- मेघना ढोके
धोनी सिनेमात एक डायलॉग आहे.धोनी त्याच्या मित्रंना सांगतो की, ‘पता है हम मॅच कहां हारे?- बास्केटबॉल कोर्ट पे!’एवढाच डायलॉग. लहानसा. पण धोनीच्या डोक्यात काय चालतं याची एक झलक त्यातून दिसते, सिनेमात ते सारं फार त्रोटक आहे तरीही आपल्याला कळतं की, धोनी ‘माणसं’ आणि त्यांचं ‘वर्तन’ कसं वाचतो.धोनी गोष्ट सांगत असतो, बिहार विरुद्ध पंजाब अंडर 19 मॅचची. ज्या सामन्यात एकटा युवराज सिंग बिहारच्या संपूर्ण संघानं केलेल्या स्कोअरपेक्षा जास्त स्कोअर करतो. बिहारला दुस:यांदा बॅटिंगही मिळत नाही, इतकी वाईट स्थिती होते.त्या पराभवाचं विश्लेषण करताना धोनी सांगतो की, ‘पता है हम मॅच कहां हारे- बास्केटबॉल कोर्ट पे!’
त्याचं कारण असं की, त्याच्या संघ सहका:यांनी युवराज सिंगला बास्केटबॉल कोर्टवर पाहिलेलं असतं, त्याचा ऑरा, त्याची स्टाइल, त्याची बाइक, त्याच्या फटकेबाजीची ऐकीव माहिती हे सारं त्यांच्या डोक्यात असतं. युवराजला पाहून ते इतके इम्प्रेस होतात, क्या प्लेअर है यार म्हणतात.आणि त्याच्यापुढे आपण किस झाड की पत्ती असं मनोमन वाटून तिथंच मनानं हरतात. आणि मैदानावरही हरतात.- आपण नक्की कुठं हरलो हे अचूक कळतं धोनीला ते असं ! त्याच्या खेळण्याचे, त्याच्या स्मॉल टाउन असण्याचे, त्याच्या स्थितप्रज्ञ शांततेचे अनेक किस्से तो परवा रिटायर झाल्यापासून आणि त्या आधीही आपण पाहतो, वाचतो आहोतच..पण धोनी नावाच्या या माणसाच्या डोक्यात नेमकं चालतं काय? कुठून येते इतकी टोकाची शांतता, इतका साक्षीभाव की तो त्याला हवं ते करतो, त्याच्या इन्स्टिंक्टप्रमाणो, शांतपणो करतो, हरतो-जिंकतो, निघून जातो. पण त्याचा मानसिक तोल मात्र ढळत नाही.हे सारं तो कुठून शिकला असेल?त्याची उत्तरं अर्थात धोनी कधी द्यायचा नाही, कारण आपल्या प्रोसेसविषयी वचावचा बोलणा:या माणसांच्या रांगेत तो कधी नव्हताच.मात्र मैदानावर आणि मैदानाबाहेरही तो जसा वावरतो, त्यातले काही तुकडे जमवले तर धोनी इतका ‘कुल’ कसा. इतका अलिप्त कसा, इतका ‘वर्तमानात’ कसं जगतो, याचा काही एक अंदाज कदाचित येऊ शकेल.पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी त्यांच्या डेमोक्रसीज इलेव्हन या पुस्तकासाठी धोनीची मुलाखत घेतली होती.त्या पुस्तकात ते सांगतात, मी धोनीला विचारलं, ‘अपार मन:शांती, ही स्थितप्रज्ञता हे सारं तू कुठून शिकलास? कसं करतोस हे सारं? त्यावर तो हसतो, म्हणतो, ‘मी असाच आहे हो. जगणं फार अवघड करून, घोळ घालून मला जगताच येत नाही. फार गुंता करायचा, मग तो सोडवायचा हे काही जमत नाही. मी आला क्षण जगतो. तो क्षण संपला की पुढचा क्षण, मागचापुढचा विचार करत बसत नाही. एखादा दिवस बरा जातो, यश मिळतं; एखाद्या दिवशी नाही होत मनासारखं काही. त्यात आपण काय करू शकतो? परिस्थिती कशीही असो, मी शंभर टक्के प्रयत्न करतोय याची खात्री असली म्हणजे झालं. तसं केलं की जे घडतं ते तुम्ही स्वीकारत जाता, जे मिळतं त्यात आनंद होतो. तुम्हाला तहान लागलेली आहे, ग्लासभर पाणी तुमच्या हातात आहे. पिऊन टाकायचं. पाण्याची बाटलीच मिळाली नाही म्हणून काय दु:ख करत बसायचं. ग्लासभर पाण्यानं याक्षणाची तहान भागली ना आत्ता, झालं तर!!’ - असं धोनी म्हणतो तेव्हा लक्षात येतं की, ग्लास अर्धा भरलेला की अर्धा रिकामा या चर्चेत अडकलेल्या जगात म्हणून धोनी वेगळा दिसतो. त्याचंच हे आणखी एक उदाहरण. भारतीय अ संघात धोनीला संधी मिळाली. पाकिस्तान अ संघाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत त्यानं केनियात शतक केलं.त्या दौ:यात आकाश चोप्रा धोनीचा रूममेट होता. आकाश सांगतो, ‘फार मुश्किलीनं धोनी एखादा शब्द बोलला तर बोलायचा. गप्प गप्प असायचा. मी रूम सव्र्हिसला फोन करून ऑर्डर द्यायचो, काय पदार्थ हवे ते सांगायचो. तो बाहेर जाऊन एखादा मिल्कशेक पिऊन यायचा. पेस्ट्री खायचा की झालं. मी त्याला विचारलं की, ‘तू किती वाजता झोपणारेस?’ त्यावर तो हसून म्हणायचा, ‘आप जब चाहें लाइट बंद कर दो आकाशभाई, मै सो जाऊंगा!’ जे आयुष्यानं दिलं ते स्वीकारलं, काहीच, कशाशीच तक्रार नसल्यासारखा वागायचा. तो बेफिक्र जगायचा; पण निष्काळजी नव्हता. जे मैदानाबाहेर तेच मैदानातही. बॅटिंग-किपिंग करत नसेल तर उत्साहानं आमच्यासाठी बॉलिंगही करायचा, प्रसन्न असायचा!’ पण हे असं वागणं जमतं कसं, यावर धोनी म्हणतो, ‘मी आयुष्य फार गुंतागुंतीचं करत नाही. माझा एकूण अॅटिटय़ूड असा की, कीप थिंग्ज सिंपल. घोळ नकोत. त्या दौ:यात तरी काय आपल्याला परदेशी जायला मिळतंय, आपण भारतीय अ संघात खेळतोय याचाच मला आनंद झाला होता. माङया स्वत:कडून, आयुष्याकडून फार अपेक्षा नव्हत्या. या दौ:यात काहीतरी सिद्धच करू म्हणून मी इरेला पेटलो नव्हतो. अपेक्षा कमी ठेवल्या जगण्याकडून की फार मोठे अपेक्षाभंग होत नाहीत!’- हे असं सोपं करून जगताना धोनी माणसं मात्र वाचत असतो, म्हणून तर तो कॅप्टन कुल झाला, अनेक तरुण मुलांना त्यानं विश्वासानं मैदानात उतरवलं, कुणालाच माहीत नसलेल्या जोगिंदर शर्माच्या हाती सामन्याच्या लास्ट ओव्हर देतानाही हा माणसं वाचण्याचा भरवसाच त्याला जिंकवून जातो.या निर्णयांविषयी धोनी सांगतो, ‘हम इंडियन्स ना हमेशा इमोशन पे काम करते है!’ सोबत काम करताना भावनिक तारा जुळल्या की आपल्याला बरं वाटतं. सोपं होतं काम. क्रिकेटपटूंचही तेच. संघातला प्रत्येक खेळाडू वेगळा, त्याचा स्वभाव वेगळा, त्याची भावनिक गरज वेगळी असते. कुणाला प्रेमानं समजावून सांगावं लागतं, कुणाला गळ्यात हात घालून मायेनं सांगितलं की बरं वाटतं, कुणाकुणाला कचकचून शिवी हाणली ना तरच बरोबर समजतं काय करायचं ते!’माहीभाई नावाच्या कप्तानाची ही जादू असते. सहका:यांशी जुळवून घेण्याची मानसिक प्रक्रिया त्याला गवसते, म्हणून त्याचे सहकारी जाहीर सांगतात की, आम्ही माहीभाईमुळे घडलो.आणि हे सारं असं सुरूअसताना, तो जसा अचानक टेस्टमधून निवृत्त झाला तसं त्यानं एकदिवस जाहीर करून टाकलं की, मला रिटायर समजा..पण त्याला खरंच नसेल वाटलं की अमुक रेकॉर्ड, तमुक वर्ल्डकप खेळून जावं.त्याचंही उत्तर त्यानं सरदेसाईंना दिलेल्या मुलाखतीत सापडतं. सरदेसाईंनी त्याला विचारलं, तुझी कोणती खेळी तुङया चाहत्यांनी लक्षात ठेवावी, क्रिकेटपटू म्हणून असं काय आहे, जे तुला फार प्यारं आहे? त्यावर तो सहज सांगतो, अलिप्तपणोतो म्हणतो, ‘क्रिकेटचे रेकॉर्ड, आकडेवारी यात मला काही गम्य नाही. लोकांनी काढलीच माझी आठवण तर म्हणावं की, धोनी फार चांगला माणूस होता, याहून वेगळं काय मोठं असणार?’- खरंच काय असणार?
meghana.dhoke@lokmat.com(लेखन संदर्भ : डेमोक्रसीज इलेव्हन हे राजदीप सरदेसाई यांचं पुस्तक- प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस)