शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

मलाला सांगतेय,  कोरोनाकाळात ग्रॅज्युएट होण्याचा आनंद आणि खंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 5:14 PM

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून नुकतीच ‘पीपीई’ची डिग्री घेतलेली मलाला युसूफजाई सांगते..

ठळक मुद्देजग बदला; पण सोबत.

मलाला युसूफजाई.तरुणांची आयकॉन आणि शौर्याचं धगधगतं प्रतीक म्हणून ती आपल्या सर्वाना माहीत आहे. तालिबान्यांविरुद्ध शाळकरी वयातच तिनं पुकारलेल्या संघर्षामुळे, मुलींच्या शिक्षणाचा आग्रह धरल्यामुळे तालिबान्यांच्या रोषाला बळी पडून तिला डोक्यात गोळ्याही ङोलाव्या लागल्या. त्यातून ती वाचली; पण तरीही तिनं आपलं काम थांबवलं नाही. तिच्या याच शौर्यामुळे 2014 साली शांततेचा नोबेल पुरस्कार तिला मिळाला. तालिबान्यांच्या हल्ल्यातून वाचल्यानंतर तिनं इंग्लंडमध्ये आपलं शिक्षण सुरू केलं, मुलींच्या शिक्षणासाठीचा आग्रह सुरूच ठेवला, हे सर्व आपल्याला माहीत आहे, पण.सध्या काय करतेय मलाला? कुठंवर आलंय तिचं शिक्षण?.मलालानं काही दिवसांपूर्वीच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून ‘पीपीई’ची डिग्री घेतलीय. कोरोनाच्या काळातच तिनं ही डिग्री घेतली असली तरी आपल्याला माहीत असलेल्या ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट’- या ‘पीपीई’शी त्याचा काही संबंध नाही.तिनं डिग्री घेतलीय ती फिलॉसॉफी, पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स (पीपीइ)  या विषयांत.डिग्री तर तिनं घेतलीय; पण मग सध्या ती काय करतेय?मलाला सांगते, मी सध्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. नेटफ्लिक्सवरचे कार्यक्रम पाहणं, वाचन करणं आणि झोपेचा कोटा पूर्ण करणं. या कामात मी सध्या व्यस्त आहे!आपल्या सर्वाप्रमाणोच आपला सक्सेस ती एन्जॉय करतेय; पण त्याबरोबरच ती जे सांगतेय ते अधिक महत्त्वाचं आहे. ती म्हणते, डिग्री घेतली, म्हणजे शिक्षण पूर्ण झालं का? ते कधीच पूर्ण होत नाही. त्यामुळे माझंही शिक्षण पुढे सुरूच राहील.कोरोनाकाळात शेवटच्या काही महिन्यांत तिला कॉलेजला जाता आलं नाही, मित्र-मैत्रिणींसोबत मौजमजा करता आली नाही, कॉलेज लाइफ हवं तसं जगता आलं नाही. पाकिस्तानात लोकांच्या जगण्यातही क्रिकेट आहे, क्रिकेटची ती नशा इथे नाही, ती तिला अनुभवता आली नाही, या सा:याची खंत तिला आहेच; पण ती म्हणते, शिक्षणात एक वेगळ्या प्रकारची नशा, मजा आहे. स्वातंत्र्याचा पहिला अनुभव तुम्हाला कॉलेज लाइफमध्ये मिळतो. अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टी. आपलं शेडय़ूल सेट करणं, आज काय खायचं हे ठरवणं, आपला रविवार कसा घालवायचा याचं प्लॅनिंग करणं. अशा क्षुल्लक गोष्टीही तुम्हाला रोमांचित करणा:या असतात. कॉलेज लाइफचा आनंद घेत असतानाच आपल्यापुढची आव्हानं आणि भविष्य याचीही तिला जाणीव आहे. मलाला म्हणते, कोरोनानं आणलेली जागतिक महामारी, आर्थिक मंदी, वंशविद्वेष, असमानता या सा:या गोष्टींमुळे भवितव्य अनिश्चित झालं आहे, शरणार्थी आणि धार्मिक अल्पसंख्याकांचं रक्षण करण्यात, शाळांवरील हल्ले थांबवण्यात, हवामानबदल अस्तित्वात आहेत, हे कबूल करण्यात जगभरातील सरकारं अपयशी ठरली आहेत हे आम्ही पाहिलं आहे, आमच्या मालकीचं जग मोडून पडलेलं आहे, हे पाहात आम्ही मोठे झालो आहोत आणि या सा:याची जबाबदारी आता आम्हा तरुणांवर येऊन पडलेली आहे; पण आम्ही त्याला तयार आहोत, कारण कोणत्याही बदलांविरुद्ध लढण्याची आम्हाला आता सवय झाली आहे. परिवर्तनासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी आणि आपले उद्दिष्ट साध्य करता येईल यावर विश्वास ठेवण्याचं धैर्य ही आमच्या पिढीची खासियत आहे. लहान मुलांना उद्देशून ती म्हणते, लीडर होण्यासाठी तुम्हाला प्रौढ होईर्पयत प्रतीक्षा करण्याची गरज नाही. तरुणांनी ही धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे; पण या जगानं आपल्यापुढे इतक्या समस्या वाढून ठेवल्या आहेत, की एका पिढीत त्यांचं निराकरण होणं शक्य नाही, तर प्रौढांना सल्ला देताना ती सांगते, व्हा पुढे, तुम्हाला बदलण्यास अजूनही फार उशीर झालेला नाही.

