दिवाळी आली..आपल्या दाराला प्रकाशाचं तोरण लागलं.दारी रांगोळीत किती रंगांनी दाटीवाटी केली.गोडाधोडाच्या घमघमाटानंघरात खमंग कुरकुरीत गप्पांनाही उधाण आलं.आणि मनात..मनात उजळलेत ना दिवाळीचे दिवे?की साºया घरातली जळमटं काढताना,माळे-पोटमाळे रिकामे करताना,आपल्या मनातले माळे मात्र तसेचराहिलेत, अंधारे?मनातली अडगळ भावनांच्या पायापायांत करत,अडवून धरतेय का आपली वाट?ठेच लागून भळभळतेय काएखादी बरी न झालेली जखम?उगीच ठसठसत राहतात काकाही जुने व्रण?- वरवर नाहीच म्हणतो आपण.हसू आणतो चेहºयावर.निभावून नेतो सणावारीचे आनंद.पण यंदा असं ‘वरवरचं’ काही नको..आपण मस्त लख्खं मनानं स्वत:लाच भेटलं तर..दरवर्षी दिवाळी नव्यानं येतेआणि नव्याकोºया आकाश कंदिलात उजळते,पणत्या पाण्यात घातल्या की सळसळते,लक्ष्मीपूजनावेळी तडतड्या फुलबाज्यांसारखीप्रकाशफुलं उधळते.प्रकाशाच्या झाडासारखी भूईत रुतत आकाशी झेपावते.आपणही त्या प्रकाशात आपल्या जिवाभावाच्या माणसांना मायेनं भेटतो,त्यांना गिफ्ट्स देतो, प्रेमाचं ग्रिटिंग देतो.सांगतो त्यांना कधी कृतीत, कधी शब्दांत...कीमाझ्या आयुष्याला तुमच्यामुळे अर्थ आहे,तुम्ही आहात म्हणून मी आहे..पण यासाºयात एक व्यक्ती मात्र राहून जाते.तिच्या पाठीवर शाबासकीची थाप राहून जाते.तिचं कोडकौतुकही राहून जातंतिला कधी आपण सांगतही नाही,तू स्पेशल आहेस.आय लव्ह यू.ती व्यक्ती कोण?ती म्हणजे आपण.आपल्यापैकी प्रत्येकजण.आपण ज्याला ‘मी’ म्हणतो तोआपल्यातला प्रत्येक मी!आपण आपल्याशी बोलावं,स्वत:लाच एक भन्नाट सरप्राइज गिफ्ट द्यावंम्हणून हा ‘आॅक्सिजन’चा विशेष अंक.दिवाळी स्पेशल.हा अंक वाचा,ते आपण स्वत:लाच द्यावं असं एक दिवाळी ग्रिटिंग आहे..ते तुमच्या दोस्तांना तर द्याच;पण आधी स्वत:ला द्या...सांगा स्वत:लाच..म्हणावं, दोस्ता..तुझ्या साºया जगण्याची आनंददायी दिवाळी होऊ दे..म्हणून ही खास भेट..हॅपी दिवाळी..हसो, मुस्कुराओ, खुश रहो..
- ऑक्सिजन टीमoxygen@lokmat.com