शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
2
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
3
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
4
काश्मीर, कलम ३७० बाबत पाकिस्तान, काँग्रेस-NC सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
5
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
6
IND vs BAN : जैस्वालची 'यशस्वी' खेळी; फिफ्टीसह खास विक्रमाला घातली गवसणी
7
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
8
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
9
बारामतीच्या दोन मुलींना हडपसरमध्ये दारु पाजली, मित्राच्या खोलीत चौघांकडून सामुहिक बलात्कार
10
हे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाहीत; वन नेशन, वन इलेक्शनवरून संजय राऊतांचा मोदींना टोला
11
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक
12
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
13
Vidhan Sabha Election: मुंबईतील 'या' सहा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा?
14
UNGA : पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची मोठी खेळी, 'या' देशांनी ठरावाच्याविरोधात केलं मतदान! 
15
MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय?
16
"मी कचरा करणार नाही", मराठी बोलताना अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठी चूक, मागितली माफी, म्हणाले...
17
रक्ताच्या थारोळ्यात पडला होता भाजपा नेता; पोलिसाने लुटली सोन्याची चेन, ४ अंगठ्या, २ मोबाईल
18
Pitru Paksha 2024: महालय आणि श्राद्ध यात फरक काय? पितृपक्षात दोन्ही शब्दांचा का होतो वापर?
19
Pitru Paksha 2024: घरातल्या भिंतीवर पूर्वजांच्या लावलेल्या तसबीरींची दिशा तपासून बघा; वास्तुदोष टाळा!
20
रिकाम्या सीटवर बसण्याठी धावला अन् रेल्वेतून खाली पडला; सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू

इंडोनेशियात नोकऱ्यांसाठी तरुणांचं प्रखर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 7:56 AM

लॉकडाऊनमुळे लाखो इंडोनेशियन तरुणांना जॉब लॉसचा सामना करावाच लागतो आहे. त्यात तिथं एका नव्या कायद्यानं धुमाकूळ घातला आहे आणि त्यापायी तरुणांचे आहे ते रोजगार जाण्याची भीती आहे.

- कलीम अजीम

लॉकडाऊनमुळे लाखो इंडोनेशियन तरुणांना जॉब लॉसचा सामना करावाच लागतो आहे. त्यात तिथं एका नव्या कायद्यानं धुमाकूळ घातला आहे आणि त्यापायी तरुणांचे आहे ते रोजगार जाण्याची भीती आहे. ५ ऑक्टोबरला इंडोनेशियात ‘जॉब क्रिएशन’ विधेयक मंजूर झालं. त्या कायद्याला मात्र गेल्या महिन्याभरापासून तरुणांचा प्रचंड विरोध सुरू आहे.

गेल्या आठवड्यात इंडोनेशियात विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन झालं. तरुणांचं म्हणणंच आहे की, हा नवा कायदा रोजगारनिर्मिती करणार नसून तो आहे त्या नोकऱ्या हिरावून घेणारा आहे. श्रमिकांना वाटते की हा कायदा त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करतोय. स्थानिक व्यापाऱ्यांना भीती आहे त्याचा व्यवसायावर परिणाम होईल.

जकार्ता पोस्टच्या मते, ‘जॉब क्रिएशन’ कायद्यात सरकारने परदेशी गुंतवणूकदारांसाठी अमाप सवलती जाहीर केल्या आहेत. कायदे व नियम शिथिल केले आहेत. त्यांच्यासाठी कररचनेत बदल केला आहे. परदेशी व्यावसायिकांना उद्योग करण्यासाठी विशेष पॅकेज देऊ केले आहे. शिवाय कंत्राटी कामगारांसाठी मर्यादा निश्चित केली आहे. बिझनेस रँकिंगमध्ये इंडोनेशियाची भूमिका सुधारण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, त्याचा एक भाग म्हणून हा कायदा आणण्यात आला आहे.

स्थानिक श्रमिक आणि तरुणांनी ‘आधुनिक गुलामगिरीचे प्रकार’ म्हणत हा कायदा आपल्या मुळावर आल्याची जाहीर भूमिका घेतली आहे.

२ नोव्हेंबरला राजधानी जकार्तामध्ये मोठा जनसमुदाय राष्ट्रपती भवनपुढे एकत्र आला. त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मोर्चा शांततेत सुरू असताना अचानक त्याला हिंसक वळण लागले. काही संतप्त तरुणांनी सोडा वाॅटरच्या बाटल्या आणि दगड राष्ट्रपती भवनच्या दिशेने फेकले.

पोलिसांनी प्रतिकार करत विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केला. अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्याने परिसरात धुरांचे लोट पसरले. बराच वेळ पोलीस आणि आंदोलकांत संघर्ष सुरू होता.

कोरोना संकट व त्यात बेरोजगारीचे आव्हान या दोहोंत इंडोनेशिया भरडला जात आहे. मात्र तरुणांच्या आंदोलनाला यश येईल असं आता दिसतं आहे, या कायद्यात दुरुस्तीची तयारी राष्ट्रपतींनी दाखवली आहे. जॉब क्रिएशन कायद्याचा सुधारित मसुदा कसा असेल, याकडे आता तरुणांचे लक्ष आहे.

(कलीम मुक्त पत्रकार आहे.)

kalimazim2@gmail.com