शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

मतदार यादीत तुमचं नाव आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 6:06 PM

16 टक्के मुलामुलींचं मतदार यादीत नावच नाही. 17 टक्क्यांनी नोंदवलं तर होतं; पण नाव यादीत आलं की नाही, हे पाहिलेलं नाही. मुलं आळशी; पण त्यांच्या दुप्पट मुली आळशी!

ठळक मुद्देडोक्यात किडे तर खूप; पण जागचं ‘ढू’ हलवायचं कुणी?

 

-ऑक्सिजन  टीम 

बोगस आहे आपली सिस्टीम.बोगस आहे यंत्रणा. राजकारणी तर काही कामाचे नाहीत, लोकांना फसवतात. राजकारण म्हणजे गलिच्छ काम. आमच्या शिक्षणाचं बोला, उगीच जातीधर्माचं राजकारण करू नका.- केवढा तो संताप तरुण मतदारांचा. वयाची नव्हाळी, बंडखोरी सगळंच मान्य. सोशल मीडियातून झालेली ज्ञानप्राप्ती तर अनेकांना ‘एक्सपर्ट’च बनवते.त्यामुळे सगळ्या विषयांवर हे तरुण हजरजबाबी.मग सगळे प्रश्न विचारून झाल्यावर प्रश्नावलीत तळाशी एक प्रश्न होता.- तुमचं नाव आहे का मतदार यादीत?ंहा गुगली आहे, हे अनेकांना कळलंच नाही. आणि तिथंच विकेट गेली आपली ते ही कळलं नाही.अर्थात तरुण मतदारांनाच दोष देण्याचं कारण नाही, आपल्या समाजाचं हे तरुण वास्तव आहे. अपेक्षा ढीगभर, कर्तव्याचं काय?मतं सगळ्यांना, कृती करायची वेळ आली की पाऊल मागे. केवळ लाइक मारले, फॉरवर्ड केले म्हणजे आपली सामाजिक जबाबदारी पार पडली असं होत नाही याचंही भान सुटत चालल्याचं हे लक्षण आहे.किती ती रोखठोक मतं.पण मग साधा प्रश्न येतो की, या देशात लोकशाही व्यवस्थेत सहभागी व्हायचं तर तुमचं नाव आहे का मतदार यादीत? मत देऊन सरकार निवडण्याची ताकद आहे का तुमच्याकडे? लागणार का बोटाला शाई?तर जेमतेम 50 टक्के म्हणतात की हो आमचं नाव मतदार यादीत आहे.बाकीचे निवांत. ते म्हणतात, नोंदवलं होतं; पण आलंय की नाही नाव यादीत हे माहिती नाही. पाहू तेव्हाचं तेव्हा. आणि नसेल नाव मतदार यादीत तर करू फेसबुकवर स्टेटस अपडेट की, बघा ही बेजबाबदार यंत्रणा, आमचं नाव नाही यादीत.पण ऑनलाइन जाऊन एका क्लिकवर नाव आहे की नाही याची वेळेत खात्री करणार नाहीत. एरव्ही नाही म्हणायला ही जनता सतत ऑनलाइनच असते.ज्यांनी मतदार यादीत नावच नोंदवलं नाही ते कोडगेपणानं सांगतात, की नाहीये नाव, त्यात काय?आणि मुली.त्या तर जास्तच आळशी.हा हू केअर्स अ‍ॅटिटय़ूड फक्त मतदानापुरता आहे की, एकूण जगण्यालाच?

एकूण प्रतिसाद काय सांगतो?

* हो, आहे! - 64.78 %* नाव नोंदवलं होतं; पण आलं का ते माहिती नाही -  16.75 %* मतदार यादीत नाव नोंदवलंच नाही -  15.84 %या चर्चेत हिरिरीने उतरलेल्यांपैकी 32 टक्के मुला-मुलींचं नाव एकतर मतदार यादीत नोंदवलेलंच नाही, किंवा नोंदवलेलं होतं; पण ते प्रत्यक्षात यादीत आलं का, हे पाहण्याची तसदी या मुलांनी घेतलेली नाही.--------------------------------------------------------

मुली म्हणतात * हो, आहे! -  56.77 %* नाव नोंदवलं होते; पण आले का ते माहिती नाही -  21.47 %* मतदार यादीत नाव नोंदवलेलंच नाही -  19.75 % ‘फस्र्ट टाइम व्होटर’ असलेल्या तरुण मुलींच्या निष्क्रिय आळशीपणाचा पुरावा देणारी आकडेवारी. याबाबतीत मुलांच्या तुलनेत मुलींना आपले ‘ढू’ हलवून थोडे कष्ट घेणं जमलं नसल्याचं दिसतं. मतदार यादीत नाव नोंदवलेल्यांच्या आकडेवारीत मुली मुलांपेक्षा तब्बल 16 टक्क्यांनी कमी आहेत. आणि ‘नाव नोंदवले तर होते; पण ते यादीत आले का माहिती नाही’, असे सांगणार्‍या मुलींची संख्या मुलांच्या दुप्पट आहे! मुलगे म्हणतात - * हो, आहे!-  72.84 %* नाव नोंदवले होते; पण आले का ते माहिती नाही - 12 % * मतदार यादीत नाव नोंदवलेलंच नाही -  12 % मतदार यादीत नाव नोंदवण्याची जबाबदारी पार पाडण्याबाबत मुलांची कामगिरी मुलींपेक्षा फारच सरस दिसते. चर्चेत सहभागी असलेल्यांपैकी 72 टक्के मुलांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवलेली आहेत.