शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

गुगल लोकेशन चालू ठेवा नाहीतर बंद, गुगल तुम्हाला ‘लोकेट’ करतंय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 5:29 PM

गुगल पीछे पीछे आए.

ठळक मुद्देआपल्या खासगीपणावर डोळा आहे, हे विसरू नका.

- प्रसाद ताम्हनकर

 जगात काहीही शोधायचं असो, आपण गुगल करतो. गुगल करेंगे हाच आपला नारा. मात्र गुगलच्या मागेही सध्या भलतीच पीडा लागलेली आहे. यूझर्सच्या नकळत त्यांच्या मोबाइलमधील डेटावरती आणि इतर वापरल्या जाणार्‍या अ‍ॅप्लिकेशनच्या वापरावरतीही गुगल चोरून लक्ष ठेवत आहे असा आरोप गुगलवरती करण्यात आला होता. त्यात आता पुन्हा एकदा गुगलच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. आणि हे कुणी बाहेरच्या माणसानं नाही तर यावेळी चक्क गुगलच्याच  इंजिनिअरने या प्रकरणाला वाचा फोडली आहे. वादाला कारणीभूत ठरली आहे, ती गुगलची  ¬ Google Location Tracking Surveillanceही सेवा. 

आपण विचार तरी करतो का, सतत फोनवर लोकेशन ऑनच असतं; पण आता आरोप असा करण्यात येतोय की, लोकेशन बंद ठेवल्यानंतरदेखील यूझर गूगलच्या रडारावरती दिसतो. हा खुलासा गुगलच्याच इंजिनिअर्सनी केला आहे. गुगलच्या लोकेशन अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅपमध्ये काही त्रुटी आहेत आणि प्रायव्हसी सेटिंगमध्येच असलेल्या या त्रुटींमुळे हे अ‍ॅप पूर्णपणे सुरक्षित नाही. तीनच महिन्यांपूर्वी या संदर्भात अ‍ॅरिझोना प्रांताच्या एटर्नी जनरलनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत गुगल गोळा करत असलेल्या डेटा संग्रहणाच्या प्रक्रियेवरती शंका उपस्थित करण्यात आली असून, ही डेटा संग्रहण पद्धती म्हणजे राज्याच्या ग्राहक फसवणूक कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप त्यात लावण्यात आलेला आहे. यापूर्वी 2018 साली असोसिएट प्रेसने ग्राहकांच्या होणार्‍या फसवणुकीवरती एक रिपोर्ट बनवला होता. त्या रिपोर्टमध्येदेखील याबद्दल उल्लेख करण्यात आला होता. खरं तर लोकेशन सव्र्हिस ऑफ केली की ती परत चालू करेर्पयत ऑफच राहायला हवी. मात्र गुगलच्या या सेवेमध्ये ती ऑफ केल्यानंतर, कधी ऑफ अर्थात बंद राहाते तर कधी चालूच राहाते ही सगळ्यात मोठी त्रुटी समोर आली आहे.त्यामुळे आपल्या खासगीपणावर गुगलचा डोळा आहे, हे विसरू नका.