शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जेएनयू :वादळ येऊन गेल्यानंतर सावरणार्‍या विद्यापीठातून फिरताना काय जाणवतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 6:55 AM

आंदोलने आणि हिंसाचाराच्या घटनेनंतर वाढलेला तणाव आता निवळू लागला आहे. अनेक विद्याथ्र्यानी घाबरून स्वतर्‍ला कोंडून घेतले होते. त्यांना धीर देऊन बाहेर काढण्यासाठी त्यांचेच मित्र-मैत्रिणी प्रयत्न करताना दिसतात.

ठळक मुद्देहिंसाचार झालेल्या साबरमती वसतिगृह परिसरात नाटकं, गाणी, चर्चासत्र सुरू झाली आहेत..

- उमेश जाधव 

सततच्या आंदोलनांमुळे गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ चर्चेत आहे. डाव्यांचा बालेकिल्ला अशीच या विद्यापीठाची ओळख आहे. मात्र, जेएनयूच्या गाभार्‍यात वेगवेगळ्या विषयांमधील संशोधने, विद्याथ्र्यामधील विविधतेतील एकता, शिक्षण घेणारे जगभरातील विद्यार्थी, अभ्यास, चर्चा, विचारांची देवाणघेवाण, सामाजिक सहवेदना अशा असंख्य गोष्टी दडलेल्या आहेत. आंदोलने आणि हिंसाचाराच्या घटनेनंतर वाढलेला तणाव आता निवळू लागला आहे. अभ्यासाला सुरुवात करण्यासाठी विद्यार्थी जमू लागले आहेत. गॅस आणि चहा बनवण्यासाठी आवश्यक असणार्‍या वस्तू जमवून विद्यार्थी आपल्या सहकार्‍यांच्या संरक्षणासाठी रात्रभर पहारा देत आहेत. विद्यापीठ परिसर पुन्हा सुरक्षित करण्यास आमचे प्राधान्य असून, विद्याथ्र्यासाठी पूरक वातावरण निर्मिती सुरू असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत.    

