मालिया ओबामा अलिकडेच मियामी बेटावर सुटीसाठी गेली. तिथं तिनं पोलका डॉट्स ड्रेस घातला. तो जगभर व्हायरलही झाला. इकडे आपल्याकडेही करीना, करीश्मा, दीपीका, सोनम, प्रियांना हल्ली सर्रास पोलका डॉट्स ड्रेस घालून मिरवताना दिसतात.पोलका डॉट्सची ही फॅशन नव्यानं आली आहे. अतिशय सोज्वळ तरीही उठावदार, कॅज्युअल ते आॅफिस ते अगदी डिनर डेट ला शोभून दिसेल असे हे पोलका डॉट्स.तसे हे पुर्वीपासूनच पोल्का डॉट्स सर्वपरिचित आहेत. यावर्षी डिझायनर्सनी नी ब्लॅक अँड व्हाईट पोल्का ला प्राधान्य दिलेलं पाहायला मिळते. आता प्रश्न हाच की, आपण ते कसे घालावेत.कापड कुठलं निवडता?जॉर्जेट, शिफॉन, रेयॉन आणि होजिअरी इत्यादी कापड प्रकारात पोल्का टॉप्स आणि ड्रेसेस उठून दिसतात. यामध्ये हाय- लो, लेअर, शिफ्ट ड्रेस, फ्रंट कट, फ्रंट फ्रील या स्टाइल्सचा प्रयोग करता येईल. आवडीनुसार बाह्यांमध्ये वैविध्य आणता येईल. स्लिव्हलेस, हाल्फ स्लिव्हस तसंच फुल लेंग्थ स्लिव्हस सुद्धा छान दिसतात. प्लेन कापड आणि पोल्का डॉट्स याचं कॉम्बिनेशन केलेला टॉप किंवा ड्रेस सुद्धा सुरेख दिसतो.
पोल्का लेअर, स्टोल, धमप्लेन टी- शर्ट, ड्रेस वर पोल्का डॉट्स चा स्टोल, कार्डिगन किंवा श्रग हे क्लासी स्टाईल स्टेटमेंट आहे. अतिशय साधे आणि मिनिमल, कुठल्याही वेळेस शोभेल असे पोल्का लेअर तरु णींपासून मध्यमवयीन महिलांच्या पसंतीस पडताना दिसतात.अचानक ठरलेल्या कॅज्युअल आऊटिंगसाठी, प्रवासासाठी ट्रेंडी दिसायचं असेल आणि झटपट तयार व्हायचं असेल तर पोल्का डॉट्स उत्तम.