- प्रगती पाटील
मुलींच्या मागे फ्रेण्डशिप बॅण्ड घेऊन फिरणारा राहुल.. राहुलबरोबर सावलीसारखं वावरणारी अंजली.. अन् राहुलच काय कोणाही मुलाला सहज दिवानं करू शकेल अशी स्पायसी टीना ! या तिघांची ही गोष्ट. खरं तर टीपिकल हिंदी सिनेमातला प्रेमत्रिकोण. मात्र दोन दशकांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्नपटानं त्यावेळी विशीत असलेल्या किंवा जेमतेम विशीत पोहोचलेल्या तरुणाईला अक्षरशर् पागल केलं होतं. त्या सिनेमातली टीना म्हणजे राणी मुखर्जी तेव्हा स्वतर् फक्त 19 वर्षाची होती.आणि त्याच वयाच्या आगेमागे असलेले सारे त्याकाळात सहज म्हणत होते.‘कुछ कुछ होता हैं राहुल तुम नही समझोगे.’!हे न समजणारं कुछ कुछ काय होतं याचा आज वीस वर्षानी विचार केला तर हाती नुसता आठवणींचा रोमॅण्टिसिझम येत नाही, तर त्यापलीकडे तारुण्याची एक गोष्ट लागते. ती त्या सिनेमाची कमी आणि त्या सिनेमाच्या वेळी तरुण असलेल्या, त्यासोबत तरुण होत गेलेल्या एका पिढीची गोष्ट आहे. तरुण मुलगा-मुलगी दोस्त असूच शकत नाही असं समजणार्या त्या काळात हा सिनेमा म्हणत होता, शी इज युअर बेस्ट फ्रेण्ड यार, ही इज युअर बेस्ट फ्रेण्ड यार.किंवाक्या है प्यार?या प्रश्नाचं उत्तर प्यार दोस्ती है, असंही याच सिनेमानं सांगितलं. हम एक बार जिते है, एक बार मरते है, और प्यारभी एकही बार करते है असं म्हणणार्या राहुललाच नाही तर त्यावेळच्या तारुण्यालाही मान्य करायला लावलं की, पहला प्यारच रोमॅण्टिसिझम बास झालं, परस्परांसोबत आयुष्य काढायचं तर प्यार ही काही वेगळी खास गोष्ट आहे.. चित्नपटातील त्या डायलॉगने तर त्या काळातील अनेक सामान्यांचं अडलेलं प्रेम प्रकरणही सुसाट सुटायला मदत केली होती.कॉलेज जीवनातील मैत्नी आणि त्याचे अनेक पैलू व्यापक पद्धतीनं या सिनेमानं मांडले. ते सारं त्या काळच्या तरुण पिढीचं समकालीन चित्र होतं का? त्याच काळात स्त्नी-पुरु ष मैत्नीला काही प्रमाणात ओळख मिळत होती. अगदी त्याच टप्प्यात कॉलेज विश्वात रंगलेल्या अनेकांना उघडपणे आपण फक्त मित्र आहोत असं म्हणत आपली मैत्नी जाहीर करण्याचं धाडस आलं होतं. मुला-मुलींच्या मैत्नीला समाजमान्यता मिळण्याचा तो काळ होता.महत्त्वाचा ठरला तो त्या सिनेमाचा शेवटही. जरासा मेलोड्रामा आहेच पण नायिकेचा निर्णय, तिचं प्रेम महत्त्वाचं हे मान्य करण्याचं आणि तिलाच शेवटी त्याग करायला न लावण्याचं कामही या सिनेमानं केलं. त्याग मुलींनीच करायचा, एकदा लग्न ठरलं की ते मोडायचं नाही, घरच्यांचं काय होईल या विचारांना उघड वाट मिळण्याचं निदान ते बोलण्याचं तरी बळ त्यावेळी तरुण मुलांनी कमावलं ते काहीसं हा सिनेमा पाहून. म्हटलं तर एक साधा करण जोहर स्टाइल लव्हस्टोरी सिनेमा. पण तो सिनेमा त्यावेळी तरुण मुलांना का आवडला, असा शोध घेत सहज विचार करून पाहिलं तर वाटतं.त्यात एक मोकळेपणा होता.तो मोकळेपणा, खुलेपणानं जगण्याची आझादी, घरच्या सोबत असलेला थेट संवाद आणि शिक्षण-कॉलेज यातलाही जरा मोकळाढाकळा हसरा अनुभव यासाठी ते कुछ कुछ होणं त्यावेळच्या तरुण पिढीला आवडलं असावं. सिनेमात तुटलेल्या तार्यासोबत राहुल-अंजली काहीतरी विश मागतात.ती पूर्ण होते न होते, हा माग निराळा.पण त्यावेळी असं कुछ कुछ नाही तर बहुत कुछ आपल्या आयुष्यात घडावं म्हणून तुटते तारे अनेकांनी जगून घेतले हे खरंय.आज ते सारं रोमॅण्टिक वाटतं.एकेकाळी हा रोमॅण्टिसिझम एका तरुण पिढीच्या जगण्याचा भाग होता असं म्हणावं लागेल. हे जरा स्मरणरंजन वाटेल.पण क्या करे. कैसे कहें की. बहुत कुछ हुआ है.