शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

लग्नाचं वय उलटलं तरी का जमतं नाहीयेत तरुण मुलांची लग्न?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 4:55 PM

‘वेल सेटल्ड’ या दोन शब्दांनी अनेक तरुण मुलांना पळता भुई थोडी केल्याचं चित्र दिसतं. कारण मुली आणि त्यांचे पालक वेल सेटल्ड या शब्दाची व्याख्याच विस्तारत आहेत असं तरुण मुलं सांगतात. स्वभाव, कुटुंब, शिक्षण हे सारं न पाहता, शेती-नोकरी, पगार, गाडी आणि स्वतर्‍चं घर यावरच मुलांचा ‘भाव’ ठरतो असं अनेकजण सांगतात.

ठळक मुद्देलग्नाचं वय उलटून जातं तरी लग्न ठरत नाहीत, ठरली तर मोडतात, मध्यस्थ छळतात हे सारं वास्तव या पत्रांतून उलगडत राहतं. सामाजिक-आर्थिक कारणांच्या पोटात वैयक्तिक आयुष्याला कसा चूड लावतो हे सांगणारी ही निवडक पत्रं म्हणूनच प्रसिद्ध करत आहोत.

- ऑक्सिजन टीम

‘न उडालेला बार’ हा लेख ‘ऑक्सिजन’ने (दि. 4 ऑक्टोबर 2018) प्रसिद्ध केला होता. तिशी उलटून गेली तरी आता तरुण मुलांची लग्न ठरत नाहीत असं सांगणारा हा लेख. त्या लेखाद्वारेच ‘ऑक्सिजन’ने तरुण मुलांना प्रश्न विचारला होता, ‘लग्न अडलंय का तुमचं?’का अडलंय, तरुण मुलांची लग्न का जमत नाही, असं तुम्हाला वाटतं? तुमचा अनुभव काय म्हणतो?या प्रश्नांवर खेडय़ापाडय़ातून, निमशहरांतून तरुण मुलांनी भरभरून पत्रं आणर्ि -मेल्स पाठवल्या. त्या पत्रांत ‘बघण्या-पाहण्याचे’ कार्यक्रम, मध्यस्थ, मुलींच्या अपेक्षा आणि त्या अपेक्षांना पुरे न पडण्यानं मिळणारे नकार याविषयी अनेकांनी भरभरून लिहिलं!‘वेल सेटल्ड’ या दोन शब्दांनी अनेक तरुण मुलांना पळता भुई थोडी केल्याचं चित्र दिसतं. कारण मुली आणि त्यांचे पालक वेल सेटल्ड या शब्दाची व्याख्याच विस्तारत आहेत असं तरुण मुलं सांगतात. स्वभाव, कुटुंब, शिक्षण हे सारं न पाहता, शेती-नोकरी, पगार, गाडी आणि स्वतर्‍चं घर यावरच मुलांचा ‘भाव’ ठरतो असं अनेकजण सांगतात.अर्थात काहीजण हे खुल्या मनानं कबूल करतात की, यात दोष मुलांचा आणि त्यांच्या पालकांचाही आहे. हुंडय़ाचे रेट इतके वाढून ठेवलेत की, एवढा पैसा मोजून जर आपली मुलगी द्यायची तर मुलगाही भरभक्कम आर्थिक स्थितीचाच असावा असं पालकांना वाटतं.मात्र यासार्‍यात लग्नाचं वय उलटून जातं तरी लग्न ठरत नाहीत, ठरली तर मोडतात, मध्यस्थ छळतात हे सारं वास्तव या पत्रांतून उलगडत राहतं.सामाजिक-आर्थिक कारणांच्या पोटात वैयक्तिक आयुष्याला कसा चूड लावतो हे सांगणारी ही निवडक पत्रं म्हणूनच प्रसिद्ध करत आहोत.

मुलींच्या 3 अपेक्षा

 या तीन अपेक्षांमुळे तरुण मुलांची लग्न जमत नाहीत असं तरुण मुलं म्हणतात. तरुण मुलं म्हणतात की, मुलींच्या आणि विशेषतर्‍ त्यांच्या पालकांच्या अपेक्षा भयंकर वाढलेल्या आहेत. ‘वेल सेटल्ड’ या दोन शब्दांत सारं जग सामावलेलं असतं. त्यामुळे अनेकदा मुलीच नकार देतात. मात्र तरीही ढोबळमानानं मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या 3 अपेक्षा असतात असं बहुसंख्य पत्रांत तरुण मुलांनी नोंदवलं आहे.1) मुलाचं स्वतर्‍च्या मालकीचं (तेही मोठं) घर हवंच.2) शहरात उत्तम पगाराची नोकरी हवी, शहरातच घरही हवं. मात्र सोबत गावाकडे भरपूर शेती हवी.3) शक्यतो कुटुंब छोटंच हवं. लगAानंतर कुटुंबीयांची जबाबदारी घ्यायला नकार.

