शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नोकरी गेली , पगार कमी झाला, लोक  काय  म्हणतील  याची  भीती  वाटते ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 7:04 PM

आपलं कार्यालयातील पद मुळात पर्मनन्ट नव्हतंच कधी! पर्मनन्ट आहेत फक्त आपली कौशल्यं, बुद्धी आणि अनुभव. ते तर कुणीच हिरावून घेऊ शकत नाही.

ठळक मुद्देहा पॉज आहे. जरा शांत व्हा. थोडं थांबा. मग धावायचंच आहे थोडय़ा दिवसात. 

- डॉ. हरीश शेट्टी ( सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ)

1) अचानक जॉब गेला तर काय, याचं फार टेन्शन आलंय असं अनेक तरुण म्हणतात, अनेक जण त्याच धास्तीत आहे, त्याचा ताण आला आहे, त्यांना काय सांगाल? हा ताण कसा हाताळायचा?

 मला जॉब नाही मिळणार, आणि मिळाला नाही तर माझं काही खरं नाही हे आधी मनातून काढून टाका. कोरोना संसर्गाहून अधिक वेगात पसरणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे कोरोनाचं भय.आजचं भय, उद्याचंही भय. परिस्थितीकडे पाठ करून हे भय जाणार नाही हे जितकं खरं तितकंच हे भय मनातून आधी काढायला हवं हेही खरं.ते मनातून आधी काढून टाकायला हवं. ते कसं काढणार? तर अँजिओप्लास्टी जशी हृदयविकार असलेल्या रुग्णांना वाचवते, तसा योग माणसाच्या मेंदूला भयापासून वाचवतो. शिवाय व्यायाम करत राहिलं तर शरीरही तणावमुक्त राहातं. योग मेंदूला संतुलित राहायला शिकवतो.काळ कुठलाही असो, मन आणि शरीराचा संवाद होत राहायला पाहिजे. योग्य प्रमाणात व्यायाम आणि झोप पाहिजे. माइंड आणि बॉडी डिसिप्लिनही या काळात फार महत्त्वाची गोष्ट आहे. काळ खडतर आहे, हे दिसतं आहे.  मनात सतत विचार येणार, तुम्ही विचलित होणार हे नक्की. पण त्या विचारांवर ओव्हररायटिंग करा. म्हणजे स्वत:ला सांगायचं, मी यावर मात करणार! मी टिकून राहणार! मी कुठल्याही परिस्थितीचा उत्तम सामना करणार. हे असं केलं तरंच तुमचा मेंदू तुम्हाला हजारो क्रिएटिव्ह पर्याय शोधण्याची संधी देईल. मार्ग सापडतील. मन आणि शरीर यांचा एक मेलिडियस ऑर्केस्ट्रा झाला पाहिजे. तर मग हा अतिविचारानं येणारा ताण कमी होईल आणि सकारात्मक पर्याय सुचतील.अजून एक, गरज असेल तर कुणाकडेही मदत, आधार मागण्यात संकोच करू नका. आज हरेकजण आपापल्या पातळीवर लढतोय. स्वत:च्या आत आणि बाहेरही संघर्ष करतोय. तुम्ही एकटे नाही. एकमेकांना आधार द्या, आधार घ्या. यातून अधिक ताकदवान बनण्याचे, टिकून राहाण्याचे चांगले मार्ग सापडतात.

2) नोकरी तर टिकली. पगार कमी झाला, जबाबदा:या फार, पैशाची सोंगं कशी आणणार, कुठून आणायचा मानसिक धीर, असं कुणी विचारलंच तर काय सांगाल?

