व्हॉट्स अॅपची कॉलिंग सेवा सगळ्यांसाठी खुली झाली आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली. पण तसं बघायला गेलं, तर व्हॉट्स अॅप या पंक्तीमध्ये सगळ्यात शेवटी दाखल होणारं चॅट अॅप आहे. इतर अॅप यामध्ये कधीच पुढे सरकली आहेत. त्या अॅप्सचीही माहिती ठेवाच.
स्काइप
इंटरनेट कॉलिंगचा या स्काइपला बाप म्हणावं लागेल. कारण इंटरनेट कॉलिंगमध्ये जेव्हा इतर कोणीही नव्हतं, तेव्हा स्काइप होतं. स्काइप तुम्ही तुमच्या मोबाइलवरून, टॅब, आयपॅड, लॅपटॉप, डेस्कटॉप कुठूनही वापरू शकता. शिवाय स्काइप वापरून तुम्हाला मोबाइल आणि लॅण्डलाइन नंबरलाही फोन करता येईल. नुसते व्हॉइस कॉल्सच नाहीत, तर व्हिडीओ चॅट हे स्काइपचं वैशिष्टय़ं. त्यामुळे व्हिडीओ कॉलसाठी भरवशाचा गडी हवा असेल तर तो आहे- स्काइप.
वायबर
गेल्या एक- दीड वर्षात झपाटय़ाने वर आलेलं हे अॅप. चॅटिंग, कॉलिंग आणि व्हॉइस कॉलचाही ऑप्शन यात आहे. यातल्या चॅटसाठी तुम्ही इंटरेस्टिंग स्टिकर्स वापरू शकता. याच्या ऑडिओ कॉलचीही क्वालिटी चांगली आहे. पण अर्थातच व्हिडीओ कॉलसाठी तुमच्याकडे चांगलं इंटरनेट कनेक्शन असणं गरजेचं आहे. घरच्या वायफायवरून चांगला व्हॉइस कॉल करता येईल. पण टूजी वरून व्हिडीओ कॉल्स कठीण आहेत.
हाइक
इंटरेस्टिंग स्टिकर्समुळे फेमस झालेलं हे इंडियन चॅटिंग अॅप. यावरही कधीच ही कॉलिंग सुविधा आलेली आहे. या मेसेंजरवरून तुम्ही 2क्क् पेक्षा जास्त देशांमध्ये कॉल करू शकता. चॅटसाठी तरुण वर्गात हे अॅप खूप फेमस आहे. शिवाय यात प्रायव्हेट चॅटसाठी खास वेगळं फीचर असल्याने तुम्ही तुमचे चॅट्स दडवूनही ठेवू शकता. यावर अजून व्हिडीओ कॉलिंग / चॅटची सुविधा मात्र नाही.
- अमृता दुर्वे