शहरं
Join us  
Trending Stories
1
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
2
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
3
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
4
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
5
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
6
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
7
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
10
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
11
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
12
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
13
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
14
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
15
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
16
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
17
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
18
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
19
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
20
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 

कोलंबसाचा उलटा प्रवास

By admin | Published: January 21, 2016 8:23 PM

प्रॉडक्शन हाउसचं ऑफिस. हिंदी, मराठी सीरिअलच्या प्रॉडक्शनची धावपळ चाललेली. एक मुलगा बराच वेळ एक कोपरा धरून बसलेला. तो स्ट्रगलर.

‘तो कोलंबस निघाला होता

नवं जग शोधायला. 
आमचे हे माध्यम कोलंबस येतात ते 
त्यांचं स्वत:चं आजवरचं अनवट अनुभवविश्व 
इतर जगाला दाखवायला. 
त्यांच्या त्या धैर्याला तोड नाही.’
- फक्त अॅक्टरच नाही, तर 
लेखन-दिग्दर्शनासह
तांत्रिक क्षेत्रतही नाव काढायला येणा:या
मुलामुलींची दुनिया दिसते कशी
हे सांगणारा,
 
अपर्णा पाडगावकरयांचा हा लेख. 
 
पत्रकारितेत अनेक वर्षे मुशाफिरी करून
विविध चॅनलच्या ‘इपी’ म्हणून त्या
टीव्हीच्या जगात काम करत आहेत.
मालिकांमध्ये काम करण्यासाठी
येणा:या तरुण मुलामुलींचा
त्यांना दिसणारा हा
जिद्दी चेहरा!
 
