शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

जिम लावताय? या गोष्टी तपासल्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 3:39 PM

जिम लावलं की झटकेपट रिझल्ट हवेत म्हणून नेमक्या काय काय चुका होतात?

ठळक मुद्दे यावर्षी जिम लावणार असाल, व्यायामाला सुरुवात करणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा!

- प्रज्ञा केळकर-सिंग

थंडीची चाहूल लागली की, पहिला विचार आपल्या मनात येतो, आता व्यायाम करायला हवा! यंदा करायचंच फिटनेसवर काम अशी ऊर्मी मनात अशी उसळी मारते की लगेच जवळपास जिम आणि व्यायामशाळांची शोधाशोध सुरू होते. कुणाला कधीची सायडिंगला लावलेल्या सायकलची याद येते तर कुणी धावणं हाच सर्वोच्च व्यायाम हे ग्यान गूगलवर प्राप्त करून आता उद्यापासून पळूच असं म्हणू लागतं. कुणी योगक्लासला लगेच अ‍ॅडमिशन घेऊन टाकतं; मात्र व्यायाम निवडताना आपण योग्य तेच करू आणि चुकीचा मार्ग अवलंबला जाणार नाही, चुकीचं डाएट घेतलं जाणार नाही, व्यायामाचा निर्णय हा केवळ अळवावरचं पाणी ठरणार नाही, याची काळजी पण घ्यायलाच हवी.व्यायाम मोहिमेचा अनेकदा घात होतो तो याच टप्प्यावर!जिमला जायला सुरु वात केल्यानंतर आपल्यासारख्याच अनेक जणांना व्यायाम करताना पाहून नक्कीच प्रोत्साहन मिळतं. मात्न, एरव्ही नियमित व्यायामाची सवय नसल्यानं दोन-तीन दिवसांतच थकवा जाणवायला लागतो. काहीजण महिनाभर उत्साहाने जिमला जातात आणि एका महिन्यात वजनात कमालीचा फरक दिसावा अशी अपेक्षा करतात. त्यासाठी ओव्हर एक्सरसाइजही करायला लागतात; मात्न हा मार्ग घातक आहे असं फिटनेस एक्सपर्ट सांगतात.त्यात अजून एक गैरसमज म्हणजे तरुणांचा व्यायाम वेगळा, तरुणींचा वेगळा. तो ही निव्वळ गैरसमज. व्यायामात स्त्नी-पुरु ष असा भेद नसतो. वेट ट्रेनिंग केवळ पुरु षांनी करावं आणि स्त्रियांनी केवळ कार्डिओ करावं हा निव्वळ भ्रम आहे. दोघांनाही कार्डिओ, झुंबा, वेट ट्रेनिंग प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे आवश्यक असते. त्यामुळे यावर्षी जिम लावणार असाल, व्यायामाला सुरुवात करणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा!

प्रोटीन पावडर घेण्यापूर्वी.

जिम लावलं की बरेचदा प्रोटीन पावडर, सप्लिमेण्ट घ्या असं सांगितलं जातं. बॉडी बिल्डिंगला मदत होते असा सल्ला मिळतो. दुसरीकडे हे प्रोटीन सप्लीमेंट शरीराला अपायकारक  असतं अशीही चर्चा होते. मग त्यात खरं काय, तर फिटनेसतज्ज्ञ सौरभ साहू सांगतात, प्रोटीन पावडर आणि स्टिरॉइड यात मूलभूत फरक आहे. स्टिरॉइड सेवनाला भारतात परवानगी नाही; मात्र काही ठिकाणी प्रोटीनच्या नावाखाली स्टिरॉइडचं सेवन केलं जातं. ते शरीरास अपायकारक असते. याउलट, प्रोटीन योग्य प्रमाणात घेतल्यास शरीराला कोणताही अपाय होत नाही. शरीराची गरज भागविण्यासाठी प्रामुख्याने व्हे प्रोटीन एक्सट्रॅक्ट दिलं जातं. दूध फाटल्यावर वर उरलेल्या पाण्यामध्ये व्हे प्रोटीन असतं. ते शरीरास उपयुक्त असतं. दररोजच्या आहारातून जे घटक मिळू शकत नाहीत, ते सप्लीमेंटच्या माध्यमातून योग्य पद्धतीने दिले जातात; मात्र योग्य डॉक्टरच्या सल्ल्यानं ते घ्यावेत.

प्रोटीन किती लागतं शरीराला?प्रत्येकाच्या व्यायाम पद्धतीवर प्रोटीन सेवनाचे प्रमाण ठरते. फारसा व्यायाम न करणार्‍यासाठी पाउण्डमधील वजन गुणिले 1 इतके ग्रॅम प्रोटीन दिवसाला आवश्यक असतं. मध्यम व्यायाम करणार्‍यासाठी पाउण्डमधील वजन गुणिले दीड ग्रॅम तर दररोज भरपूर व्यायाम करणार्‍यासाठी पाउण्डमधील वजन गुणिले दोन इतकं ग्रॅम प्रोटीन दर दिवशी आवश्यक असतं. सुरु वातीचे व्यायाम प्रकार सर्वासाठी सारखे असतात. हळूहळू त्यात लेव्हल 1, 2, 3 प्रमाणे बदल केले जातात.हिवाळ्यात वातावरणही आल्हाददायक असतं. डिहायड्रेशन कमी होतं. त्यामुळे अनेक जण उत्साहाने व्यायामाला सुरु वात करतात. हा उत्साह मात्न कायम टिकायला हवा, तरच फिटनेस मिळविता येऊ शकेल. व्यायाम आणि आहार यांचा योग्य समन्वय साधायला हवा. दोन्ही परस्परपूरक ठरावे यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. चुकीचे व्यायाम प्रकार आणि अयोग्य डाएट शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकतं. - सौरभ साहू( फिटनेस एक्सपर्ट)

डाएट प्लॅन करताय? वजन वाढविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी व्यायामाला योग्य पोषक आहाराची जोड आवश्यक असते. जिममधून व्यायाम करताना डाएटिशियनकडून बरेचदा टोकाचं डाएट सुचवलं जातं. बरेचदा दोन-तीन महिन्यांचा एखादा कोर्स करून हे तथाकथित डाएटिशियन जिमशी जोडले जातात. एखादा पदार्थ आहारातून पूर्ण हद्दपार केला किंवा एकाच पदार्थाचं जास्त सेवन केलं तर न्यूट्रिशन डेफिशियन्सी होऊ शकते. मुळात, आहाराचे नियोजन तात्पुरते करून चालत नाही. त्यासाठी आपली शरीराची ठेवण, बॉडी मास इंडेक्स, फॅमिली हिस्ट्री, मानसिकता अशा अनेक बाबींचा विचार करून तज्ज्ञ डाएटिशियन आहार सुचवितात. आहाराचा विचार असा करायला हवा.- डॉ. अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