आता हे जरा ओल्ड फॅशन्ड वाटेल तरुण मित्नांना, पण कुटुंबाचा आधार कायम घट्ट धरून ठेवा. तुमचा जॉब याच काळात नाही कधीही जाऊ शकतो; पण कुटुंब कायम सोबतीला असतं. इट इज अ पर्मनन्ट एंटिटी. कुटुंबातल्या सदस्यांसोबतची इमोशनल साखळी तुम्ही टिकवून ठेवली पाहिजे. चांगल्या मित्नांच्याबाबतही हेच म्हणता येईल. एकमेकांना जगवा, तगवा.नोकरी नसेल तर उद्योग करा, उद्योग शक्य नसेल, लघुउद्योग करा. ऑनलाइन काही न काही काम करा. माङया ओळखीत काही तरु ण मित्न आहेत, जे ऑनलाइन पेंटिंग्ज विकतात. स्वत:ची चित्र नाही. ते फक्त चित्नकार आणि ग्राहकांमधला दुवा बनलेत. चित्रंचं मार्केटिंग हे आपण कधी ऐकलं होतं का; पण त्यांनी शोधून काढलं.अशा अनेक गोष्टी तुम्ही शोधू शकाल. हे तितकंसं सोपं नसेल, नाही. पैशाची सोंगं नाहीच आणता येत. काटकसर करावीच लागेल; पण तगून राहावं लागेल. त्रस होईल, पण जमेल. जमवावंच लागेल.भारताचा इतिहास पाहा. जास्त मागे जायला नको. अगदी गेल्या पन्नास वर्षात पाहा. सातत्याने नैसर्गिक आपत्ती येतच आहेत. दुष्काळ, महापूर, चक्र ीवादळं. त्या-त्या राज्यातले लोक मोडून न पडता परत परत नव्यानं उभे राहिले. निसर्गाशी, आयुष्याशी शक्य तितकं जुळवून घेत त्यांनी सतत नव्यानं स्वत:ला शोधलं. दुष्काळ आले, निघूनही गेले. लोकांनी खचून न जाता तग धरला. हे कधीतरी संपणार आणि आपलं जीवन पुन्हा सुरू होणार याची त्यांना खात्नी होती.नोकरी गेली तर गेली, पगार कमी झाला तर झाला. कुणी विचारलंच तर हे न संकोचता जगाला सांगा. त्यात कमीपणा काही नाही. चूक काही नाही आपली. उलट जवळच्या माणसांना हे सांगितलं तर त्यातून मदत मिळेल.  सध्या सगळे कमी-अधिक याच अवस्थेतून जात आहेत.  आपलं कार्यालयातील पद हे कधीच आपल्या माणूसपणापेक्षा मोठं नव्हतं. आजही  नाही. नसू द्या, ते मुळात पर्मनन्ट नव्हतंच कधी! पर्मनन्ट आहेत तुमची कौशल्यं, बुद्धी आणि अनुभव. ते तर कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. आता जरा कठीण काळ आहे तर केक-आंबा न खाता केळी खा. दिवस चांगले असोत की वाईट. शेवटी स्वीकार, समायोजन तर कुठल्याही परिस्थितीत पाहिजेच. ते शिकण्याची ही संधी आहे. आयुष्य पुढं जातच असतं. तुम्ही नका थांबू. हे सगळं नॉर्मलच आहे.  न्यू नॉर्मलचा हा एक भाग आहे. तरुण तर नवनवीन गोष्टींना अॅडॉप्ट करण्याबाबत जास्त हुशार असतात.मन घाबरेल, जास्तच अस्वस्थ होईल, तेव्हा ज्योतिषाकडे न जाता मानसोपचारतज्ज्ञ शोधा. शरीराच्या एखाद्या अवयवासारखं मनही फ्रॅक्चर होऊच शकतं की!  फॅमिली डॉक्टरसारखाच फॅमिली सायकॉलॉजिस्टही शोधा.कुठलीच गोष्ट आयुष्य थांबेल, संपेल इतकी महत्त्वाची नसते. हे ही दिवस जातील.

3) घरचे म्हणतात लग्न कर, आता आर्थिक स्थिती अशी की कसं करणार लग्न? त्यात एकटेपणा आहे तो वेगळाच.

हो, सध्या असे अनेक जण माङयाकडे हा प्रश्न घेऊन यायला लागलेत. त्यात तरु णांसह पालकही आहेत. लग्न हा एक मस्त, महत्त्वाचा टप्पा आहे खरा; पण सध्या महत्त्वाचे वाटणारेही टप्पे थोडे पुढे ढकलताच येतील. उद्या चांगला असण्यासाठी आज थोडंसं थांबताच येईल.  घराच्या एका खोलीत आग लागली असेल तर दुस:या खोलीची आपण रंगरंगोटी नाही न करत बसत? तसंच आहे हे. आजचे महत्त्वाचे प्रश्न पाहा. लग्नाचं मग पाहा. ठरलं असेल तर काही काळ पुढे ढकला.  जरा प्री-वेडिंग मैत्नीची मज्जा घ्या. काही आभाळ कोसळत नाही. फक्त कुठलाही निर्णय समाजाचा दबाव घेऊन करू नका. समाज, त्याची धोरणं काळानुसार बदलतच राहातात. तुम्ही आनंदी नसाल, तर त्यांचं दडपण घेऊन का जगायचं?शिक्षण, नोकरी, लग्न.. काहीही असेल. हे आयुष्यातलं एक वर्ष जरा आराम करा. जरा  पॉज व्हा. 

4. सध्या तुमच्याशी जी तरुण मुलं बोलतात, त्यांना कोरोना काळात कुठले ताण जास्त छळताना दिसतात?

बरेच मुलं सांगतात, मी कॉलेजला जाऊ शकत नाही, मित्नांना भेटू शकत नाही, माझं शिक्षण, परीक्षा, फ्यूचर यांचं काय होईल? असे एक ना हजार प्रश्न तरुण मुलं सध्या फोन, ई-मेल, व्हॉट्सअॅपवरही विचारतात.अनेक जोडपी लग्न करून परदेशात जाणार होती. कुणाला विदेशातल्या मोठय़ा विद्यापीठात शिकायला मिळणार होतं. सगळ्यावर तात्पुरतं पाणी फिरलंय. अनेकांमध्ये याच्या टोकाच्या प्रतिक्रियाही दिसतात. स्वत:वर किंवा कुटुंबावर राग काढला जातो, लहान-मोठी हिंसाही घडताना दिसते. अशा काळातच योग्य ऐकणारा कोणी मिळणं, सोबतच समुपदेशनही होणं गरजेचं आहे. नसता अनेक जण यातून दीर्घकाळ नैराश्यात जाण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे आधी म्हटलं तेच, हा पॉज आहे. जरा शांत व्हा. थोडं थांबा. मग धावायचंच आहे थोडय़ा दिवसात. 

मुलाखत आणि शब्दांकनशर्मिष्ठा भोसले