शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

करायचं डेअरिंग

By admin | Published: October 13, 2016 8:28 PM

रस्ते कुठंकुठं आठपदरी, चकाचक होते कुठकुठं बिनकठड्याचे, रस्तेच नसलेले असे रस्तेही दिसले, पण तरीही, ठरवलंच..

- मुकेश ताजणे

रस्ते कुठंकुठं आठपदरी, चकाचक होते कुठकुठं बिनकठड्याचे, रस्तेच नसलेले असे रस्तेही दिसले,पण तरीही, ठरवलंच..तसं गाडी चालवण्याचं काही टेन्शन नव्हतं, पण देशाच्या पूर्ण दोन टोकांपर्यंतचा प्रवास करायचा म्हणजे रोज किती किलोमीटर गाडी चालवायची याचं काही गणित नव्हतं!

‘साऊथ’ला रस्ते तर खूपच छान होते. सरळ, चकचकीत, मोठमोठ्या लेन्स. गाडी चालवणं सोपं होतं. फक्त हाल होते ते खाण्यापिण्याचे! ते ‘पोंगल आणि डोसे’ यांच्याशी काही माझं जमत नव्हतं. जेवायचे हाल नाही झाले, पण पोटापुरता आधार कुठंतरी होऊन जायचा!

पण पेडाकुट्टा तंडा नावाच्या हैद्राबादजवळच्या एका गावात पोहचलो एका रात्री. त्या गावातले खूप लोक हायवेवर अ‍ॅक्सिडेण्टमध्ये गेले होते. इतकी गरीबी, एक कुठली तरी फॅक्टरी फक्त होती तिथं लोकं कामाला जायचे. मला खूप वाईट वाटलं तिथं की, रस्त्यावर एवढी डेव्हलपमेण्ट दिसतेय, पण या लोकांना खायला नाही. इथं कधी येणार विकास? 

आणि पुढं नॉर्थला जाताना तर नागपूर सोडलं तसा रस्ता खराब. आणि जम्मूला पोहचलो, जवाहर टनेल क्रॉस केलं तसं तिथं लोक सांगत होते की, ‘अंदर, आगे मत जाओ!’पण इथवर आलोय तर काश्मिरला जायचंच असं सोबतचे पत्रकार म्हणत होते, त्यांनी ठरवलंच पुढं जायचं तर आपणही डेअरिंग करायचंच असं मी ठरवलं होतं.

निघालो पुढं. पण जम्मू-श्रीनगर रस्ता खार खराब, अवघड होता. उंच दरी, त्यातून ती झेलम नदी वाहत होती. सुंदर होतं दृश्य पण एक नजर तिच्याकडे पाहण्याची सोय नव्हती. एक सेकंद जरी नजर हलली असती तरी काहीही होऊ शकलं असतं.

एका तर एरियाचंच नाव होतं, शैताननाला. तिथं खूप अपघात होतात, पाण्यात गाड्या वाहून जातात असं लोक सांगत होते. अपघात झालेल्या गाड्या दिसतही होत्या. डेंजर होता तो रस्ता. पण ‘डेअरिंग’ केलं होतंच तर मागे हटणार नव्हतोच. परतीच्या वाटेवर तर रात्रीबेरात्री घाटातून गाडी चालवली. एकावेळेस दोनच गाड्या जातील असे रस्ते होते, तिथंही गाडी चालवताना खूप रिस्क होती.पण कशाचं टेन्शन नाही घेतलं, मी मनाला एकच सांगत होतो की, एवढ्या दूर आलोय तर, नवीन काहीतरी बघायला भेटेल!

खूप नवीन गोष्टी, पूर्ण देशच पहायला भेटला. अनुभव आले. एकदम लक्षात राहण्यासारखी, जन्मभर आठवेल अशी एक काही हजार किलोमीटरची ट्रीप झाली! खूप यादगार राहिला हा अनुभव..( लोकमतच्या नागपूर आवृत्तीत वाहनचालक आहेत.)