- नसिरुद्दीन शाह
जेमतेम १६ वर्षांचा होतो तेव्हाची गोष्ट. सिनेमाचा किडा चावलेला होता म्हणून पळालो. थेट मुंबईला आलो.त्याचं कारणही असं की एका मित्राच्या प्रेयसीनं मला सांगितलं की, तिचे वडील मुंबईत सिनेमात काम करतात. ते करतील मदत, आमच्याकडे राहायचीही सोय होईल, तू मुंबईला ये. म्हणून आलो. महिनाभर त्यांच्याकडे राहिलो. पण महिनाभरानं त्यांनी अगदी आदबीनं सांगितलं की, आता तू गेलास तरी चालेल.
- कुठं जाणार? रस्त्यावर आलो. खिशात पैसे नव्हतेच. एका झरीकाम करणाºया फॅक्टरीत राहिलो. विनातिकीट प्रवास करत रेल्वेनं फिरायचो. ताज हॉटेलमध्ये बेलबॉयची नोकरी मिळावी म्हणूनही धडपडत होतो. शेवटी नटराज स्टुडिओत काम मिळालं. ७.५० रुपये मानधन. त्या मुलीच्या चुलत भावाच्या मदतीनंच हे काम मिळालं. ‘अमन’ नावाचा सिनेमा होता. राजेंद्र कुमार मुख्य भूमिकेत. त्या सिनेमात राजेंद्र कुमार मरतो. आणि त्याच्या प्रेताभोवती जमून काही माणसं रडतात असा सीन होता. त्या रडणाºया चेहºयांत रडण्याचं काम मला मिळालं. मला मोठ्या पडद्यावर झळकायचंच होतं, काहीही करून. कॅमेरा रोल झाला. रडक्यांनी पोझिशन घेतली तेवढ्यात झटपट करून मी रडणाºयांच्या पहिल्या रांगेत जाऊन बसलो. रडलो. ते माझं मोठ्या पडद्यावर दिसलेलं पहिलं काम.मात्र दोन महिने झाले मुलगा कुठं गेला म्हणून घरच्यांनी शोधाशोध केली. माझे वडील अजमेर शरीफ दर्ग्याचे व्यवस्थापक. मुंबईत त्यांची फक्त एकाच व्यक्तीशी ओळख होती. ती म्हणजे दिलीपकुमारची बहीण. तिनं मला शोधलं, घरी घेऊन गेली. एका बंगल्याच्या तळघरात मला ठेवलं. अर्थात तरी मी घरभर फिरायचो. नंतर कळलं हे दिलीपकुमारचं घर. ड्रॉइंग रूममध्ये शेल्फवर फिल्मफेअरच्या ट्रॉफिज ठेवलेल्या. एकदा हिंमत करून मी एक हातात घेतली. एका हातात ट्रॉफी, दुसºया हातानं लोकांना अभिवादन केलं. भाषणही ठोकलं. तेवढीच प्रॅक्टिस करून घेतली. एकदा तर मी दिलीपकुमारलाही भेटलो. त्यांनी माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखंच केलं. पण ते ठिके..पुढे मी दिलीपकुमार बरोबर काम केलं; पण त्यांना काही हा किस्सा सांगितला नाही, त्यांना आठवण्याचा तर प्रश्नच नव्हता..( नसिरुद्दीन शाह यांच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘अॅण्ड देन वन डे’ या पुस्तकातून संबंधितांच्या सौजन्यानं साभार!)