शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

सांगली जिल्ह्यांत लाइटीच्या कामाला आयटीआयची पोरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 2:49 PM

सगळीचं पोरं 18 ते 20 वर्षाची. स्थानिक खेडय़ापाडय़ातलीच. आयटीआय करणारी, ट्रेड शिकून हातात कौशल्य यावं म्हणून शिकणारी. मात्र पूर उतरला आणि ही पोरं थेट घरोघर गेली. पाच-दहा नाहीतर सहाशे आयटीआयवाली पोरं गाळभरल्या घरांमध्ये पोहचली. सोबत त्यांचे प्राध्यापकही. एका पैचाही मोबदला न घेता. घरोघरची इलेक्ट्रिक फिटिंगची कामं, पाण्याच्या मोटारी दुरुस्ती करणं, टीव्ही-फ्रीजची प्राथमिक दुरुस्ती, पाण्यानं फुगलेल्या दारं-खिडक्या-कपाटांची कामं अशी अनेक कामं ही मुलं मोठय़ा कौशल्यानं करत आहेत.

ठळक मुद्देसांगली परिसरात या आयटीआयच्या मुलांनी झोकून देऊन जे काम सुरू केलंय, ते काम कौशल्य शिक्षणाच्या आणि मदतीच्या पुढचं एक पाऊल आहे !

