शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

मुक्काम पोस्ट मेडशिंगी : जिंदगीभर मर-मरून आमच्या मायबापानं काय कमवलं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 6:00 AM

दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. दुष्काळ मोठा कहर. त्यात गायीगुरांना जगवायचं तर घरातली तरणी पोरंही त्यांच्याबरोबर या चारा छावण्यात राहतात. तापल्या उन्हात बसतात, तिथंच झोपतात. चारा छावणीतल्या त्यांच्या जिंदगीचा हा लाइव्ह रिपोर्ट

ठळक मुद्देचारा छावणीतल्या तीनशे कुटुंबांमधून किमान शंभर पोरं तरी रोज छावणीत राखणीला येतात.

- सचिन जवळकोटे

 शेणानं बरबटलेला हात मुडपून केसाच्या बटा मागं सारताना ती पुरती भांबावून गेलेली. डोक्यावर तिनं ‘गोबर’चं टोपलं ठेवलं खरं; मात्र डोक्यात बहुधा ‘ग्लोबल’चाच विचार. होय. दहावीला फस्र्ट क्लासमध्ये आलेली मुस्कान बारावीनंतर ‘एमपीएससी’च्या मागं लागलेली. सुटीत ‘अम्मीजान अन् अब्बाजान’ला मदत करण्यासाठी चारा छावणीत येऊन राबू लागली.छावणीत गायी अन् म्हशींचाच राबता जास्त असला तरी सांभाळणार्‍यांमध्ये मात्र पुरुष वर्गाचीच होती मक्तेदारी. शंभर पुरुषांमागं एखादी स्त्री. बाकी तरण्याबांड पोरांचंच राज्य इथं. नाही म्हणायला कोपर्‍यातल्या मांडवाखाली एक तरुण पोरगी शेण गोळा करताना दिसली. चांगल्या घरची असल्याचं जाणवलेलं. सुरुवातीला कॅमेरा पाहताच ती गडबडली. गोंधळली. शेजारी उभारलेल्या वडिलांकडं प्रश्नार्थक नजरेनं पाहू लागली.मुस्कान पठाण ही एमपीएससीची तयारी करू लागलीय. बारावी सायन्सची तिनं परीक्षा दिलीय. खरं तर करिअरचा टप्पा तिच्यासाठी अद्याप तीन वर्षे दूर; तरीही आतापासूनच ती तयारीला लागलेली. सुटीत घरी बसून काय करायचं म्हणून आईवडिलांसोबत छावणीत येऊ लागलेली. माळरानावर पडलेल्या वाळक्या चार्‍यातून ओलं गवत हुडकू लागलेली. शेणात हात घालून आपला मांडव स्वच्छ ठेवू लागलेली; कारण तिला माहीत होतं, ‘या शेणाकुटय़ातच लपलंय उद्याचं भविष्य. आज ही घरची जनावरं जपली तरच येईल दुधातून बरकत घरी. याच पैशातून होईल पुढचं शिक्षण पूर्ण.’मुक्काम पोस्ट मेडशिंगी. तालुका सांगोला. जिल्हा सोलापूर. सुमारे वीस-पंचवीस दिवसांपूर्वी इथल्या ओसाड माळरानानं जणू कात टाकली. भेगाळलेल्या मुरुमी दगडांना हिरव्यागार ‘नेट’चं दर्शन घडलं. या ‘नेट’च्या मांडवाखाली शेकडो जनावरं दावणीला बांधली गेली. या नव्या वसाहतीचं नामकरणही झालं. अर्थात चारा छावणी. सुमारे आठशेपेक्षाही जास्त जनावरं इथं निवांतपणे रवंथ करण्यात रममाण झाली. बसल्याजागी चारा, पेंड अन् पाणी. भर दुष्काळात भुकेल्या जनावरांची सोय झाली; मात्र शिवारातली माणसं पुरती कामाला लागली. आगीतून फुफाटय़ात. कुणाची चार, तर कुणाची सहा जनावरं. यांच्यासोबत रात्रंदिवस छावणीतच मुक्काम. गावापासून किमान कोसभर तरी दूरच. स्वयंपाक गावात तर मुक्काम छावणीत. सारंच त्रांगडं. जनावरांचं पोट भरताना माणसांचं पोट उपाशी राहू लागलं. यावरही अनेकांनी काढला मार्ग.पंचवीस वर्षाचा अमोल लवटे.