शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
4
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
5
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
6
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
7
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
8
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
9
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
10
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
11
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
12
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
14
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
15
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
16
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
17
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
18
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
19
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
20
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'

प्रेमापायी तरुण मुलं थेट सुसाइड करतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 7:00 AM

प्रेमात असणार्‍या कुणाचा प्रेमभंग झाला किंवा नातं तुटलं तर त्याचं दुर्‍खही तितकंच खरं आणि अत्यंत जिव्हारी लागणारंच असतं. ती जखमही खोल असते आणि अनेकांना जगणं नको वाटावं इतकी बोचरी असते. पण..

ठळक मुद्देप्रेमातलं नैराश्य आणि त्यापायी घरच्यांचा होणारा जाच तरुण मुलांच्या गळ्याला भयंकर काच लावतो !

- डॉ.धरव शाह

प्रेमातलं नैराश्य तरुण मुलामुलींमध्ये सर्रास दिसतं याची साधारण दोन कारणं दिसतात.एक म्हणजे आता शाळा-कॉलेममधलं शिक्षण दीर्घकाळ चालतं. तरुण मुलं वयात येतात, त्यांना परस्परांविषयी निसर्गतर्‍ आकर्षण वाटतं हे सारं अगदी सहज आहे, निसर्गसुलभ आहे. त्यात ते एकत्रित वेळही मोठय़ा प्रमाणात घालवतात. मात्र हे सारं एकीकडे असताना लग्न  व्हायला बराच वेळ लागतो. बर्‍याच उशिरानं लग्न  होतात किंवा लग्नचा विचार केला जातो, कारण शिक्षण-नोकरी, स्थैर्य हे सारं बराच काळानं घडतं.मात्र तोर्पयत अनेकजण प्रेमात पडतात. खरोखर प्रेमात पडतात, ते प्रेम अत्यंत खरं आणि परस्परांना स्वीकारणारं असतं.असं समजा की, कुणाचा लग्न नंतर घटस्फोट झाला किंवा पतीपत्नीपैकी कुणी दगावलं तर तेव्हा होणारं दुर्‍ख हे अवतीभोवतीच्या माणसांना किंवा समाजालाही समजतं. त्यापायी सहानुभूती वाटते.मात्र प्रेमात असणार्‍या कुणाचा प्रेमभंग झाला किंवा नातं तुटलं तर त्याचं दुर्‍खही तितकंच खरं आणि अत्यंत जिव्हारी लागणारंच असतं. ती जखमही खोल असते आणि अनेकांना जगणं नको वाटावं इतकी बोचरी असते.मात्र त्यावेळी या मुलांना असणारी सहानुभूती, साथ किंवा त्यांच्या दुर्‍खाची जाणीव आजूबाजूच्यांना असतेच असं नाही. दुसरं म्हणजे वय, पैसा, जातपात, आयुष्यातलं स्थैर्य यासार्‍याचा टिपिकल लगA जुळवताना करतात तसा प्रॅक्टिकल विचार न करता ही मुलं प्रेमात पडलेली असतात, त्यामुळे त्या प्रेमभंगाचं दुर्‍ख त्यांना भयंकर नैराश्य देतं. आणि त्यावेळी त्यांना होणारा त्रास, कमिटमेण्ट तुटल्याचा किंवा तोडल्याचा त्रास, आपल्याला आपलं प्रेम न मिळाल्याचा त्रास हा लग्न नंतर होणार्‍या विभक्तीसारखाच भयंकर असतो किंवा कदाचित त्याहून जास्त कष्टप्रद असतो. आणि त्यावेळी या मुलामुलींची काय घुसमट होते, हे इतरांना कळत नाही. अनेकदा आपली घुसमट या मुलांनाही व्यक्त करता येत नाही आणि ते हरवत जातात स्वतर्‍ला.