    लडेंगे और दिखा देंगे..कोणीतरी नाटकाची पत्रकं वाटतंय, कुठे सर्वसाधारण बैठकीबाबत चर्चा सुरू आहे, काहीजण सर्वाना चर्चेला उपस्थित राहण्याचे आवाहन करत आहेत तर काही विद्यार्थी हिंदी साहित्य आणि समाजशास्नवर चर्चा करत आहेत.. ऑगस्टमध्ये जेएनयूमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा असं उत्साही वातावरण अनुभवायला मिळालं होतं.जानेवारीच्या सुरुवातीच्या धुमश्चक्रीनंतर गेल्याच आठवडय़ात पुन्हा गेलो, तेव्हाही तोच उत्साह जाणवत होता मात्र त्याला 5 जानेवारीला घडलेल्या हिंसाचाराची काळी किनार होती. पण विद्याथ्र्याच्या चर्चा ऐकल्यानंतर असं काही घडलं होतं यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. कठीण प्रसंगातही सावरायचं कसं हेच हे विद्यार्थी दाखवून देत होते.      संसदेद्वारे कायदा करून 1969मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. त्याआधी 1 सप्टेंबर 1965 रोजी शिक्षणमंत्री एम.सी. छागला यांनी जेएनयूसाठी राज्यसभेत विधेयक मांडले होते. त्यावर बोलताना तत्कालीन खासदार भूषण गुप्ता म्हणाले की, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे देशातील इतर विद्यापीठांप्रमाणे नसावे. या विद्यापीठात सामाजिक शास्नंचे सखोल शिक्षण देण्याची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे अत्याधुनिक सोईसुविधांनी हे विद्यापीठ सज्ज असावे. समाजातील दुर्लक्षित घटकांना सामावून घेणारी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणारी व्यवस्था येथे असावी, नवनवीन कल्पनांना येथे वाव असावा, अशा अपेक्षा गुप्ता यांनी व्यक्त केल्या होत्या.जेएनयूमध्ये गेल्यानंतर या अपेक्षांची कितपत पूर्तता झाली याची कल्पना येते. देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेले अनेक विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. समाज ही संकल्पना विचारांच्या विविध कंगोर्‍यांमधून समजून घेत आहेत. चर्चा, वादविवाद, मतदभेद यांमुळे या विद्याथ्र्याचा दृष्टिकोन विकसित होत आहे. जेएनयू डाव्या विचारांच्या प्रभावासाठी ओळखले जात असले तरी या विद्यापीठात केवळ डावा आणि उजवा अशा दोन विचारांचा संघर्ष नाही. तर, लिऑन ट्रॉट्स्की, मानवेंद्रनाथ रॉय, माओ झेदाँग, कार्ल मार्क्‍स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेनिन या अनेक नेत्यांच्या विचारधारा अभ्यासणारे विद्यार्थी या विद्यापीठात आहेत. त्यामुळेच हे विद्यापीठ प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, विचारवंत घडवणारे केंद्र म्हणून ओळखले जाते. येथील विभागांची जागतिक पातळीवर दखल घेतली जाते. 2019 मध्ये अर्थशास्नतील नोबेल पुरस्कार मिळवणारे अर्थशास्रज्ञ अभिजित बॅनर्जी, विविध क्षेत्रांमधील संशोधक, प्रशासकीय अधिकारी जेएनयूमध्ये घडले आहेत.    साकेत मून हा मूळचा नागपूरचा असून, सध्या जेएनयूमध्ये इतिहास विषयात पीएच.डीच्या दुसर्‍या वर्षाला आहे. साकेत सांगत होता, 28 ऑक्टोबरपासून आम्ही शुल्कवाढीविरोधात आंदोलन सुरू केले. विद्यापीठात डावे आणि उजवे असे मतभेद असले तरी आमच्यात अबोला कधीच नसतो. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रत्येक विषयावर आम्ही चर्चा करतो. जेएनयूमध्ये आल्यानंतर आमच्या मनात नेहमीच घरी आल्यासारखी भावना असते. मात्र, हिंसाचारानंतर आमच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. आता विद्यापीठातील पूर्वीचे वातावरण पुन्हा तयार करण्यासाठी विद्याथ्र्यानी स्वतर्‍ जबाबदारी घेतली आहे. अनेक विद्याथ्र्यानी घाबरून स्वतर्‍ला कोंडून घेतले होते. आम्ही विद्याथ्र्यानीच मोर्चा काढून सर्व विद्याथ्र्याची भेट घेऊन त्यांना धीर दिला. एक हजार विद्यार्थी दररोज रात्री वसतिगृहाबाहेर बसून हिंसाचाराची भीती दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुन्हा हिंसाचार झाला तर त्याला हिंसाचाराने उत्तर देण्याची क्षमता आमच्यामध्ये निश्चितच नाही. पण सध्या परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचेच प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी हिंसाचार झालेल्या साबरमती वसतिगृह परिसरात नाटकं, गाणी, चर्चासत्र असे उपक्रम राबवले जात आहेत !’इथल्या अभ्यासाची पद्धतही देशातल्या इतर विद्यापीठांपेक्षा वेगळी आहे. साकेत सांगत होता, ‘देशभरातील इतर विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रम ठरलेला असतो. परीक्षा देण्याची पद्धतही ठरलेली असते. मात्र, जेएनयूमध्ये असे होत नाही. येथे शिक्षक प्रश्न देतात आणि उत्तर लिहिण्यासाठी सर्व स्वातंत्र्य दिले जाते. विद्यार्थी पुस्तके वाचून किंवा इंटरनेटवर शोध घेऊनही प्रश्नाचे उत्तर लिहू शकतो. विद्याथ्र्याना प्रश्नाबाबत शंका असेल तर ती शंका का आहे याचे कारणासह स्पष्टीकरण द्यावे लागते. हे जेएनयूमधील वेगळेपण आहे. केवळ पाठांतर करून परीक्षा देता येत नाही. बुद्धीला चालना देऊन, समाजातील सर्व घटकांचा चौफेर विचार करून परीक्षेत उत्तर लिहिणे अपेक्षित असते.’

