शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

कोजागरी पौर्णिमा स्पेशल ! मनामनांतलं चांदणं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2017 2:04 PM

आज कोजागरी पौर्णिमा. घरोघर आटीव दुधात चंद्रबिंब पाहून जागरण करत मस्त गप्पांच्या मैफली जमवण्याचा, चांदणं अनुभवण्याचा हा दिवस. शांत-निवांत रात्री जिवलगांशी गप्पा मारत बसावं, वाºयाच्या, झाडापानांच्या साक्षीनं डोईवर येणारी रात्र अनुभवावी, असं सांगणारी आजची रात्र.

- मुक्ता चैतन्य

आज कोजागरी पौर्णिमा. घरोघर आटीव दुधात चंद्रबिंब पाहून जागरण करत मस्त गप्पांच्या मैफली जमवण्याचा, चांदणं अनुभवण्याचा हा दिवस. शांत-निवांत रात्री जिवलगांशी गप्पा मारत बसावं, वाºयाच्या, झाडापानांच्या साक्षीनं डोईवर येणारी रात्र अनुभवावी,असं सांगणारी आजची रात्र. आता पूर्वीसारखं नसेलही अनेकांना जागरणाचं अप्रूप. बाराच्या ठोक्यापर्यंत तसे रोज जागेच असतात अनेकजण टीव्ही-मोबाइलच्या स्क्रीनसोबत. पण तरीही रात्री जागणं, रात्री अनुभवणं याचं तारुण्यातलं अप्रूप कधी आटत नाही. मित्रांसोबत मस्त रंगलेल्या गप्पा, चहाचे चिकट कप, कॉफीच्या मगांच्या रांगा, कुठल्या तरी कट्ट्यावर मध्यरात्री हादडलेला भुर्जीपाव, वडे. उकळत्या दुधाच्या गाड्यांवरची गर्दी, पाय तुटेपर्यंतची भटकंती आणि ग्रुपस्टडीच्या नावाखाली केलेला धांगडधिंगा. तरुण मनांना आकर्षण असतंचरात्रीच्या या शांततेचं.. आणि त्यातून मनात उमलत जाणाºया खास आठवणींचंही. आज कोजागरीनिमित्तअशाच जागवलेल्या रात्रींच्या काही यादगार गोष्टी..आता रात्रीचे साडेअकरा वाजायला आले आहेत. उद्या सबमिशन असल्याने आम्ही नाईट मारतोय. थोड्या वेळाने नाक्यावर जाऊन चहा टाकू. मग परत अभ्यासाला बसायचं. गेल्या काही वर्षांत आम्ही अशा किती नाईट्स टाकल्या असतील बरं? काउंट कोण करतंय!! चलो, बाय....- कुणीतरी फेसबुकला टाकलेली ही पोस्ट.त्यापाठोपाठ अजून एक पोस्ट नजरेत आली. अशीच रात्री बाराच्या आसपास. कुठल्याशा रस्त्यावर गप्पा झोडत उभ्या असलेल्या ग्रुपमधल्या पोरापोरींनी सेल्फी टाकला होता. फेसबुकवरच्या त्या पोस्ट आणि फोटो बघताना सहज मनात आलं, रात्र ही काय अजब गोष्ट आहे नाही?सूर्योदयाबद्दल आपण किती आणि काय काय बोलतो, लिहितो नाही?रात्र बिचारी अंधारी म्हणून तिच्यावर अन्याय. त्या अंधाºया काळेपणाला भुताखेतांशी जोडून मोकळ्याही होतात अनेक कथा. नाही म्हणायला त्या एका चंद्रामुळे तरुण मनांमधला रोमान्स तेवढा शिल्लक आहे.पण एकूण रात्र नकोच... सातच्या आत घरात बरं..हीच एक समाजरीत.पण तारुण्यात रात्रीचं शांत एकटेपण, जिवलगांशी मारलेल्या गप्पा, तासन्तास ऐकलेला रेडिओ.. रात्रीच्या जागरणाची नशा अनुभवली नाही असा माणूस सापडणं कठीणच आहे. शालेय जीवनात तसा आपला जागरणांशी संबंध नसतोच. अमुक एक वाजता घरातल्या मुलांनी झोपलंच पाहिजे असे नियम बहुतेक घरांतून असल्यामुळे कधीतरी विकेण्डला केलेली जागरणं वगळता त्या वयात जागरण फारसं वाट्याला येत नाही.म्हणूनच मोठं होताना या जागरणांची, हवं तेव्हा झोपण्याची, हवं तेव्हा उठण्याची एक तुफान ओढ असते. मोठं होण्याच्या टप्प्यात ज्या अनेक फॅण्टसीज तयार होतात, त्यातली एक असते उशिरापर्यंत जागणं. रात्री उशिरापर्यंत सिनेमे बघणं, कधी आईबाबांच्या बरोबर ट्रीपला गेलो आणि हॉटेलात २४ तास रूम सर्व्हिस असेल तर उगीच जागून रात्री २ नाहीतरी पहाटे ४ वाजता काहीतरी आॅर्डर करून खाणं, टीव्ही पाहणं, सिनेमे पाहणं, शांत बसून राहणं.. रुपेरी वाळूत या असल्या फॅण्टसीजमध्ये मन रमलेलं असताना अचानक आपल्या आयुष्यात अभ्यास आणि सबमिशन नावाचा प्रकार शिरतो.