- अनन्या भारद्वाजउन्हाळा सुरू झाला की डल वाटणं, मूड जाणं हे तसं नेहमीचंच. त्यात जीव पाणी पाणी करतो. कंटाळा येतो. मूड जातो. त्यात मूड जाऊन चालत नाही. आपली कामं आणि परीक्षा काळात अभ्यास वाट पाहतात. त्यामुळे मूड सांभाळणं गरजेचं असतं.
मुख्य म्हणजे हे लक्षात ठेवायला हवं की जे आपण खातो त्याचा थेट परिणाम आपल्या तब्येतीवरच नाही तर मनावरही होत असतो. डीकीन विद्यापीठाच्या एका अलीकडच्या अभ्यासानुसार चुकीचं खाणं, चुकीच्या वेळी खाणं, फार काळ उपाशी राहणं, प्रोसेस्ड किंवा जंक फूड खाणं याचा थेट संबंध मानसिक आरोग्याशी आणि आपल्या नैराश्याशीही असतो. त्यामुळे आपलं नैराश्य, ताण हे केवळ मानसिक आहे की आपल्या रिकाम्या किंवा वेळीअवेळी भरणाऱ्या पोटाशीही त्याचा संबंध आहे हे एकदा तपासून पाहिलेलं बरं. या अभ्यासात एका प्रयोगानुसार काही मुलांना फळं, भाज्या, ताजं अन्न रोज वेळच्या वेळी देण्यात आलं. दुसºया गटाला त्यांच्या आवडीचं जंक फूड वेळीअवेळी उपलब्ध करण्यात आलं. परिणाम असा झाला की आवडीचं खायला मिळत असूनही दुसºया गटातल्या मुलांना नैराश्यानं लवकर गाठलं.
म्हणूनच हे लक्षात ठेवायला हवं की वाट्टेल ते खाणं नाही. एखादी छोटीसी ‘हेल्दी’, जंक नव्हे गोष्ट खाऊन मस्त ताजंतवानं वाटू शकतं. नियमित जेवण आणि व्यायामासह परीक्षेच्या काळात या काही पदार्थांच्या सेवनानं ताजंतवानं वाटू शकतं..
१) केळीअभ्यासानं मन, शरीर थकलं तर केळी खाणे उत्तम. त्यानं चटकन तरतरी येते.
२) आंबातो तर उन्हाळ्यात मिळतोच. त्यामुळे वजन वाढेल, पिंपल्स येतील याची फिकीर न करता आंबा खावा. मूड फ्रेश होतो.
३) चॉकलेटहे तर नेहमीचे. एक चॉकलेट खा, चटकन शरीराला साखर मिळते आणि मूड येतो. एक कप चहापेक्षा चॉकलेट बरे.
४) अक्रोडएक अक्रोड. पण त्यात ताकद फार असते. त्यामुळे परीक्षेच्या काळात अभ्यास करून मेंदू शिणला की एक अक्रोड खाणं उत्तम.
५) गूळ-पाणीहे पूर्वीचं. जुनं. मात्र गुळाचा खडा चघळून घोटभर पाणी प्या. भर उन्हात तरतरी येते.