    जेएनयूमध्ये गेल्यानंतर भिंतींवर रेखाटलेली चित्रे सर्वाचेच लक्ष वेधून घेतात. ‘वो मुझ पर पत्थर फेंकते रहे, मैं भारत की बेटीयों को पढाती गई’ हा सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष मांडणारा फलक असो, की सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका करणारे चित्र असो; हे सर्व विचार विद्यार्थीच भिंतींवर मांडतात. वसतिगृह शुल्कवाढ, शिक्षणाचे खासगीकरण, महिला सबलीकरण, पर्यावरण संरक्षण अशा वेगवेगळ्या महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर चित्रांच्या माध्यमातून मते मांडली जातात. पुस्तकांपेक्षाही चित्रे खूप काही सांगून जातात. त्यामुळेच वर्गात बसून समाजशास्र, अर्थशास्र, राज्यशास्र शिकण्याआधीच चित्रांच्या माध्यमांतून या विद्यापीठातले विद्यार्थी विविध सामाजिक विषयांना स्पर्श करतात. मात्र, दिल्ली डिफेसमेंट अ‍ॅक्टनुसार आता जेएनयूमधील बरीचशी भित्तीचित्रे हटवण्यात आली आहेत.    राज्यशास्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक हरिश वानखेडे सांगत होते,   ‘परखड टीकेमुळे जेएनयूमधील विद्याथ्र्याना सरकार शत्रू मानत आहे. बौद्धिक क्षमतेमुळे विद्याथ्र्याचे कौतुक करण्याऐवजी त्यांना नक्षली, गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या पाच-सहा वर्षात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, या परिस्थितीवर विद्यापीठ मात करेल. शैक्षणिक पातळीवर गेल्या सहा वर्षात जेएनयूबद्दल आदर वाढला आहे. विद्याथ्र्यावर टीका करून केवळ राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेएनयूमधील विद्याथ्र्याना वैचारिक लढाईची शिकवण दिली जाते त्यामुळे आमचे विद्यार्थी प्रत्येक परिस्थितीचा धैर्याने सामना करतील, असा विश्वास वाटतो !’    जेएनयूमधून बाहेर पडताना एका भिंतीवर लिहिलेल्या ओळी अस्वस्थ करून गेल्या. त्या अशा..हर गली कुचे में रोने की सदा मेरी है..शहर में जो भी हुआ है वो खता मेरी है.. 

*********

 ‘मामू का ढाबा’ आणि ‘चाय पे चर्चा’विद्यार्थी चळवळींबरोबरच जेएनयू खाद्यसंस्कृतीसाठीही ओळखले जाते. गंगा, मुघल दरबार, साबरमती हे ढाबे प्रसिद्ध आहे. साबरमती ढाब्यातील पकोडे आणि चहाला सर्वाधिक मागणी असते. सायंकाळच्या वेळी येथे विद्याथ्र्याची गर्दी असते. मध्यरात्रीर्पयत येथे विद्याथ्र्याची ‘चाय पे चर्चा’ सुरू असते. पकोडय़ांबरोबरच ऑमलेट, सँडवीच आणि चहाचा आस्वाद घेत विद्यार्थी विचारांची देवाणघेवाण करतात. विद्यापीठातील प्रत्येक विभागामध्ये उपाहारगृहाची व्यवस्था आहे. येथे चहा, नास्ता आणि काही विभागांमध्ये भोजनाचीही व्यवस्था आहे. त्यासाठी आकारला जाणारा दरही माफक आहे. ब्रrापुत्रा वसतिगृहातील भोजनाची व्यवस्था सवरेत्तम आहे. केवळ पीएच.डीच्या विद्याथ्र्यासाठी हे वसतिगृह असल्याने जेवणाची गुणवत्ता उत्तम आहे. उर्दू भाषेत पीएच.डी. केलेल्या विद्याथ्र्यानेच सुरू केलेला ‘मामू का ढाबा’नेही वेगळेपण जपले आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्याथ्र्याकडून दरवर्षी 26 जानेवारीला फूड फेस्टिव्हल होतो. बांगलादेश, नेपाळ, अफगाणिस्तान, श्रीलंका या देशातील विद्यार्थी या फेस्टिव्हलमध्ये आपल्या संस्कृतीची ओळख करून देतात. या फेस्टिव्हलमध्ये सर्वानाच आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्याची संधी मिळते.