हे सारं होताना अजून घरातले काही घटक कारणीभूत असतात. आपल्याकडे अजूनही लग्न  करताना आईवडील आणि समाज यांची मंजुरी तरुण मुलामुलींना आवश्यक वाटते नव्हे, त्या मंजुरीवरच निर्णय ठरतात. मुलंमुली प्रेमात असतात आणि आईवडिलांचा आंतरजातीय लग्न ला विरोध असतो. आपण आपल्या मनाप्रमाणे लग्न  केलं तर ज्यांनी आपल्याला वाढवलं त्या आईवडिलांशी कृतघAपणा करावा लागेल असं तरुणांना वाटतं, समाजाची भीती असते. दुसरीकडे आपलं प्रेम, त्यातली कमिटमेण्ट यांचं काय असाही प्रश्न असतो. त्यातून ते एका विचित्र पेचात सापडतात.खरं तर वय वर्षे 25-30 किंवा सज्ञान तरुणांनी कुणाशी लग्न  करावं हा परदेशात घरच्यांच्या निवडीचा प्रश्नच नसतो. प्रगतिशील समाजात हे निर्णय सर्वस्वी तरुणच घेतात. आपल्याकडे हा निर्णय सर्वस्वी पालक घेतात. मुलांचा निर्णय पालकांच्या मर्जीवर अवलंबून असतो. पालक अनेकदा मुलांचा निर्णय चुकीचा ठरवतात. आणि मग तिथं संघर्ष होतो किंवा मनाविरुद्ध नातं तोडावं किंवा जोडावं लागतं.त्यापायी होणारी तरुण मुलांची घुसमट, त्यांना होणारा त्रास, समाजाचं भय हे सारं अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे.आता आपल्या समाजात एक बदल दिसतो आहे की, निदान मुलांच्या शिक्षणाच्या निर्णयात तरी आईवडिलांनी डोकं घालणं बंद केलं आहे. तेच लगAाच्या बाबतीत झालं तरी काही गोष्टी सोप्या होतील. हे मान्य आहे की, सर्वच गोष्टी मुलांच्या संदर्भात सारख्या नसतात, परिस्थिती वेगळी असते मात्र तरीही पालकांनी मुलांना जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं तर त्यांचं नैराश्यात जाणं टळेल, त्यांची घुसमट थांबेल आणि नैराश्यातून मृत्यूच्या टोकार्पयत जाणं किंवा कुढत बसणं तरी थांबेल.यासगळ्याहून वेगळं अजून एक कारण तरुण मुलांच्या प्रेमाच्या कल्पना घडवतं आणि बिघडवतं ते म्हणजे आपले सिनेमे. आयुष्यात प्रेम फार महत्त्वाचं, ते मिळालं नाही तर आयुष्य व्यर्थ असंच सिनेमे सांगतात. जमाना छोड दुंगा तेरे लिए म्हणतात. त्यामुळे प्रेमभंग झाला तर संपलंच सगळं असंच तरुणांना वाटतं. कॉलेजात जाणार्‍या तरुण मुलांसमोर बाकी काही ध्येय नाहीत, आयुष्यात काय करायचं हे ठरत नाही. प्रेमात पडलं की ही एकमेव गोष्ट महत्त्वाची वाटते. कॉलेजात मुलं कविता करतात त्यातही बहुसंख्य कविता प्रेमाच्याच असतात.आयुष्य म्हणजे अनेक गोष्टींचा समतोल असतो, बॅलन्स असतो हेच अनेकांना कळत नाही. जगण्याचे अनेक सुंदर घटक आहेत, तेही महत्त्वाचे आहेत, हे तरुणांर्पयत पोहचत नाहीत. आजच्या काळात ब्रेकअप ही कॉमन गोष्ट आहे. त्यानं त्रास होईल; पण त्यापलीकडे आयुष्यच नाही, असं वाटून घेता कामा नये, ते पचवून पुढं जात राहायला हवं, हे तरुणांनी स्वतर्‍लाही समजवायला हवं.घुसमट थांबवून मनमोकळं जगायला हवं.

(लेखक तरुण मुलांसाठी मानसोपचारांविषयक जगजागृती करणारे मानसोपचार तज्ज्ञ आहेत.)शब्दांकन- ऑक्सिजन टीम