शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

ग्रामपंचायतीवर तुमचा कण्ट्रोल आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 2:46 PM

तरुण पोरंही डायलागबाजी करतात, ग्राम पंचायतीला शिव्या देत म्हणतात, आजकाल भल्याचा जमानाच राहिला नाही. गावचा काय इकासच झाला नाही; पण तो व्हावा म्हणून तुम्ही काय केलं?

- मिलिंद थत्ते 

आमच्याकडे ग्रामसभा होतच नाय हो. कधी भरते काही कळतच नाही. पण तसंही आपल्याला काय करायचंय ग्रामसभेत जाऊन? तिथे नुसती भांडणं नि राजकारण! ते पंचायतीची मानसं सह्या घेत हिंडतात रजिस्टरवर, घरपोच सेवा म्हना की. आपण ग्रामपंचायतीत जायचं काही कामच पडत नाई बगा..अशी डायलॉगबाजी सगळीकडे ऐकू येते. तरुण पोरंही हेच बोलतात. आणि मग दर पाच वर्षानी ‘आजकाल भल्याचा जमानाच राहिला नाही’, ‘गावचा काय इकासच झाला नाही’ म्हणत ग्रामपंचायतीला शिव्या देत राहातात. आपणच निवडून दिलेले ग्रामपंचायत सदस्य, मग त्यांना नियंत्रितपण आपणच ठेवलं पाहिजे, आपणच नियंत्रित करण्याची असते ती ग्रामपंचायत. तसं केलं नाही तर आपण दिलेल्या शिव्या आरशावर आपटून परत आपल्याच मुस्काटीत बसतात. तेव्हा असंच आरशाशी खेळत राहण्यापेक्षा गावात काही बरं करायचं असेल तर ग्रामपंचायत कायदा थोडा समजून घेतला पाहिजे. फार मोठा नाही हा कायदा फक्त 90 पानांचा आहे, म्हणजे उशाखाली घ्यायला उपयोगाचा नाही. वाचायला फार मोठा नाही. सुरुवातीला कायदा वाचताना झोप येते खरी पण हळूहळू तो समजू लागतो. आपण एपिझोड करून कायदा वाचला तर लई सोपं जातंय. सुरू करूया? ओ, हा कायदा मिळणार कुठे पण? ही घ्या लिंक https://bhasha.maharashtra.gov.in/pdf/RajyaMarathiAdhiniyam/1959-3.pdf  

झाला ना डाउनलोड? प्रत्येक कायद्यात सुरुवातीला कलम ? मध्ये कायद्याचं नाव, कलम 2 मध्ये तो कायदा कुठे लागू असणार, व कलम 3 मध्ये कायद्यातील शब्दांच्या व्याख्या असतात. मग कायदा सुरू होतो. (‘कलम’ आसं कुटं लिवलेलं नस्तं. परिच्छेदाच्या सुरु वातीचा ठळक आकडा म्हंजी कलम)  आत्ता हा कायदा वाचताना आपण थेट उडी मारूया कलम 7 वर. का म्हणजे? तिथे तुमचं नाव लिहिलंय हो! बघा आहे का?1. ग्रामसभेच्या सभा ग्रामसभेच्या सभा निदान चार व्हायला हव्यात, दोन सभांमध्ये चार महिन्यांपेक्षा जास्त गॅप असता कामा नये, ग्रामसभेची सभा बोलावलीच नाही तर सरपंच व ग्रामसेवकावर कोणती कारवाई होऊ शकते असे सगळे या कलम 7 मध्ये आहे. त्यात अनेक पोटकलमे आहेत. त्यातले (9) बघा - ग्रामसभेतच पुढच्या ग्रामसभेची तारीख-वेळ-ठिकाण ठरवता येते. याचा अर्थ असा की तुम्ही ग्रामस्थ मतदारांनी मिळून मागणी केली तर दर महिन्याला/दर आठवडय़ालासुद्धा ग्रामसभा बसू शकते. आमच्या चळवळीतल्या अनेक गावांत अशा दरमहा ग्रामसभा होतात. त्यांची कामे लटकून राहात नाहीत, चालू कामांबाबत ग्रामसभेत प्रश्न विचारले जातात. कामांच्या गुणवत्तेवर देखरेख राहाते. दुसरा अर्थ 7(9)चा असा की - ग्रामसभेचे ठिकाण व वेळसुद्धा तुम्ही ठरवू शकता. दरवेळी ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या आफिसातच भरली पाहिजे असं नाही. तुमच्या वस्तीतसुद्धा ग्रामसभा होऊ शकते. तुमच्या सोईच्या वेळी होऊ शकते. पुढच्या पोटकलमात म्हणजे 7(10)मधे आणखी भारी गोष्ट आहे.. पण मीच सगळं कशाला सांगू? बघा की वाचून.

    (लेखक ‘वयम्’ चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)