-आदिती मोघे
मला कायमच रॅम्प वॉक करणाºया मॉडेल्स , डिस्को पब्समध्ये सुईच्या साईझच्या हील्स वर पार्टी करायला आलेल्या मुली, हजारो फूट उंचीवर, पेन्सिल हील्स घालून प्रवाशांना असिस्ट करायला तत्पर असणाºया एअरहोस्टेस ह्यांना बघितलं की एक च प्रश्न पडतो..... का ?का घालतात या अशा हाय हिल्स?अशा प्रकारच्या, उंच टाचांच्या चपलांचा सौंदर्याशी संबंध लावावा, हे कोणाला कसं सुचलं असेल?गमतीची गोष्ट म्हणजे हाय हील्स च्या हिस्टरी मध्ये मागे गेलं तर अशा उंच टाचांच्या चपला बुटांच्या इनिंग ची सुरवात चक्क इटालियन प्रॉस्टिट्यूट्स पासून झाली आणि ती पद्धत चक्क राजघराण्यातल्या पुरु षांनी स्वत:साठी कुल वाटल्यामुळे अडॉप्ट केली. अर्थात त्यांच्या वापर चालण्यापेक्षा प्रदर्शनासाठी जास्त होता . उंच टाचांचे बूट ताकद, प्रभाव, अथॉरिटी, उच्च दर्जा ह्यांचं प्रतीक मानलं गेलं. मग हळूहळू त्याच कारणांसाठी स्त्रियांची सुद्धा आपला मोर्चा उंच सँडल्स आणि बुटांकडे वळवला. १६ व्या शतकातल्या या उंच टाचांच्या शूज ना शोपीस म्हणलं गेलं.उच्च घराण्यातल्या किंव्हा राजघराण्यातल्या स्त्रियांना हे प्लॅटफॉर्म वाले उंच बूट आवडायला लागले कारण ते घातल्यावर त्यांच्या उंची गाऊन्सना जास्त फॉल मिळायचा. त्या गाऊन्स साठी वापरलेली महागडी कापडं, त्यावरचं नक्षीकाम ह्याकडे जास्त लक्ष जायला नकळत हे उंच शूज कारणीभूत ठरू लागले. १८ व्या शतकात पुन्हा सपाट चपलानी फॅशन चा ताबा घेतला आणि त्यांनतर १९४०, १९५० च्या मानाने ‘सिलेटोज’ नी जगाचं लक्ष वेधून घेतलं. त्यांनतर हील्स नी फॅशनच्या दुनियेचा जो ताबा घेतलेला आहे तो अजूनही आहे. अशा प्रकारच्या फुटवेअर ने पायांवर गुडघ्यांवर तो ताण येतो, त्यामुळे या सिलेटोजना किलर हील्स असंही म्हणतात उपरोधाने. किटन हील्स, वेज हील्स, पंप्स असे अनेक प्रकार आहेत या उंच टाचांच्या फुटवेअर मध्ये.अर्थात कुठलाही ट्रेंड सेट होण्यात किंव्हा गाजण्यात एक मोठी प्रोसेस असते. आज सगळीकडे सरसकट दिसणारे हे शूज वापरायची पद्धत रु जवण्यात इटालियन प्रॉस्टिट्यूस, फ्रेंच डिझायनर्स आणि ब्रिटिश राजघराण्यातल्या स्त्रियांचा खूप मोठा सहभाग आहे. शोपींस चं रूपांतर हळूहळू हील्स मध्ये झालं का वगैरे मुद्दे वादाचे आहेत पण हील्समधला जिचा वावर डॉक्युमेण्ट केला गेला अशी पहिली स्त्री होती क्वीन एलिझाबेथ.१९६० पर्यंत स्त्रिया काय किंव्हा पुरु ष काय, दोघांसाठीचे शूज फार वेगळे नसायचे पण ह्यानंतर मात्र पुरु षांच्या शूजची फॅशन झपाट्याने प्रॅक्टिकल वापर, कन्व्हिनिअन्स या दिशेने बदलत गेली.स्त्रियांसाठी कायमच फुटवेअर हा खूप महत्वाचा आणि आवडीचा विषय ठरत आला आहे. शूज आपल्याला जास्त सुंदर, आकर्षक ठरवतात. आपल्याकडे लोकांचं लक्ष वेधून घ्यायला भाग पाडतात हा समज गेली शेकडो वर्ष स्त्रियांच्या मनात आहे. तो तसाच राहावा म्हणून फुटवेअर फॅशन मध्ये काम करणाºया सगळ्या कंपन्या त्यावर भरपूर पैसे खर्च करतात.एमा थॉम्प्सन नावाच्या जगप्रसिद्ध अॅक्टरने २०१४ साली बेस्ट स्क्र ीनप्लेचं अवॉर्ड द्यायला येताना पायातले उंच बूट फेकून दिले आणि ती म्हणाली , का घालतोय आपण हे शूज ? ते केवढे पेनफुल आहेत आणि पॉर्इंटलेस पण.किती खरंय हे, जग जिंकायचं असेल आणि चेहरºयावरचं हास्य टिकवायचं असेल तर कपडे आणि चपला ह्या सोप्या सुटसुटीतच असायला हव्यात, नै का ?तेव्हा दिखावे पे मत जाओ..
( आदिती सुप्रसिद्ध पटकथा लेखक असून तिचा स्वत:चा साडी डिझायनिंगचा ब्रॅड आहे.)