जागरणासंदर्भातल्या सगळ्या फॅण्टसीज पूर्ण करण्याची संधीच जणू यानिमित्तानं मिळते. बारावीत आणि त्यानंतर नोकरी लागेपर्यंत सबमिशन आणि अभ्यासाची जागरणं नेहमीचीच होतात. पण ही सबमिशनची जागरणं एक वेगळीच गंमत घेऊन येतात..मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात चाललेला सबमिशनचा अभ्यास आणि त्यात होणारे ब्रेक्स.मग बाराच्या पुढे कधीतरी बाहेर पडून चहा टाकणं, कधी पहाटे पहाटे भूक लागली तरी आईला त्रास देण्यापेक्षा बस स्टॅण्डवर जाऊन भुर्जी-पाव, मिसळ, आॅम्लेट-पाव, बटाटेवडा असं काहीही जे हाताशी लागेल ते खाणं, हॉस्टेलमधून बाहेर पडायला स्कोप नसेल तर मॅगीवर ताव मारणं, त्यासाठी मिळणाºया पॉकेटमनीतून वेगळा फंड तयार करणं.. अशा कितीतरी गोष्टी प्रत्येक जण करत असतो.म्हणून तर जागरण करायला आताशा कोजागरीच्या दुधाची गरज उरलीयेच कुठे?दिवस सगळ्यांचा असतो, तर रात्र फक्त आपली असते.आपल्या मनातल्या अनेक भावनांना रात्र चढते तसे गहिरे रंग यायला लागतात.प्रेमात असलेल्यांसाठी तर रात्र सखी.. दोस्त. ते मैत्र इतरांना नाहीच समजणार.प्रेम, विरह, प्रेमभंगाचं दु:ख, अनेक आठवणींचा झुला...मग त्यात आपण आपल्या इच्छेने किंवा नकळत झुलत राहतो. झुरत राहतो.रात्री घरदार झोपलं की हळूच चालू होतं तिच्याशी चॅटिंग.खरंतर दिवसातून चारदा फोनवर बोलून झालेलं असतं, एकदा निवांत भेट झालेली असते तरीही रात्री तिच्याशी बोलल्याशिवाय झोप येतच नाही...तिचीही परिस्थिती काही वेगळी नसते.हॉस्टेलची बंधनं असली तरीही रूममेट्स झोपल्यावर हळूच त्याच्याशी तिच्याही गप्पा सुरू होतात. इतकं काय बोलायचं असतं या प्रश्नाचं उत्तर इतरांकडे असूच शकत नाही.कदाचित ते त्या दोघांकडेही नसतं. कारण रात्री उशिरापर्यंत चालणाºया या गप्पा काहीतरी सांगण्यासाठी, ऐकण्यासाठी नसतातच मुळी! एकमेकांच्या जवळ असण्याची गरज असते फक्त. फोनच्या पलीकडची, चॅट बॉक्सच्या पल्याड असलेली व्यक्ती फक्त माझी आहे या भावनेच्या नशेचा खेळ असतो सगळा. मनाला सुखावणारा. रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास मिळावा यासाठी धडपडणारं, आसुसलेलं मन. रात्रीची त्याला सुखद सोबत!रात्रीच्या जागरणांनी पित्त वाढतं, डोळ्याखाली काळं येतं हे सगळं माहीत असलं तरीही मुसमुसलेल्या तारुण्यात रात्र जागवायला मन उत्सुक असतंच. कधी सबमिशनचं कारण, कधी प्रेमाचं, तर कधी मैत्रीचं.‘सो गया ये जहाँ, सो गया आसमां, सो गयी है सारी मंजिले, सो गया है रस्ता...’या एका गाण्यानं एका आख्ख्या पिढीच्या मनाचं प्रतिनिधित्व केलं होतं. गाडी काढून रात्री शहरं कशी दिसतात हे बघत फिरण्याचा छंद असलेले आपल्यापैकी कितीतरी जण असतील. कुणाला रात्रीची शहरं भुरळ घालतात, कुणाला त्याचा/तिचा झोपाळलेला आवाज, कुणाला काळंकुट्ट आभाळ, तर कुणाला झाडाच्या चित्रविचित्र आकृत्या.. कुणाला तारे, कुणाला एखाद्या बिंदूइतके लहान दिसणारे ग्रह, कुणी शोधात असतं अवकाशातल्या अद्भुत गोष्टींच्या, तर कुणी फक्त स्वत:च्या!दिवस मावळला की आपोआप डोक्यात सुरू होणारी आकाशवाणी केंद्र बंद करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत अगम्य भाषेतले सिनेमे डोळे पेंगुळेपर्यंत बघणारे कितीतरी जण आपल्यातलेच!