मुलींच्या 2 अटी

लग्न ठरवताना मुलींच्या या अटी मुलांनाच जाचक वाटतात!

तरुण मुलं म्हणतात की, मुलींच्या अपेक्षा तर वाढलेल्या आहेतच; पण त्यांच्या अटीही विचित्र आहेत. त्या दोन अटी प्रामुख्यानं या पत्रांत भेटतात.1. मुलाची गावाकडे शेती हवीच. तीही भरपूर हवी. शेती नसलेला मुलगा नको. मात्र अट अशी की, शेती असली तरी गावी शेती करणार नाही.2. नोकरी मी वाटलं तर करीन; पण नोकरी करच असा आग्रह करायचा नाही.

दोष तरी कुणाला द्यायचा?

मुली जन्मालाच न घालणार्‍या समाजाला की जीवनशैलीच बदलून टाकणार्‍या व्यवस्थेला?

तसं लग्न झालेल्या व्यक्तीनं ‘न उडालेला बार’ या विषयावर बोलणं बर नव्हे. तरीपण जीव राहवेना म्हणून हा उपद्व्याप करावासा वाटला.तसा वयाच्या मानाने लग्नासंबंधीचा माझा अनुभव जरा पोक्तपणाचा वाटेल पण लग्नाच्या बाजारात चांगलीच दमछाक झालेले अनेक जीव भेटतात आणि मग बोलता बोलता समाजासमोर उभ्या असणार्‍या सर्वात ज्वलंत प्रश्नास वाचा फुटू लागते. आता लग्नाचा उमेदवार म्हणलं की एक विशिष्ट मापदंड लावला जातो मग तो मुलगा असो व मुलगी.आता अपेक्षा करायला मुलांकडे स्कोप नाही राहिला तो भाग वेगळा.भौतिक सुखाच्या मागे लागलेले सारेच अपेक्षांची भली मोठी यादी बनवून लग्नाचा बाजारहाट करू लागतात, त्यात ना स्वतर्‍ची क्षमता बघितली जाते ना दुसर्‍याची ऐपत. दोष तरी कोणाला द्यायचा? ज्याला लग्न करायचं आहे त्यालाच माहीत नसतं की त्याला काय हवंय. मेंढरांच्या कळपाप्रमाणे एकामागे एक जात राहतात.मुलीसाठी मुलगा पाहताना मुली अगोदर मुलीच्या आईची अपेक्षांची यादी तयार असते. सरकारी नोकर, फ्लॅट, गाडी, बँक बॅलन्स, गावाकडे जमीन आणि पाठीमागे कोणी नसलेलेच बरे. ज्याच्या सोबत मुलीला आयुष्य काढायचं आहे तो मुलगा मग कसाही असला तरी चालतो हे सगळं असलं की त्याच्या वाईट सवयी लगेच एटिकेट्समध्ये बदलल्या जातात. उदा. सोशल ड्रिंकर, प्रोफेशनल स्मोकर, सोशल इत्यादी इत्यादी.फक्त शेतजमीन नाही म्हणून अनेक सुशिक्षित मुलांची लग्न होत नाहीयेत, बरं शेतजमीन म्हणावी तर शेतकर्‍यांनापण कोणी मुली देत नाही. मग नेमकं हवंय तरी काय मुलींना आणि त्यांच्या घरच्यांना. सगळं कसं एकदम तयार हवं, जिथल्या तिथे काय तर म्हणे मुलीला त्रास नको, अरे मुळात कष्टातला आनंदच विसारलीयेत ही माणसं. अलीकडे लोक एकत्र कुटुंबात मुलगी द्यायला तयार नाही होत. जास्ती नाती नको म्हणतात.  आताशा मुलाचं लग्न होत नाही म्हणून झुरणारे आईबाप पाहिले की जीव व्याकूळ होतो पण दोष कोणाला द्यावा?तथाकथित वंशांच्या दिव्यांसाठी लाखो निष्पाप कळ्या खुडणार्‍यांना?हे अशाच लोकांचे हे पाप आता हा समाज भोगतोय. मुलांनी तर लग्न होत नाही म्हणून बोभाटा का करावा?कोणता बाप आजमितीला छातीठोकून सांगू शकतो की, माझा मुलगा निव्र्यसनी निष्कलंक आहे.ठेवलाय का तो अभिमान आपण आपल्या बापासाठी शिल्लक? नाही ना? ओठावर मिसरूड फुटलं नसताना बापानं सोसायटी काढून गाडी घेऊन दिली. लाडाचं लेकरू म्हणून आईनं हात सैल सोडला त्याचा हा परिणाम. लग्न जमत नाही हा शब्द आपण अनेकांच्या तोंडातून ऐकतो याचं कारण मुळात बदलत चाललेली जीवनशैली आहे असं मला वाटतं. पूर्वी एकत्र कुटुंबात पाहुण्यांच्या ओळखीने लग्न जमत असत, आता आपण ही व्यवस्थाच उखडून टाकली आहे. आपण मात्र आता शहाणं व्हायला हवं. मुळात लग्नाळू लोकांना समजायला हवे आपल्याला काय हवं आहे. बोलायला हवं. व्यक्त व्हायला हवं. सर्वात महत्त्वाचं स्वतर्‍ला सिद्ध करून दाखवायला हवं. घेतलेलं शिक्षण डिग्रीच्या रूपात भिंतीवर न टांगता ते आपल्या व्यक्तिमत्त्वात उतरवायला हवं.तर अनेक गोष्टी सुकर होतील.

