-भाग्यश्री मुळे
कोरोनाने जगभर लोक भयभीत झाले आहेत. दवाखाने, प्रयोगशाळा, कोरोना टेस्ट, क्वॉरण्टाइन सेंटर या गोष्टींचे नाव काढलं तरी भीती वाटायला लागते. अशा या गंभीर काळात पर्यावरणाचे भान ठेवून केरळच्या लक्ष्मी मेनन यांनी पीपीई सूट शिवताना उरलेल्या कपडय़ापासून गाद्या बनविण्याची किमया केली आहे. पीपीई सूट शिवून झाले की, जे कापड, त्याच्या चिंध्या उरतात त्याचं काय करायचं हा एक विगतवारीचा, कच:याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न होताच.दुसरीकडे त्यांना हेही समजत होतं की वाढत्या कोविड रु ग्णांना बेड मिळत नाही.त्यातून त्यांनी मग चिंध्यातून एक भलताच मार्ग काढला. केरळच्या एर्नाकुलम येथील लक्ष्मी मेनन यांनी पीपीई सूट बनवताना उरलेल्या तुकडय़ांपासून सुंदर गाद्या तयार केल्या आहेत. या गाद्यांना त्यांनी ‘शय्या’ असे समर्पक नावही दिलं आहे.त्या ‘प्युअर लिव्हिंग’ नावाच्या संस्थेच्या संस्थापकही आहेत. ही संस्था शाश्वत जीवनशैलीसाठी पर्याय शोधण्याचे काम करते. केरळात 9क्क्हून अधिक पंचायती आहेत आणि मोठय़ा संख्येने किमान 5क् बेड असेलेली कोरोना केंद्र आहेत. त्यामुळे या क्षणाला गाद्यांची मोठी गरज आहे. कोरोना रु ग्णांना लागणा:या बाजारातल्या गाद्या महाग असतात आणि त्या बदलाव्या लागतात, नीट स्वच्छ कराव्या लागतात. चादरी तर फेकूनच द्याव्या लागतात. त्याला या गाद्यांचा त्यांनी पर्याय शोधला आहे.सध्या दवाखान्यांमधील कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणात पीपीई किटची मागणी होत आहे. त्यामुळे अनेक टेलर आणि कंपन्या या व्यवसायात उतरल्या आहेत. केरळातल्या काही टेलरकडे तर दर दिवशी 2क् हजार पीपीई किटची मागणी नोंदवली जात आहे. स्वाभाविकच तिथले कर्मचारी दिवसरात्र काम करून किट तयार करत आहेत. यात मोठय़ा प्रमाणात तुकडे, उरलेल्याचा कचरा जमा होत आहे. या वाटरप्रूफ मटेरिअलमध्ये विघटन न होणारे प्लॅस्टिक मोठय़ा प्रमाणात आहे. जे तसेच टाकून दिले तर पर्यावरणाला हानिकारक ठरू शकते. ते नीट नष्ट केले गेले पाहिजे; पण छोटय़ा व्यावसायिकांना ते शक्य होत नाही.
ैही गोष्ट लक्षात घेऊन लक्ष्मी यांनी या उरलेल्या तुकडय़ांपासून या गाद्या बनवल्या आहेत. त्या वजनाने खूप हलक्या आहेत. चटईप्रमाणो त्यांची वळकटी करता येते. तुकडे एकमेकांमध्ये गुंफून निर्धारित लांबी रुंदीची गादी तयार केली जात आहे. तीन महिला मिळून एक गादी तयार करत असून, प्रत्येक महिलेला 3क्क् रु पये रोज असे मानधनही दिले जात आहे. कुठलीही सुई किंवा दोरा न वापरता या गाद्या बनत असून, त्या मजबूत आणि आरामदायी होत आहेत. गादीचं मटेरिअल वाटरप्रूफ असल्याने साबणाने धुता येऊ शकते. वाळत घालता येऊ शकते. लक्ष्मी आणि त्यांच्या सहका:यांनी आजर्पयत 24क्क् गाद्या तयार केल्या आहेत. कोविड सेवा केंद्राबरोबर घरी राहून उपचार घेत असलेल्या गरीब रुग्णांना त्याचा लाभ होत आहे. या गाद्या विकताना ‘ना नफा ना तोटा’ असे धोरण ठेवले जात असून, पंचायतींना तर मोफत दिल्या जाणार आहेत.लक्ष्मी यांचे काम पाहून मोठय़ा कंपन्याही मदतीसाठी पुढे आल्या आहेत. कोरोनाकाळातही असा उत्तम सकारात्मक विचार करून संकटातही संधी शोधणा:या या उपक्रमाचे म्हणून कौतुकही होत आहे.
(भाग्यश्री मुक्त पत्रकार आहे.)