शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

हरवलेल्या तालसुरांच्या शोधात पाकिस्तानी तरुणाचा प्रवास : बागी फनकार!

By meghana.dhoke | Published: May 09, 2019 3:25 PM

जवाद शरीफ. एक तरुण पाकिस्तानी फिल्ममेकर. सिंधू नदीच्या खोर्‍यात एकेकाळी समृद्ध असलेलं संगीत, वाद्यं आणि कलाकार यांच्या शोधात तो फिरलाय. त्याची ‘इंडस ब्ल्यूज’ ही शॉर्टफिल्म सध्या जगभरातल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये नावाजली जातेय.

ठळक मुद्दे पाकिस्तानातही काही ‘सुलझे हुए’ लोक त्याच्या धाडसाचं कौतुक करताहेत; पण बाकी मात्र त्याच्या वाटय़ालाही भरपूर टीका, नालस्ती आली. 

- मेघना ढोके

कुछ ना कुछ तो करना ही था, तो बगावत कर दी.- तो दिलखुलास हसून म्हणाला; पण त्या म्हणण्यात एक असहाय हतबलता जाणवते. विषण्ण. उदास स्वर.विचारलंच त्याला, ‘फिर क्यूं किया यह मॅडनेस? आया कहॉँसे ये पागलपन?’तसा तो पटकन म्हणाला, ‘कोई कुछ भी कहें, गाली दे, इसका मतलब यें नहीं की हम रुक जाए.’थांबलं - नाकारलं आणि झापडं बांधून बसलं की काय होतं समाजाचं, माणसांचं आणि कलेचंही त्याचीच तर गोष्ट तो सांगतोय. आजच्या घडीला त्याची ही गोष्ट दुनियेनं डोक्यावर घेतली आहे; पण त्याच्या देशात मात्र त्याच्या त्या गोष्टीवरही ‘हराम’ लेबल चिकटलं आहे.जवाद शरीफ त्याच नावं. एक तरुण पाकिस्तानी फिल्ममेकर. त्याची ‘इंडस ब्ल्यूज’ ही शॉर्टफिल्म सध्या जगातल्या अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये नावाजली जातेय. पाकिस्तानातही काही ‘सुलझे हुए’ लोक त्याच्या धाडसाचं कौतुक करताहेत; पण बाकी मात्र त्याच्या वाटय़ालाही भरपूर टीका, नालस्ती आली. असं काय आहे त्याच्या फिल्ममध्ये?खरं तर काहीही ‘स्फोटक’ किंवा विशेष खास नाही.एक दिवस हा तरुण मुलगा उठला, त्यानं काही आपल्यासारखेच पागल जमवले आणि कॅमेरा घेऊन सिंधू नदीच्या खोर्‍यात फिरला. उभाआडवा फिरला. त्या एकेकाळच्या समृद्ध खोर्‍यात कोणे एकेकाळी सूरसाज झंकारले. लोकगीतांपासून ते गीत-संगीत ते थेट वाद्यवादनार्पयत माणसं तालात जगली. आज ते ताल-सूर हरवलेत, नुस्ते हरवलेच नाहीत तर संपण्याच्या वाटेवर आहेत, आणि जे उरलेत ते धर्मानुसार निषिद्ध आहे असं ठरवून ते वाजवणार्‍या साजिंद्याना भ्रष्ट ठरवणं सुरू झालं आहे. मात्र तरीही या मुलानं ठरवलं की, जे फनकार उरलेत त्यांना तर भेटू.कॅमेर्‍यासह त्यानं सिंधू नदीचं खोरं, ते अरबी समुद्राचा किनारा ते कराकोरम पर्वत रांगा पिंजून काढल्या आणि पाकिस्तानातल्या काही अनवट सुरील्या हरवल्या जागाही शोधल्या. तिथं भेटलेली मौसिकी, फनकार आणि त्यांचं आजचं जगणं, धर्माध माणसांनी जगण्यातून पुसून टाकलेले सूर हे सारं तो या आपल्या फिल्ममधून मांडत राहतो. त्या फिल्मचा यू टय़ूबवर उपलब्ध ट्रेलर पाहिला तरी कळतं की, हजारो वर्षाची संस्कृती, सांझी लोकसंस्कृती आणि लोकजीवन नाकारलं की माणसांचं काय होतं, जे कधीकाळी  समृद्ध होतं त्याला कसा चूड लागतो.