- श्रीनिवास नागे

दहावीला कमी मार्क पडले, की पोरानं आता पोटापाण्याचं काही तरी बघावं यासाठी घरच्यांचं टुमणं मागं लागतं. त्यातच घरचं कुणाचं वर्कशॉप, गॅरेज नाहीतर काहीबाही दुरुस्तीचं दुकान असलं तर, घरातलं कुणी सुतारकामापासून इलेक्ट्रिक फिटिंगर्पयतची कामं घेत असेल तर पोराला हमखास त्याच कामात आणलं जातं. आणि हाताशी एखादं प्रमाणपत्र असावं, बेसिक शिकता यावं म्हणून ‘आयटीआय’ला घातलं जातं. ‘काही नाही तर आयटीआय तरी कर रे’ असा वडीलकीचा सल्ला देणारे अनेक असतात. आयटीआय म्हणजे तंत्रशिक्षण, औद्योगिक प्रशिक्षण, व्यवसाय कौशल्य शिक्षण. ज्याला काही जमत नाही, त्यानं आयटीआयला जावं असं म्हणण्याचा एक काळ होता. ते करणार्‍यांच्या नावानं नाकं मुरडायला, हिणवायलाही अनेकजण टपलेले असत. आता काळ असा आला की, बी.ई. करणार्‍यापेक्षा आयटीआयचा कोर्स केलेल्याला जास्त डिमांड आहे. आयटीआयत प्रवेश घ्यायचा तरी 85-90 टक्केच्या पुढे काही महत्त्वाच्या कोर्सेसची कटऑफ यादी जाते. आणि आयटीआय हे व्यवसाय शिक्षण आणि कौशल्य देणारं, एक नवीन पर्यायी शिक्षण ठरतं आहे.ते किती महत्त्वाचं आणि प्रत्यक्षात काम करण्यासाठी उपयुक्त आहे, हे प्रत्यक्षात बघायचं असेल तर सांगली परिसरात जा. सांगलीच्या महापुराचं पाणी ओसल्यावर आता ‘आयटीआय’ची पोरं लोकांच्या मदतीला धावली आहेत. तेही एका पैचाही मोबदला न घेता. पुरानं घरोघरी वीज गेलीच; पण इलेक्ट्रिक फिटिंगचेही तीनतेरा वाजले. त्यामुळेच घरातल्या लाइट फिटिंगची कामे, पाण्याच्या मोटारी दुरुस्ती करणं, टीव्ही-फ्रीजची प्राथमिक दुरुस्ती, पाण्यानं फुगलेल्या दारं-खिडक्या-कपाटांची कामं अशी अनेक कामं आता ही आयटीआयची मुलं घरोघर जाऊन मोठय़ा मेहनतीनं करत आहेत.पूर संपता संपताच ही पोरं पूरबाधित भागात पोहोचली. महावितरण अर्थात एमएसईबी फक्त तुमच्या मीटर्पयत वीज पोहोचवते, सुरळीत करते. घरातली बाकीची इलेक्ट्रिक फिटिंगची भानगड ज्याची त्यालाच निस्तरावी लागते. खासगी वायरमन बोलावून काम करून घ्यावं लागतं. पण कामंच इतकं की खासगी वायरमन तरी किती ठिकाणी जाणार? म्हणून मग या कामांच्या मदतीसाठी आयटीआयची पोरं धावून आलीत. पुराचं पाणी खाली जायला लागल्यानंतर माणसं घरोघरी परतू लागली. पहिलं काम साफसफाईचं. त्यानंतर लगेच लाइटीचं. विजेशिवाय जगणंच मुश्कील. आयटीआयची टीम स्वतर्‍हून पूर ओसरणार्‍या भागात गेली. त्यांची स्वयंस्फूर्तता वाखाणण्याजोगी. सुरुवातीला दोनशेजण, नंतर चारशे, सहाशे अशी या मुलांची संख्या वाढली. त्यातच तंत्रशिक्षण विभागानंही पूरग्रस्त भागात मदत करण्याच्या सूचना दिल्या. सोशल मीडिया, रेडिओवरून आवाहन सुरू झालं. पूरग्रस्तांच्या घरातलं इलेक्ट्रिक फिटिंग, फ्रीज तपासणी अन् किरकोळ दुरुस्ती, वेल्डिंग, सुतारकाम, प्लम्बिंग, पाण्याखाली गेलेल्या-नादुरुस्त झालेल्या पाण्याच्या मोटारी तपासणं आणि दुरुस्ती करून देण्याची कामं मोफत करून देण्याची व्यवस्था केल्याचे मेसेज व्हायरल झाले. संपर्कासाठी फोन नंबर दिले. बघता बघता फोनवर फोन सुरू झाले. नोंदी सुरू झाल्या..