गणपतीत रात्रभर भटकत मौज करणारेही आपणच. मित्रमैत्रिणींची टोळकी बनवून गणपतीचे देखावे बघत फिरायचं, भूक लागली की गाडीवरचं काहीबाही खायचं, कट चहा तर चालूच असतो. पायाचे तुकडे पडेस्तोवर फिरायचं. मग पहाटे कधीतरी डोळे चोळत घरी यायचं, पांघरुणात गेलं की काळ वेळाच भान सुटल्यागत घोरत पडायचं.कितीतरी शहरांमध्ये रात्री उशिरा गरम दूध विकणारी दुकानं, रस्ते, नाके असतात. रात्रभर मैफली जमवून पहाटे फेसाळलेलं गरम दूध प्यायला जाणारेही आपणच.एखाद्या पबमध्ये रात्रभर नाचून झिंगणारेही आपणच.एखादं आवडलेलं पुस्तक हातातून सोडवत नाही म्हणून रात्रभर जागून एका बैठकीत वाचून संपवणारेही आपणच.सुटीत काहीतरी मूड बनला तर एका रात्रीत पाठोपाठ दोन-तीन सिनेमे बघून टाकणारेही आपणच.रात्रभर तिच्या आठवणीत काढल्यावर पहाटे पहाटे तिच्या घरापाशी घुटमळणारेही आपणच.तो किंवा ती भेटेल म्हणून उजाडायचा आधीच वॉकला जाणारी, काहीबाही कारणं काढून रात्री घरी यायला उशीर करणारी आणि उगाच कारण काढून रात्री उशिरापर्यंत त्याला फोन करत राहणारी कुणी तीही आपल्यापैकीच.उगाच घालतो आपण रात्रीची भीती. स्वत:लाही. इतरांनाही.रात्रीची नशा चढायला दारूचीच सोबत असायला हवी असं कुठंय? ती तशी नसते.असते ती निव्वळ एका वेगळ्याच स्वप्नवादाची साथ.रात्र आपली असते, एकटी असते. अगदी आपल्यासारखीच.कितीही गोतावळा असला सोबतीला तरीही आपण एकटेच असतो आतून, रात्र असते तशीच, मग तिच्याशी मैत्र जुळायला वेळ लागेल कसा?लहान असताना आजोबा कोजागरी एखाद्या उत्सवासारखी साजरी करायचे. मसाला दूध बनवून ते चंद्राच्या प्रकाशात ठेवायचे, बटाटेवड्याचा बेत रंगायचा. गप्पा आणि गाण्याची मैफल जमायची, त्या दिवशी पोरांनाही उशिरापर्यंत जागायची परवानगी मिळायची. रात्र चढायची तशी मैफल रंगत जायची. चंद्र डोक्यावर आला की आजोबा दूध द्यायचे. सगळ्यांचेच डोळे पेंगुळलेले पण तरीही जागायला उत्सुक. आजोबांच्या कुशीत रात्र येऊन जायची समजायचं नाही, मोठेही कधी झोपेच्या स्वाधीन व्हायचे कळायचं नाही. आता मागे वळून बघितलं तर जाणवतं, आजोबा फक्त कोजागरी साजरी करत नव्हते, रात्र फुलवायची कशी हे नकळत शिकवत होते. रात्री फुलल्या तरच दिवस आनंदात जातो.दिवसाचा तोरा रात्रीशी असलेल्या सुखद मैत्रीवर अवलंबून असतो, हे समजायला बरीच वर्षं जावी लागली.दिवस त्याच्या तोºयात असतो, काहीसा त्रयस्थ, जरासा मजूरडा.तुम्ही असा नसा, त्याला फरक पडत नाही.तो सोडून गेलेल्या प्रियकरासारखा. झटकन विसरून पुढे जाणारा.रात्रीचं मात्र तसं नसतं.कितीही काहीही होवो, ती सोबतीचा हात सोडत नाही.विरहाचं दु:ख जखमा म्हणून जपते. पण ते विसरून पुढे जाणं तिला जमत नाही.ती असतेच, कुणी असा नाहीतर नसा !ती असते डोळ्यातले अश्रू पुसायला, ती असते प्रणयात धुंद करायला,ती असते निवांत गप्पांचे फड जमवायला,ती असते दु:खातही. आणि असते सुखातही.कुणीही सोबतीला असो नसो, ती मात्र सोबत करते.तिच्यासाठी नाही जागायचं तर कुणासाठी जागायचं?कोजागरी आज, चांदण्यातलं जागरण घरोघरी होईल,अनेक तरुण मुलांच्या वाट्यालाही त्या चांदण्यातल्या गप्पा येतील,आणि मनभर आनंदाचं चांदणं पसरेल..ज्यांनी रात्री जगल्या, दोस्तांसह गप्पा मारत जागवल्या, भटकून घेतलं भरपूर,अंधाराला न डरता, काळोखात न डगमगता पाहिली पहाटेची वाटत्यांना या चांदण्याचं अप्रूप नक्की असतं.त्या अप्रूपाची ही कोजागरी पौर्णिमा..ती अनुभवयाचीच गोेष्ट आहे..( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.) muktaachaitanya@gmail.com