त्याच आगीत जगणार्‍या काही फनकारांना जवाद या फिल्ममधून भेटवतो. 9 वाद्यं, 11 संगीतकार यांची ही भेट. मात्र ते शुट करणंही सोपं नव्हतं. त्या फनकारांच्या गरीब फाटक्या घरांत तर सहज शूटिंग झालं; पण बाहेर शूटिंग होतंय, गाना-बजाना सुरू आहे असं कळताच अनेकदा कुठून कुठून तरुण जमा होत. हे बंद करा, म्हणून दादागिरी करत. त्यांचं एकच म्हणणं की, ‘ये बंद कर दो, ये हमारी सकाफत (संस्कृती) नहीं है!’ जवादला विचारलं की, का असं म्हणतात लोक? का नाकारतात हे सारं संस्कृती म्हणून.?तो सांगतो, ‘पाकिस्तानातली मोठी शहरं कराची, लाहोर, इस्लामाबाद, फैसलाबाद सोडून जरा आत जा, गावखेडय़ांत संगीत, वादन, गायन हे सारं निषिद्धच ठरवलं गेलेलं आहे. त्यात स्वातंत्र्यानंतर आमच्या पिढय़ांत मेंदूत असं रुजवण्यात आलेलं आहे की, जे जे भारताशी संबंधित ते ते आपलं नाही. कधी काळी जे संस्कृतीचा भाग होतं, जे आपल्याच मातीत जन्मलं, वाढलं तेही आपलं नाही असं म्हणून अनेक गोष्टी आम्ही ‘नाकारल्या’! संस्कृती नाकारली, इतिहास नाकारला, लोकजीवनात घट्ट रुतलेल्या गोष्टी नाकारल्या, मालकीच सोडून दिली. उरलं काय, डोक्यात काहीतरी टोकाचं, भलतंच.जवाद म्हणतो, ‘हुआ ये की ना फनकार बचें, ना मौसिकी, ना इज्जत और ना ही कुछ लगाव !’

आणि हे सारं जवाद फक्त सांगत नाही, तर त्यानंही स्वत:  वाढताना, हे सारं अनुभवलेलं आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातला हा मुलगा. ही फिल्म बनवण्याचा त्याचा ट्रिगरही त्याच्या वाढीच्या दिवसांत त्याला आलेल्या अनुभवातला असावा. त्याच्या घरच्यांना वाटायचं मुलानं चारचौघांसारखं काम करावं. जवाद सांगतो , ‘घरवाले कहते थे बेटा कुछ अच्छा काम कर, कुछ और कर, कुछ ऐसा कर जिससे इज्जत मिले.’ आपला मुलगा कलेशी संबंधित काही करणार आहे हे घरच्यांनाच मान्य नव्हतं, तिथं समाजात विरोध झाला याचं जवादला काहीही वाटलं नाही. तो सांगतोच, ‘हमारे दिमाग में ही ये पुश कर देते है, की मौसिकी इज्जतवाला काम नहीं है! मैने सोचा चलो, ना सहीं कर लेते है!’सिंधू नदीच्या खोर्‍यात मग तो फिरला. हरवलेली मरणपंथाला लागलेली वाद्यं त्यानं शोधली. असे लोक भेटले की, ते वाद्यं वाजवणारी तर आता शेवटची एकेक माणसं उरली आहेत. (पिढी नव्हे !) त्यातलंच एक उदाहरण सारंगीचं. संपूर्ण पाकिस्तानात आता सारंगी वाजवणारे दोन-तीनच कलाकार उरलेत. एकेक लोकवाद्यं तर अशी की, ती बनवणारी माणसंच नाहीत, वाजवणारा कुणी एकेकटा, एकांडा फनकार भेटतो. तोही गुपचूप वाजवतो. कुणाला कळलं तर काय ही भीती असतेच.ही माणसं एकेक करून संपली की, संपलं सगळं असं जवाद म्हणतो.  सिंधू नदीच्या काठांवरून ते संपू नये अशी त्याची कळकळ आहे. त्या कळकळीपोटीच त्यानं ही फिल्म केली आणि आता तो जगभर आणि पाकिस्तानातही आपली फिल्म दाखवत फिरतो आहे..

(लेखिका लोकमत वृत्तपत्रसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)meghana.dhoke@lokmat.com