त्या त्या कॉलनुसार पोरांची टीम जायला निघाली. प्रत्येक टीमसोबत एक इन्स्ट्रक्टर. त्यांच्या निगराणीखाली पोरं राबायला लागली. शक्य ती कामं जागेवरच. फ्रीज, पाण्याच्या मोटारींची जरा जास्तीची दुरुस्ती मात्र आयटीआयच्या वर्कशॉपमध्ये. नवीन वीज मीटरच्या सीलिंगची कामं या पोरांकडंच आहेत. महावितरणच्या पाच हजारावर मीटरचं सीलिंग त्यांनी केलंय.सांगली जिल्ह्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्था तथा आयटीआयची संख्या 25. त्यात शासकीय दहा आणि खासगी 15. सांगलीच्या शासकीय आयटीआयमध्ये जिल्ह्यातल्या प्रमुखांची बैठक झाली अन् त्यात कामं वाटून देण्यात आली. भागांची जबाबदारी निश्चित झाली. सांगलीपासूनच्या पूर्वभागातल्या आयटीआयची पोरं सांगली-मिरज परिसरात, तर पश्चिमेकडची पोरं त्यांच्याच तालुक्यातल्या पूरग्रस्त भागात. सांगली-मिरज शहरांसह पूरग्रस्त 104 गावांमधल्या 11,589 कुटुंबार्पयत जायचं आणि त्यांचं जगणं सुसह्य करून द्यायचं, हे त्यामागचं उद्दिष्ट. त्यात जशी वायरमनची कामं आहेत, तशी सुताराचीही आहेत. टीव्ही, फ्रीज दुरुस्ती तर खंडीभर ! आयटीआयमधल्या पोरांच्या टीमकडून ही सेवा महिनाभर सुरू राहणार आहे. हे सगळं एकही पै न घेता! ही पोरं घरात परतलेल्या माणसांना धीर तर देतातच; पण त्यांच्या मनातली भीती घालवून या कामांबाबत समाधान होईर्पयत तिथं थांबतात. न कुरकुरता काम करतात. आता शेजारच्या जिल्ह्यांतूनही आयटीआयची पोरं येताहेत. सगळीचं पोरं 18 ते 20 वर्षाची!सांगली परिसरात गुरुदेव दंडगे, उमेश लोहार, शशिकांत सुतार ही शिक्षक मंडळी पोरांच्या सोबत असतात.दंडगे सांगतात, ‘आयटीआयच्या मुलांना बरंच शिकायला मिळालं. आमच्या वर्कशॉपमध्ये कदाचित एवढे धडे मिळाले नसते. शिवाय पूरबाधितांची कामंही विनामोबदला झाली. लोकांचे चेहरे या मुलांमुळं काहीसे खुलल्याचं समाधान मोठं !’महावितरणच्या कुशल आणि अनुभवी कर्मचार्‍यांच्या पथकासोबत ही पोरं मेहनत घेताहेत. मुसळधार पावसानं अन् महापुराच्या पाण्यानं ओल्यागार झालेल्या भिंती, गुडघाभर चिखलात इलेक्ट्रिक फिटिंगची कामं धोक्याचीच. चुकून लाइट सुरू राहिली, तर खेळ संपलाच म्हणून समजा. पुरातल्या माणसांच्या मनात विजेची भीती जरा जादाच. त्यातच अज्ञानातून काहीतरी घडतं अन् होत्याचं नव्हतं होतं.वीज मीटर तपासून ते बदलणं, वायरिंग-बटणांचे बोर्ड साफ करणं, कोरडे करून दुरुस्त करणं हे तसं जोखमीचं काम. ते सगळं झाल्यावर पुनजर्ाेडणी. आयटीआयची टीम ही कामं लीलया करतेय. सोबत हॅण्डग्लोव्हज अन् मास्क. स्क्रू ड्रायव्हरपासून टेस्टर्पयतची हत्यारं. काही सामानसुमान लागलंच तर घरमालकाला सांगायचं आणून द्यायला.सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी काम संपेर्पयत पोरांची जुप्पी. सुरुवातीला घरच्यांना वाटायचं, लष्कराच्या भाकरी भाजतोय; पण नंतर लोकांनी नावाजलेलं बघून त्यांचीही कॉलर ताठ व्हायला लागली.हळूहळू सांगली पूर्वपदावर यायला लागलीय. घरं-बंगले माना वर काढायला लागलीत. दहा-बारा दिवस अंधारगुडूप असलेल्या गल्ल्यांमध्ये लाइटी चमकायला लागल्यात. ज्या पोरांना काय आयटीआय करतो म्हणून कुणी हिणवलं, आज तीच माणसं या पोरांचं कौतुक करत आहेत. त्यांच्या हातातलं कौशल्य आणि मनातली मदतीची भावना सार्‍याच गैरसमजांना पुरून उरत, यशाची वाट उजळत चालली आहे.

