शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
4
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
5
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
6
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
7
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
8
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
9
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
10
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
11
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
12
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
13
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
14
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
15
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
16
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
17
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
18
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
19
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
20
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

कसं जगतंय इराणी तारुण्य कोरोना कोंडीत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 9:20 AM

इराणी तारुण्य आधीच सरकार विरोधात रस्त्यावर होतं. त्यात कोरोना आला, आता त्यांची लढाई दुहेरी आहे आणि हातात शस्र नाहीत की मदत नाही. हाताला काम नाही आणि जगण्याचं स्वातंत्र्यही.

ठळक मुद्देआधीच आर्थिक र्निबध त्यात या संकटामुळे येणारी वर्षे त्यांना अंधारात दिसत आहेत.

चीननंतर इटली, अमेरिका आणि इराण हे सर्वाधिक बाधित देश. इराणचं हे संकट दुहेरी आहे. एकीकडे अमेरिकेचे आर्थिक र्निबध, तर दुसरीकडे देशातील अंतर्गत कलह, रोगराईवर नियंत्नण आणण्यास अडसर ठरत आहे. इराणच्या तारुण्याचं जगणं त्यामुळे पणाला लागलं आहे. ट्विटरचा फेरफटका मारला तर त्यांचा व्यवस्थेवरचा राग दिसून येतो. तसं पाहिलं तर सरकारविरोधात बोलण्याच्या अधिकार कुठल्याही नागरिकाला सरकारनं दिलेला नाही. तसं केल्यास कडक कायद्याचा फास आहेच. पण मध्य-आशियातील काही वेबसाइट्सवर अज्ञात नावाने अशा प्रतिक्रि या सर्रास पहायला मिळता आहेत. त्यातून इराणमध्ये नक्की काय घडतंय, याचा अंदाज येणं शक्य आहे.फेब्रुवारीत कोम शहरातून पहिला ‘पेशंट ङिारो’ दिसला म्हणजे कोरोनाची लागण झाली. त्याचकाळात इराणमध्ये एक धार्मिक संमेलन झालं, त्यातूनही प्रसार वाढला असं जागतिक आरोग्य संघटना म्हणते.बघता बघता केवळ 16 दिवसात कोविड-19 इराणच्या सर्व 31 राज्यात पसरला. इतकं होऊनदेखील सरकारकडून पुरेशा उपाययोजना राबविल्या गेल्या नाहीत. प्रार्थनास्थळे, मॉल्स, व्यापारी बाजारपेठा सुरूच होत्या.राष्ट्रव्यापी लॉकडाउन सुरू व्हायला 11 एप्रिल उजाडावं लागलं. तोर्पयत इराणमध्ये सर्वत्न हाहाकार माजला होता. इराणमध्ये 6,2क्3 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडल्याची माहिती हा लेख लिहिताना दिसत होती.4 मेस सरकारने गेल्या तीन दिवसापासून नव्या पेशंटची नोंद झाली नसल्याचे सांगत लॉकडाउनची सवलत जाहीर केली. धार्मिक स्थळं खुली केली. मात्र परिस्थिती भयान असताना सरकारने घेतलेला निर्णय बहुतेक इराणीयन लोकांना आवडला नाही. काही अपवाद वगळता, अनेकांनी नाराजी व्यक्त केली; पण त्यांचं ऐकून घ्यायची कुणी तसदी घेतली नाही.दुसरीकडे 2क्17 साली इराण ठरल्याप्रमाणो न्यूक्लिअर कार्यक्रम रोखत नसल्याचा आरोप करत अमेरिकेने इराणवर प्रतिबंध लादले. आता अमेरिकेच्या भीतीपोटी कुठलाच देश इराणला कोरोना रोगराईच्या काळात मदत करत नाहीये. पाश्चात्य देशांनी लादलेल्या आर्थिक र्निबधामुळे इराणची चहुबाजूंनी कोंडी झाली. इराणनं आंतरराष्ट्रीय नाणोनिधीला आपत्कालीन निधीसाठी पाच अब्ज डॉलर्सची मागणी केली. परंतु या विनंतीचा पाठपुरावा झाला नाही. गेल्या महिन्यात रशियाकडून थोडीसी मदत मिळाली होती. हे सारं असताना इराणमधलं तारुण्यही हतबल आहे.फेब्रुवारीत इराणनं क्र ांतीचे 4क् वर्षे पूर्ण केली. गेल्या चार दशकपासून दोन पिढय़ा या क्र ांतीत बीज रुपाने उगवल्या. पहिली पिढी धाक आणि परंपरावाद्याच्या सावटाखाली वाढली. परंतु जागतिकीकरणाची थेट लाभार्थी झाल्याने तिला आर्थिक बलदंडता लाभली.दुस:या पिढीनं तंत्नज्ञानाच्या कुशीत डोळे उघडले. वयात येताना नवे प्रश्न, नवी आव्हानं आणि नवा देश त्यांच्यासमोर उभा होता.या चार दशकात जगभरात परिस्थिती कमालीची बदलली. तंत्नज्ञान व माहितीच्या अवाढव्य स्वरूपाने जगाला बदलण्यास भाग पाडलं. उद्योग, शिक्षण, रोजगाराची साधने विकसित झाली. जगभरात तंत्नज्ञानावर आधारित नवीन प्रणाली अस्तित्वात आली. देशा-देशात लोकशाही शासन प्रणाली अमलात आली.