प्रॉडक्शन हाउसचं ऑफिस. हिंदी, मराठी सीरिअलच्या प्रॉडक्शनची धावपळ चाललेली. एक मुलगा बराच वेळ एक कोपरा धरून बसलेला. तो स्ट्रगलर. त्याला कुणीही काय काम आहे, असं विचारलेलं नाही. तोही शांत बसून राहतो. छोटय़ा मोठय़ा नवनव्या भूमिकांसाठी ऑडिशन्स सतत चालू असतात. मनातल्या मनात आपल्या वाक्यांची उजळणी करत राहतात. कुठे कसे हातवारे करावेत, कुठल्या शब्दांवर जोर द्यावा, तसाच हाही एक असावा. ब:याच वेळाने उठून स्ट्रगलरनं त्याची वाक्यं म्हटली. ऑडिशन घेणा:या असिस्टण्ट डिरेक्टर अर्थात एडीच्या चेह:यावरून त्याला अंदाज आला असावा की ऑडिशन काही फार बरी झालेली नाही. पण तो चिकटून उभा राहिला. ‘मी कधीपासून येऊ?’ त्यानं विचारलं. एडीच्या चेह:यावर त्याला संताप दिसला असावा. एडी काही बोलायच्या आत तोच पुन्हा म्हणाला, ‘मी अॅक्टिंग करायला आलेलोच नाहीये. मला शूटिंग शिकायचंय..’
या स्ट्रगलरसारखी असंख्य मुलं मुंबईत रोज येतात. आपल्या मीडियामध्येच काम करायचं आहे, हे समजून उमजून जाणीवपूर्वक काही निर्णय घेऊन येतात. अभिनय करण्यासाठी येणा:यांची संख्या तर अमाप आहेच. सध्या तर साधारणत: बारावी पास वगैरे झालं की, पुढील शिक्षण डिस्टन्स एज्युकेशन म्हणून पूर्ण करायचं आणि याच तीन वर्षात काम शोधायचं, असं करणारे अनेक जण भेटतात. अभिनयापलीकडे या क्षेत्रत काम करू पाहणा:यांची आणि त्यासाठी धडपड करणा:यांची संख्या प्रचंड वाढली आहे.
2क्क्क् सालच्या आसपास मराठी चित्रवाहिन्या सुरू झाल्या आणि आज पंधरा वर्षात हा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी मनोरंजन आणि वृत्तवाहिन्या दैनंदिन जीवनाची गरज बनल्या. या क्षेत्रबद्दल असलेलं कुतूहलाचं धूम्रवलय काही प्रमाणात शमलं (आकर्षण अजूनही तितकंच आहे) आणि इथलं कामकाज कसं चालतं, हे बहुतेकांना कळू लागलं. किमान ज्यांना त्यात रस आहे, त्यांना तरी पडद्यावर दिसणा:या व्यक्ती जे बोलतात, ते कोणीतरी लेखकानं लिहिलेलं असतं,  कुणी कॅमेरामन ते आपल्या कॅमे:याने शूट करतो आणि मग त्यावर संगीतादि प्रक्रिया होऊन ते आपल्यार्पयत पोहोचतं, इतपत माहिती तरी लोकांर्पयत पोहोचली. या अफाट वाढलेल्या व्यवसायाने मग बीएमएम, मासकॉमसारखे शैक्षणिक कोर्सेसही सुरू झाले. आणि आपण या क्षेत्रत काहीतरी करू शकतो, हा विश्वास खेडेगावातून वसलेल्या असंख्य तरुणांना दिला. अभिनयासाठी किमान बरा चेहरा लागतो, तो आपल्याजवळ नसला तरी थोडी क्रिएटिव्हिटी आहे आणि त्या जोरावर आपण काहीतरी करू शकतो, हा विश्वास ग्रामीण भागातल्या तरुणाईला मिळणं ही खरी माध्यमक्रांती म्हटली पाहिजे. जेमतेम वीस वर्षापूर्वी नाटक, सिनेमा हा ग्लॅमरस, बेभरवशाचा, नशीबावलंबी आणि बहुतांशासाठी अप्राप्य असा धंदा होता. खासगी सॅटेलाईट टीव्ही चॅनेल्समुळे केवळ मनोरंजनच नव्हे, तर या क्षेत्रत काही करून बघण्याची ऊर्मी, आशा आणि आत्मविश्वास नॉन-ग्लॅमरस पण कष्टाळू ग्रामीण तरुणाईला मिळाला.
अर्थात, सगळ्यांनाच नाटय़ वा सिनेमाचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन इथे काम करायला येता येतंच असं नव्हे. फक्त आपल्या अंगभूत गुणांच्या जोरावर इथे स्ट्रगल करायला येणा:यांची संख्या अजूनही मोठीच आहे. लिहिता येतंय, काही नवं सुचू पाहतंय तर लेखक होण्याचा प्रय} करून बघणं, हे तर अगदी सहज होऊन जातं. स्ट्रगल करायला आलेल्यांपैकी कित्येक जण प्रॉडक्शनच्या इतर अंगांशी ओळख करून घेत त्या-त्या डिपार्टमेंटमध्ये शिरकाव करून घेतात. अभिनय करता करता लेखक झालेले (किंवा क्वचित उलटही) किंवा दिग्दर्शन करू लागलेले कित्येक जण या क्षेत्रत ब:यापैकी नावलोैकिक कमावून आहेत. अगदी हरकाम्या म्हणून नोकरीतील सुरुवात करूनही कॅमेरा किंवा एडिटिंगच्या खुब्या शिकून घेत कॅमेरामन किंवा एडिटर म्हणूनही सेटल झालेले अनेक लोक मला माहीत आहेत.
या सगळ्या मुलामुलींमध्ये एक जबरदस्त ऊर्जा आहे. परतीचे दोर कापून आलेले हे मावळे कष्टाची तमा बाळगत नाहीत. आणि हा त्यांचा सर्वात मोठा गुण ठरतो. या क्षेत्रत कष्टाला पर्याय नाही. फक्त एक गोष्ट करता आली पाहिजे. डोळे व कान उघडे ठेवणं. इथे कोणी कोणाला काहीही शिकवत नाही. पण तुमची शिकायची तयारी असेल तर तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. या सगळ्या युवा वर्गाची  आणखी एक खासियत म्हणजे त्यांचं गावरान शहाणपण आणि अस्सल मातीतील संवेदनशीलता. प्रत्यक्ष जीवनाबद्दलची त्यांची अनुभूती त्यांना एक वैशिष्टय़पूर्णता बहाल करते. ठरीव शहरी साच्यापलीकडच्या आयुष्याचा त्यांचा अनुभव त्यांना वेगळ्या गोष्टी निर्माण करण्याची शक्ती देतो. आणि हाच अस्सलपणा आणि त्यातून येणारं नावीन्य हा आजच्या माध्यमांमधला परवलीचा शब्द झाला आहे. या मुलांना सुचवणा:या वेगळ्या कल्पना आणि त्या साकार करण्याची त्यांची जिद्द त्यांना यशाकडे घेऊन जाते.
ही मुलं इथे घरच्यांपासून दूर राहतात, पण ती एकेकटी राहत नाहीत. चार-सहा जण मिळून एक फ्लॅट भाडय़ाने घेऊन राहतात. एकत्र स्वयंपाक करतात, पाळ्या लावून भांडी घासतात. वेळेला एकमेकांचे नवे कपडे हक्कानं  वापरतात आणि एकमेकाला करिअर आणि अफेअर्सच्या बाबतीत प्रामाणिक सल्ले देतात. गावाकडून आलेला कुणाचाही मित्र कितीही दिवस हक्काने या फ्लॅटवर येऊन राहू शकतो. ही आपुलकीच त्यांना या परक्या जगात राहायचं बळ देते.
हे जग भपकेपणाचं आहे हे खरं. ग्रामीण भागातून आलेल्यांची भाषा किंवा पेहराव हे त्यांना अडसर वाटू शकतात, हेही क्वचित खरं ठरतं. पण हे अडथळे सुरुवातीच्या काही काळापुरतेच आहेत, हे त्यांनीही लक्षात ठेवायला हवं. येणा:या पाहुण्यांचा सत्कार त्याच्या पोशाखावरून होतो हे जितकं खरं, तितकंच पोशाखाचं इम्प्रेशन फक्त पहिल्या वेळीच पडतं, हेही खरं. त्यानंतर प्रत्येक वेळी बोलतं ते तुमचं काम, तुमच्या नवनव्या कल्पना आणि कष्टांची तयारी. हे क्षेत्रच मुळी नावीन्याचं आहे. हा कोलंबसाचा उलटा प्रवास आहे. तो कोलंबस निघाला होता ते नवं जग शोधायला. आमचे हे माध्यम कोलंबस येतात ते त्यांचं स्वत:चं आजवरचं अनवट अनुभवविश्व इतर जगाला दाखवायला. त्यांच्या त्या धैर्याला तोड नाही. दूरचित्रवाणीचं हे माध्यम (यात टीव्ही, फिल्म, डिजिटल फिल्म, नाटक हे सगळं आलं) त्यांच्या या धैर्याला सन्मान करत आलं आहे आणि पुढेही करत राहील.