कोरोनामुळे कॉलेज लाइफ अनुभवता न आल्याची खंत मलाला व्यक्त करते, डिग्री घेतल्यानंतरचा आनंद व्यक्त करताना नेटफ्लिक्सवर कार्यक्रम पाहण्याची आणि झोपा काढण्याची तारुण्यसुलभ भावनाही व्यक्त करते, पण आपल्या जाणिवा, भान आणि जबाबदा:या यांचा विसर तिला पडलेला नाही. डिग्री घेतल्यानंतर एक अतिशय छोटंसं भाषण मलालानं केलं. त्यात अत्यंत भावुकपणो ती म्हणते, कोविडमुळे ग्रॅज्युएशन सेरेमनीला मला मुकावं लागलं, त्याचं मला दु:ख आहे; पण कोविडमुळे ज्यांचं शिक्षणच थांबलं, अशी जगभरात एक अब्ज मुलं आहेत. त्यांचं काय? आपल्यापैकी अनेकांचं शिक्षण कोविडनंतर पुन्हा सुरू होईल, शाळा, कॉलेजात आपण पुन्हा प्रत्यक्ष जायला लागू, आपली स्वप्नंही पूर्ण होतील, आपण ती पूर्ण करू, पण अनेकजण, विशेषत: मुली; त्यातही विकसनशील देशांतील अनेक मुलींचं शिक्षणाचं स्वप्न कदाचित कधीच पूर्ण होणार नाही. आपापल्या वर्गात कदाचित त्या कधीच परतणार नाहीत, कोवळ्या वयातच त्यांची लग्नं लावली जातील किंवा कुटुंबाला हातभार लावण्यासाठी अत्यल्प मोबदला देणा:या कामांमध्ये त्यांना ढकललं जाईल. शाळा जेव्हा पुन्हा उघडतील, तेव्हा वर्गातील त्यांचे बेंच, त्यांच्या बसायच्या जागा आपल्याला रिकाम्याच दिसतील.मलाला पुढे म्हणते, या सा:या मुली आपल्या मैत्रिणी आहेत. आपल्याइतकाच त्यांनाही शिक्षणाचा अधिकार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही पुढे जात असताना, त्यांचीही आठवण ठेवा. घराबाहेर पडून, तुम्ही निदान तुमच्या स्वत:पुरतं तरी जग बदलणार आहात; पण अशावेळी त्यांना मागे सोडू नका. त्यांना सोबत घ्या. कोविडमुळे 2क्2क् या वर्षात आपण काय गमावलं यापेक्षाही त्याला आपण कसा प्रतिसाद दिला, यावरच या वर्षाचा इतिहास, त्याचं यशापयश लिहिलं, मोजलं जाणार आहे. हे जग आता आपलं, आपल्या हातात आहे. त्याचं आपण काय करतो, काय बनवतो, हे पाहाण्यास मी उत्सुक आहे..