इराणमध्ये मात्न आजही एकहाती सत्ता आहे. निवडणुका होतात; पण, सर्वोच्च नेते राष्ट्रासंबंधी अखेरचे निर्णय घेतात. गेल्या चार दशकापासून हीच परिस्थिती आहे. नव्या पिढीतले तरुण या राज्य व्यवस्थेला पुरते कंटाळले आहेत. जुनाट कल्पना त्यांना आता नको आहेत. कालबाह्य कायदे, राज्यव्यवस्था बदलाची मागणी करत आहेत. गेल्या काही वर्षांत या सक्तींना झुगारणारी, व्यवस्थेला प्रश्न विचारणारी एक मोठी जनंसख्या चर्चेच्या पटलावर आली. ही पिढी सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या संघर्षाशी दोन हात करत अस्तित्वाची लढाई लढत आहे.बेरोजगारी व महागाईनं तरुण ग्रस्त झालेले आहेत. उच्च शिक्षण असूनही रोजगार मिळत नसल्याने ते हवालदिल आहेत.हतबलतेच्या परिस्थितीत तरुण इराणी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर राग काढण्याशिवाय काहीच करू शकत नाही. ट्विटरच्या फेक प्रोफाइलवरून इराणी, प्रोटेस्ट, रिवोल्यूशन आदी हॅशटॅग वापरून तरु णाई रोष प्रकट करत आहेत. अमेरिकेवर टीका करत आहेत. क्र ांतीनं आमच्यासाठी काय केलं असं विचारत आहेत. अनेकांना पाश्चात्त्य देशात नोकरीसाठी जायचं आहे. अनेकजण सांस्कृतिक क्षेत्नात करिअर करू पाहत आहेत. बहुतेकांना खेळ, संगीत आणि कला विश्वात रस आहे. काहींना गल्फमध्ये रोजगाराची संधी शोधायची आहे. तरु ण म्हणतात, देशातील नवी आव्हाने नव्या संकटाना आमंत्नण देत आहेत. तरु ण फ्रस्ट्रेट असून, त्यांच्या समस्या सोडवण्यास सरकार अपयशी ठरलं आहे. परिणामी हे धोरण ब्रेन ड्रेन वाढण्यास कारणीभूत ठरली आहे. अनेक सुशिक्षित तरु ण संधी मिळेल ती स्वीकारून देश सोडून जात आहेत. बंद दाराआड तरु णाईच्या स्वप्ने तिष्ठत पडली आहेत.गेल्या तीन महिन्यापासून जगाला कोरोना संकटाने घेरलं आहे. चोहीकडे अनिश्तिता, हतबलता पसरली आहे. अनेकांचे जॉब गेले. रोजगार घटले. इराणमध्ये ही परिस्थिती अधिक दाहक झाली असून, तरुणांचे प्रश्न बिकट झाली आहेत. आधीच आर्थिक र्निबध त्यात या संकटामुळे येणारी वर्षे त्यांना अंधारात दिसत आहेत.इराणी तरुणांना नैराश्य, असाहायता, हतबलता आणि अनिश्चितने ग्रासलं आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी अनेकांनी ऑनलाइन शिकवण्या घेणं सुरूकेलं आहे. अनेकजण सेवाभावी संस्थेच्या वतीने अन्नदानात सहभागी झाले आहेत. काहीजण हेल्थ वर्कर झाले आहेत तर काही प्रबोधन करत आहेत.

कलीम अजीम(लेखक मुक्त पत्रकार  आहेत)