शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

बस इतनासा ख्वाब है!

By admin | Published: October 23, 2014 3:35 PM

मनापासून जगावं,मनासारखं जगावं अजून वेगळं असतं काय लाईफ?

मै ऐसा  क्यूं हूं.?
 
रणबीर कसला दिसतो ना
आणि वरुण धवन तर यार कसला भारी दिसतो,
अजरुन कपूर, सिद्धार्थ मल्होत्र
कसले किलर लूक आहेत त्यांचे.
नाहीतर मी.?
बॉडी नाही, नुस्तं स्केलेटन आहे.
फोटो काढायला गेलं तर ङोरॉक्स येते, असले टिपीकल जोक आपण किती ऐकले याला तर काही सुमारच नाही.
वाट्टेल तेवढे ‘वेटगेनर’ आणले बाजारातून, कितीदा लावलं जीम, केळी तर काय रोज दोन दोन डझन हादडली.
पण नाही, वजनाचा काटा हलायचं नावच घेत नाही, ढीम्म कुठला.
आमच्या कॉलेजातही पोरं कसली स्मार्ट दिसतात, रस्त्यावर मिळणारी पाच-पाच रुपयाची गॉगल लावतात, शे-दीडशे रुपयांचे टाईट टीशर्ट घालतात आणि मिरवतात तरी इतके हॅण्डसम दिसतात.
आपल्याला येतही नाही, त्यांच्यासारखं बोलता, टमाटम बोलतात, भास मारतात, इंग्रजी-हिंदी अशी बेमालूम तडका मारत वापरतात की, त्यांच्या स्मार्टनेसला भलेभले फसतात, दिवाना बना देते है यार हे लोग.
आणि आम्ही? आमचं काही इम्प्रेशनच पडत नाही कुणावर? इम्प्रेसिव्ह असं काहीच नाही आमच्याकडं! ना आमचे आईबाप श्रीमंत, पैसेवाले, स्टायलिश, ते सामान्य. आम्ही तर अतिसामान्य.
मला कंटाळा येतो या अतिसामान्यपणाचा.
गर्दीत जर उभं केलं ना आम्हाला तर त्या गर्दीतल्या टिंबाएवढी किंमत नाही आपली असं वाटतं. 
कुठं गेलोच ग्रुपमध्ये तर आम्ही कायम असून, नसल्यसारखेच. 
तिथं लोकं गातात, गप्पा मारतात, हसतात, मुलींशी फ्लर्ट करतात, तबला वाजवतात, गिटार वाजवतात.तोंड भरुन असं काही गोड बोलतात की लोक पाहतच राहतात तो गोडवा.
आणि आम्ही?
आम्हाला मुलींशी धड बोलताही येत नाही.
त्यात आमचं रूप गबाळं, कुणी आम्हाला भाव देत नाही. गाता येत नाही, नाचता येत नाही, वाजवणं तर दूरच.
एकूण काय तर सिनेमात दिसतो तसा हिरोटाईप एकही गुण आमच्यात नाही.
अभ्यासातही आमचे दिवेच. जेममेत फस्टक्लास. त्याला कोण विचारतो. अभ्यास सोडून दुसरं काय येतं असं कुणी विचारलं तर उत्तर तेच.
विशेष काही नाही.
साला, ही काय आपली जिंदगी आहे?
सगळंच सामान्य. कोमट. मचूळ.
कशालाच चव नाही. आपण कितीही वल्गना केल्या तरी हातात फारसं काहीच नाही हे आपलं आपल्यालाच माहिती असतंच.
मला नेहमी आठवतं ते गाणं, रंगीलातल्या उर्मिलाचं.
(माङया मित्रंना हॉट उर्मिला आठवते, मला गाण्याचे शब्द, बघा आहे की नाही मी बोअर.)
तर, ते गाणं मला नेहमी म्हणतं,
‘कितने चेहरे मे अपने चेहरे की, पहचान तो हो . बडे बडे नामो में अपना भी नामोनिशान तो हो.’
-त्रस होतो मला हे गाणं ऐकलं की, वाटतं आपण किती फडतूस, किती सामान्य असावं माणसानं याला काही अंत आहे की नाही.
झुरळ झालंय आयुष्याचं.रेंगते रहो. आणि लोकं येतील पायाखाली कुस्करुन टाकतील.
नकोय मला हे आयुष्य.
नकोय हे नमककम जगणं.
 
******
यार, मै ऐसा क्यूं हूं.
मे ऐसा क्यूं हूं.
बदलता नाही का येणार हे जगणं?
उचकटून, खरवडून काढता नाही का येणार हे सामान्यपण अंगाला चिकटून बसलेलं.
आपण कुणीच नसणं, आपण ‘बंडल’च असणं,
हे किती काळ सहन करायचं?
आणि का सहन करायचं मी हे सारं?
मला राग येतोय,
सटकलीये आता माझीही.
पण मी हे सारं सांगणार कुणाला?
आणि सांगितलं तरी ऐकणार कोण?
 
******
असा संताप संताप मी नेहमी करुन घेतो.
नेहमीचं आहे हे,
सिनेमातले आवडते हिरो पाहतो तेव्हा,
कॉलेजातले भासमारु पाहतो तेव्हा,
खूप म्हणजे खूप स्मार्ट मुलं पाहतो तेव्हा,
हायफाय इंग्रजीवाल्यांचा रुबाब पाहतो तेव्हा.
श्रीमंती थाट पाहतो तेव्हा
मला खूप राग येतो या सुरकुतल्या
‘गरब्या’ चेह:याचा आणि त्याहून ‘गरीब‘ परिस्थितीचा.
 
******
खरं सांगतो, या सा:याचा चिखल झाला डोक्यात तेव्हा मीच स्वत:ला विचारलं की, हे असं सतत स्वत:ला हाडतूड करत राहिल्यानं काय साधणार आहे?
किती दिवस मी असं कुढत बसणार?
किती दिवस हे असं रडगाणं गाणार?
माङयात काय कमी आहे हे मला माहितीये, पाठ आहे.
पण माङयात काय आहे हे मी कसं बजावणार स्वत:ला? आणि जे आहे त्याचा उपयोग करुन मी कसं पुढे सरकणार?
सामान्य असण्याचा एवढा दुस्वास कशाला?
तो दुस्वास करण्यापेक्षा मी कामच असं काहीतरी खास करीन की, माङयासारख्या बाकीच्या सामान्य माणसांचं आयुष्य ‘खास’ बनून जाईन.
भाई, करने को तो हम भी बहौत कुछ कर सकते है.
अगर हौस्ले बुलंद है, तो क्या नहीं हो सकता.
या दिवाळीत मी ठरवलंय, पुसून टाकायची ही मनावरची काजळी.
आणि लख्खं उजळून टाकायचं आयुष्यही, मनही, मूडही आणि अवतीभोवतीचं जगही.
एक खयाल जिंदगी बदल सकता है.बदलेगा.जरुर!!