****

तासगाव तालुक्यातल्या निमणीचा विकास पाटील.वायरमन ट्रेडचा विद्यार्थी.तो म्हणतो, ‘हे काम करून भरपूर शिकायला मिळतंय. आयटीआयच्या कॅम्पसमध्ये नसतं मिळालं इतकं काम आणि प्रत्यक्ष करतोय. सप्लाय बंद केल्याची काळजी घेण्यापासून बोर्ड-वायरी साफ करेर्पयत सगळे धडे प्रॅक्टिकली मिळताहेत.’कवलापूरचा संदीप पाटील म्हणतो, ‘पहिल्यांदाच असं बाहेर गेलो. विजेच्या क्षेत्रात सेफ्टी सर्वात महत्त्वाची. ती यानिमित्तानं समजली. वायरी-बोर्ड खोलताना अडचणी आल्या; पण शिकत शिकत सराईत झालो. आम्ही लोकांच्या लाइटचं काम पैसे न घेता करतोय म्हटल्यावर लोकांनीही आम्हाला भरभरून आदर दिला.आयटीआयमध्ये एकूण 23 ट्रेड. त्यातल्या इलेक्ट्रिशियन-वायरमन, कारपेंटर, प्लंबिंग, रेफ्रीजरेशन आणि एअरकंडिशनिंग यांना महापुरानंतरच्या दुरुस्तीसाठी जास्त मागणी दिसतेय.‘भेदरलेल्या लोकांना धीर देत, सगळं नीट होईल बघा, असं सांगता सांगताच कधी कामं व्हायची, तेच समजायचं नाही,’ मिरजेजवळच्या सुभाषनगरचा रिबान सय्यद सांगतो.‘पहिल्यांदा वेळ लागायचा. आता मोठय़ा घराचं कामही वीस-पंचवीस मिनिटांत होतंय..’, बेडगचा निरंजन हिरेमठ सांगत होता.या मुलांकडे सांगण्यासारख्या कहाण्या तर आहेतच; पण हिंमतही आहे प्रश्न सोडवण्याची ! 

***सांगली आयटीआयचे प्राचार्य यतीन पारगावकर यांनी 19 अध्यापकांचा स्टाफ या मुलांसोबत दिला आहे. सगळे इन्ट्रक्टर उच्चशिक्षित, प्रशिक्षित. शशिकांत सुतार या मोहिमेचे समन्वयक. ते सांगतात, माणसं फोनवरून मिनत्या करतात. घरी गेलं की, अदबीनं वागतात. शंका विचारतात. काहीजण लाइटच्या बटनांजवळही जायला तयार नसतात. ‘जरा तुमीच जाऊन चेक करता का..’ हे ठरलेलं. बटनांच्या बोर्डात बसलेली गाळाची माती काढून बोर्ड कोरडे करणं, साफ करणं हे मोठं काम. त्याला हात लावायला कोणीच तयार नसतं. ही प्राथमिक अवस्थेतील मदत आहे. पूरबाधितांची प्राथमिक गरज पूर्ण करणं, त्याचवेळी त्यातून दुर्घटना घडू न देणं, हा आमचा मूळ हेतू आहे.’‘प्रत्येक ट्रेडच्या वेगवेगळ्या टीम केल्या. लोकांच्या कॉलनुसार किंवा निरोपानुसार त्या त्या ठिकाणी टीम पाठवतो. पण एखादी टीम गेल्यानंतर लोकांना वाटतं की, घरातली सगळीच दुरुस्ती लगेच झाली पाहिजे. एकाचवेळी विजेची उपकरणं, दरवाजे, मोटारी, फ्रीज, टीव्ही दुरुस्त व्हावीत, अशी अपेक्षा त्यांची असते. अर्थात त्यांना न दुखावता आम्ही दुरुस्ती करून देतोय..’ असं उमेश लोहार सांगतात.********चहाचं पाणीही नको वाटतं!मोबाइलवर कॉल नाहीतर मेसेज आला की, पोरं-शिक्षक मंडळी पदरमोड करून जातात. घरातनं सकाळी आणलेला डबा. तो दुपारी खायचा. नाही म्हणायला, दुरुस्ती झाल्यावर घरातली माणसं चहापाण्याचं विचारतात. पण पुरामुळं त्या घराची झालेली अवस्था बघून काळीज हलतं. सगळंच रया गेलेलं. कोंदट वास दाटलेला. श्वास घ्यायलाही अडचणी. घरातलं सामानसुमान तसंच पडलेलं, चार-चारदा धुतल्यानंतरही भिंती अन् जमीन सोडायला तयार नसलेली गाळाची पुटं. पोपडं धरलेल्या भिंती. त्यांना बुरशी लागलेली. फुगलेली दारं-खिडक्या-कपाटं. पोटात ढवळतं. मग लोकं विचारत असलेल्या चहाचं पाणीही नको वाटतं..

(लेखक लोकमतच्या सांगली आवृत्तीचे प्रमुख आहेत.)