवलंबून राहावं लागतं.आदिवासींच्या चरितार्थात बांबूचा वाटा खूप मोठा. या बांबूनं आदिवासी बांधवांच्या आयुष्यात थोडीफार स्थिरताच आणली नाही, तर त्यांच्या पोटापाण्याचाही तो प्रमुख आधार ठरला. वर्षानुवर्षापासून या बांबूनंच त्यांना तारलं आहे. आजही बांबूनंच त्यांचं ‘पालकत्व’ घेतलं आहे.बांबूपासून टोपल्या विणणं, कलाकुसरीच्या वस्तू बनवणं, बांबूच्या काड्यांपासून अगरबत्त्या तयार करणं.. यासारख्या छोट्या-मोठ्या कामांतून आपल्या पोटाची खळगी ते भरतात. मात्र यातलं कुठलंही काम करण्यासाठी त्यांना हातातल्या सुरी, कोयता किंवा चाकूसारख्या धारदार हत्यारावर आणि आपल्या शारीरिक श्रमांच्या क्षमतेवर अवलंबून राहावं लागतं.सुरी, कोयत्यानंच बांबू तासणं, त्याच्या लांबच लांब कामट्या काढणं आणि मग हव्या त्या आकारात त्यांचे तुकडे करणं, या साऱ्या कामांत नुसते शारीरिक श्रमच नाहीत, तर धोकाही खूप मोठा आहे.सुरी, कोयते वापरताना थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी त्यामुळे हात, बोट कापलं जाणं, जखमी होण्याचे प्रकारही आदिवासींसीठी नित्याचे आहेत. हातावर पोट असणाऱ्यांची रोजीरोटीही त्यामुळे बऱ्याचदा हिरावली गेली आहे.बांबूपासून अगरबत्त्या किंवा त्यासाठीचा कच्चा माल, म्हणजे कामट्या, काड्या तयार करण्याचा उद्योग आदिवासी, ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणावर चालतो. विशेषत: घरातला महिला वर्ग आणि थोड्या कळत्या वयातल्या मुलांचा तर यात खूपच मोठा हातभार आहे. रोजचा घरखर्च चालवण्यात आणि त्याचबरोबर महिलांना स्वयंनिर्भर बनवण्यात या उद्योगाचं योगदान आदिवासी भागासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.मात्र बांबू आणण्यापासून ते अगरबत्ती, इतर वस्तू तयार करण्यापर्यंतचे कष्ट अपरंपार आहेत. आदिवासी लोकांचे हे कष्ट कमी करण्यासाठी एका तरुणानं पुढाकार घेतला.त्याचं नाव परेश पांचाल.गुजरातेतल्या अहमदाबादचा हा तरुण. अगरबत्त्यांची मशिन्स तयार करण्याचा त्यांचा पिढीजात उद्योग आहे. या व्यवसायात त्यांनी चांगलं नावही कमावलं आहे. अर्थात या उद्योगातही आता मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरणही झालेलं आहे. सेमी अ‍ॅटोमॅटिक मशिनपासून ते फूल्ल अ‍ॅटोमॅटिक मशिनपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण अशा यंत्रांची किंमत जास्त आणि वजेची गरजही मोठी.फावल्या वेळात हे काम करणाऱ्या गरीब आदिवासी महिलांसाठी यातला कोणताच पर्याय परवडणारा नाही आणि घरातल्या घरात, हातावर काम करणाऱ्या या कुटुंबांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणंही शक्य नाही. अगरबत्त्यांसाठी मशिन्स तयार करण्याचा घरचा उद्योग होताच. परेशनं मग आणखी अभ्यास केला, आदिवासी, ग्रामीण भागातल्या अडचणी जाणून घेतल्या. विजेची उपलब्धता ही तिथली आणखी एक प्रमुख अडचण. परेशनं या साऱ्या गोष्टी विचारात घेतल्या आणि साधी, सोपी, घरच्या घरी चालवता येऊ शकतील, कमी जागेत बसू शकतील अशी सुटसुटीत काही यंत्रं तयार केली. या यंत्रांचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ही यंत्रं असली तरीही हीदेखील हातानंच चालवावी लागतात. विजेची किंवा कोणत्याही ऊर्जेची गरज या यंत्रांना लागत नाही.आदिवासींची शक्ती आणि वेळ तर या यंत्रांनी वाचवलाच, पण त्यांचा धोकाही कमी केला. तुलनेनं स्वस्त असलेल्या या यंत्रांनी आदिवासी भागात एक मोठाच रोजगार उपलब्ध करुन देण्याची किमया केली.या यंत्राच्या सहाय्याने हातात सुरे, कोयते घेण्याची आदिवासींची गरजच संपली. यंत्रात बांबू टाकल्यावर आपल्या पाहिजे त्या आकाराच्या, जाडीच्या आणि लांबीच्या कामट्या या यंत्रातून तयार होऊ शकतात. बांबूच्या ठराविक जाडीच्या कामट्या अगोदर तयार करायच्या आणि नंतर त्याच मशीनच्या साहाय्याने नेमक्या उंचीच्या काड्या तयार करायच्या! यामुळे आदिवासींचे श्रम खूप मोठ्या प्रमाणात वाचले, त्यात अधिक कौशल्यही आले. तयार झालेल्या या काड्या ‘अगरबत्ती रोलिंग मशीन’मध्ये टाकायच्या. त्यातला अगरबत्ती मसाला आपोआप त्या काड्यांना लागतो. झाली सुगंधित अगरबत्ती तयार!हीच यंत्रं त्यांना त्यांच्या कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्यासाठीही वापरता येऊ शकतात.या यंत्रांच्या सहाय्यानं प्रत्येक आदिवासी महिला दिवसाला किमान शंभर ते दिडशे रुपये रोजगार सहज कमवू शकते!आदिवासींच्या जीवनात परिवर्तन घडवू शकणाऱ्या या अगरबत्ती यंत्रांच्या संशोधनामुळे परेशला भारताच्या राष्ट्रपतींनीही नुकतंच गौरवलं आहे. - प्रतिनिधी