मंडपाच्या बांबूला नीट दोर लावत सांगत होता, ‘गावाकडं अडीच येकर शेती हाय, पन संमदी जित्राबं यिथंच बांधल्याती. दिवसभर घरची इथं असत्याती. म्या घराकडनं डबा घिवूनशान यितू. रातीच्याला पुनंदा गावाकडं मुक्कामाला. दोन पाळ्यामंदी आमी घरच्यांनी येडजेस्टमेंट केलीया,’ याच अमोलच्या भावकीतला पोपट छावणीत निवांतपणे भटकताना भेटला. ‘इथं काय करताय?’ या प्रश्नावर त्याचं उत्तर, ‘काय ना बाùù काका गेल्याती गावाकडं. तोपत्तूर म्या इथंच टाइमपासùù’पलीकडच्या रांगेत थोडीशी गडबड दिसली. बहुधा नवीन जनावरं आणून बांधण्याची धडपड सुरू असावी. म्हातार्‍या आईसोबत तिची दोन तरुण पोरंही दावणीशी खेळू लागलेली. एक वांड जनावर ऐकता ऐकत नव्हतं. त्याला आवरता-आवरता दोन्ही पोरं घामेघूम. शेवटी शेजारच्या मंडपातला एक अनुभवी गडी बाह्या मागे सारत पुढं सरसावला. ‘लेकांनुùù ह्यांना नुसती ताकद लावूनशान नाय चालत. डोस्कंबी लावावं लागतंया,’ म्हणत त्यानं त्या वांड जनावरासमोर अगोदर थोडासा चारा टाकला. हपापल्यासारखं करत त्या जनावरानं तोंड चार्‍यात खुपसताच झटकन् त्याचा दोर जमिनीवरच्या खुट्टीला बांधण्यात गडय़ाला आलं यश. कसंनुसं हसतं दोन्ही पोरं आईकडं बघून बाजूला सरकली.‘आजकालच्या पोरास्नी काय म्हैतीय नाय वोù दादाùù’ म्हणत म्हातारी जुने दिवस उगाळू लागली तसं दोन्ही पोरं शेजारच्या बाजेवर बसून मोबाइल हाताळू लागली. दावं धरताना दुखावलेली बोटं स्क्रीनवर मात्र पटाùùपटाùù फिरू लागली. एकानं फेसबुक ओपन केलेलं, तर दुसरा व्हिडीओ गेम खेळण्यात मग्न झालेला. पहिल्याला विचारलं, ‘घरात गाई किती.? कधी दूध-बिध काढलं की नाही ?’मोबाइलवरची नजर अन् स्क्रीनवरची बोटं न हटविता तो बोलत गेला, ‘धार काढायची सवय ल्हानपनापासनंच हाय; पन लय कंटाळा येतूया. त्यापरीस कोन्त्याबी दुकानामंदी जॉब केला तर चार पैका जास्त मिळत्याती. दोन लिटर दुधामंदी कितीशा मिळणार?’गेम खेळणार्‍या त्याच्या भावानंही त्याचीच री ओढली, ‘जिंदगीभर मर-मरूनशान आमच्या मायबापानं काय कमवलंया? ही चार जनावरं. त्याती येक गाय दूध देतीया, दुसरी भाकड हाय, तर तिसरी लाथा मारण्यामंदीच लय तयारीची. असली बिनकामाची लोढणी गळ्यामंदी घिवूनशान काय मिळतंया कुणास ठाव आमच्या  घरच्यांना? पन् आमी नाय दुखवू शकत त्यांना. त्यांचा संमदा इंटरेश्ट यांच्यामंदीचùù’ एवढय़ात त्याची गेम हुकली असावी. ‘शीùùट’ म्हणत त्यानं मोबाइलसह हात झटकला. माणदेशातल्या या पोरांची गावरान भाषा कानाला लळा लावून जात होती. सोबतीला इंग्रजाळलेले शब्दही जणू तोंडी लावून जात होते. या मुलांशी बोलताना स्पष्टपणे जाणवत होतं की, ही माळरानावरची असाहाय्य जिंदगानी त्यांच्या पचनी न पडणारी. यातल्या कित्येकांच्या घरी दोन-पाच एकर जमीन पडूनच; मात्र पाण्याअभावी हे सारे शब्दशर्‍ परांगदा झालेले. हक्काचं गाव सोडून ओसाड माळरानावर राहू लागलेले.चारा छावणी नुसती गायीगुरांची नाही, या तरण्या पोरांचीही आहे.

**** 

आम्हास्नी कोण  देतंय पोरगी? - पाणीच नाही तर लग्नही नाही असं रखरखीत वास्तव.

‘तुमच्यातल्या किती जणांचं लग्न झालंय?’ या प्रश्नावर काहीजण विषण्णपणे हसले. ‘आमास्नी कोण देतंय पोरगी? आमच्यातल्या बक्कळ जणांचं लग्न आतापतूर झालंच नाय. आमी पुण्याकडं नोकरीला गेलू तरच मिळणार बायको.’ ग्रामीण भागातल्या तरुणांवर ओढवलेलं हे संकट त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसत होतं. जाणवत होतं. शेतकर्‍याची मुलगीही शेतकर्‍यांशी लग्न करायला तयार नाही, हे भीषण वास्तव चटका लावणारं होतं.वातावरणावर आलेलं मळभ दूर करण्यासाठी हळूच विषय बदलला, ‘मग काय गावाकडं जाऊन व्हिडीओ-बिडीओ बघत बसता की काय?’ यावर एकानं खळखळून हसत हातातला मोबाइल दाखवला, ‘माझ्याकडं रोज दीड जीबीचा डाटा हाय, पन काय उपेग? आपल्या इंडियामंदी समदे व्हिडय़ुओ ब्लॉक केलेत न्हवं?’

छावणी असती तरी कशी?

‘पुणेरी’ टी-शर्टवाला एक तरुण आला. बहुधा त्याला इथल्या बोचर्‍या उन्हाची सवय नसावी. चेहरा लालबुंद झालेला. हर्षद त्याचं नाव. शिक्षणासाठी गेल्या सात-आठ वर्षापासून तो पुण्याकडे शिफ्ट झालेला. सध्या शिक्षण घेत-घेत हॉटेल्सवाल्यांना मशरूम सप्लाय करण्याचा जॉबही करण्यात रमलेला,‘माझ्या आजोबांची जनावरं इथं आलीत. उन्हाळी सुटीत मी गावाकडं आलोय. लहानपणी एकदा छावणीत आलो होतो, त्याला खूप दिवस झाले. यावेळी मात्र मी खास छावणी बघण्यासाठी इथं काही दिवस राहणारंय,’ हर्षदच्या वाणीत पुणेरी स्वच्छता आली असली तरी त्यातला मूळचा गावरान गोडवा अधूनमधून जाणवलेला.

चहा-वडे चार्जिग-सेल्फी

चारा छावणीच्या ‘एण्ट्री’लाच संयोजकांचं ऑफिस. लगत चहा-भजीचं कॅन्टीनही. कढईत वडा तळता तळता सचिन रूपनर सांगत होता, ‘या छावणीपायी मला दोन म्हैने का हुईना रोजगार मिळाला. मोबाइल चारजिंगचीबी सोय हाय. म्हणूनशान पोरं-टोरं बी इथं यिवूनशान बसत्याती. चहा-भजी घेत्याती. विशेष म्हणजे, रात्री या छावणीतल्या सचिनचा सेल्फी फोटोही म्हणे ‘सोशल मीडिया’वर लोकप्रिय ठरलाय.

कांडकं आणि हिरवळ - शिकलेल्या नि कमी शिकलेल्या पोरांची छावणीतली जिंदगी.

इथं फेरफटका मारताना तरुण पोरांमध्ये जाणवले दोन वेगवेगळे गट. अर्धवट शिक्षण झालेली पोरं पूर्णपणे जनावरांमध्ये रमलेली. आपल्या आयुष्याचं पुरतं कांडकं पडलंय, हे समजून-उमजूनच उसाचं कांडकं पाडण्यात दमलेली. दुसरा गट शिक्षण घेत असलेल्यांचा. छावणीत संगत जनावरांची असली तरी पंगत मोबाइलवाल्यांची. इथल्या ‘धगधगत्या उन्हात’ मांडवाखाली बसून पुण्या-मुंबईची ‘हिरवळ’ मोबाइलवर बघण्यात रमलेली. या छावणीतल्या तीनशे कुटुंबांमधून किमान शंभर पोरं तरी रोज इथं येतात. यातल्या ऐंशी तरुणांकडं मोबाइल. त्यातही सत्तर पोरं व्हॉट्सअ‍ॅपवाली, तर पन्नास जणांच्या फेसबुक अकाउण्टवर किमान पाचशे-सातशे फ्रेंड्स जमलेले. शेणाच्या वासातही ‘चंदनसाùù बदन’ गाणं बघण्यात रमलेले. आभासी वातावरणात क्षणभर गुंतताना वास्तवाचं भान विसरण्याचा प्रयत्न करणारे.

(लेखक  ‘लोकमत’च्या सोलापूर आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.)