डॉ . विवेक  डोईजड 

 

यंदा बुंदी खाऊ घालतोस की नाय? 

असं विचारा खेडय़ापाडय़ात तरुण मुलांना, उत्तर म्हणून वास्तव सापडेल!

महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा जरासा कानोसा जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर हल्ली ग्रामीण भागात मुली अन् त्यांच्या पालकांच्या नवरदेवाविषयी असलेल्या मानसिकतेचे दर्शन होईल. काय आहे सध्या गावाखेडय़ातील वास्तव? गावातील मुलींना कसला मुलगा हवा आहे त्यांच्या सहजीवनाच्या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी? मुलीच्या वडिलांच्या आपल्या होणार्‍या जावयाकडून कुठल्या अपेक्षा आहेत.?या प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न केल्यास गावाखेडय़ातील मुलींच्या व त्यांच्या पालकांच्या बदलत्या मानसिकतेचे वास्तव समोर येईल. एक काळ होता, जेव्हा शेती सधन समजली जाई. शेतीमधून निघणारे उत्पन्न व त्या मालाला मिळणारा योग्य भाव यामुळे नोकरीकडे कुणी ढुंकूनही पाहत नव्हते. आजही असे अनेक उदाहरणे सापडतील ज्या लोकांना चांगल्या नोकरीच्या संधी चालून आल्या होत्या. मात्र त्यांनी त्या नाकारल्या. त्यावेळी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी अशी म्हण प्रचिलत होती ती याचमुळे. हरितक्रांती व धवलक्रांतीने संपूर्ण चित्रच पालटले. सुधारित बी-बियाणे व रासायनिक खत-औषधांच्या वापराने शेती उत्पन्न प्रचंड प्रमाणात वाढले. एकेकाळी अन्नधान्य आयात करणारा भारत देश गहू व तांदळाचा प्रमुख निर्यातदार बनला. शेतमालाच्या प्रचंड उत्पादनामुळे शेतमालाचे भावदेखील घसरले. त्यामुळे शेती ही घाटय़ाच्या सौदा ठरू लागली. त्यातच वातावरणात झालेल्या आमूलाग्र बदलामुळे निसर्गाचा लहरीपणा शेतीसाठी मारक ठरू लागला. शेतीमधून आर्थिक फायदा साधणे शक्य होईना, उलट होणारा खर्चदेखील वसूल होत नसल्याने शेतकर्‍यांवरील कर्जाचा डोंगर वाढत गेला. अन् यातूनच मग शेतकरी आत्महत्या यांसारखे प्रकार समोर यायला लागले. एकूणच शेतीविषयक नकारात्मक वातावरण तयार झाले. मुलींची शेतकरी मुलांविषयी बदललेल्या मानसिकतेला हीच कारणं कारणीभूत आहेत.आजघडीला कुठल्याही मुलीला शेती करणारा मुलगा नवरा म्हणून नको आहे. मुलीच्या पालकांची अपेक्षादेखील हीच आहे. एखाद्या ठिकाणी चपरासी असलेला मुलगा चालेल पण शेतकरी नको अशी हल्लीच्या मुलींची मानसिकता. आधीची बेरोजगारीशी दोन हात करणार्‍या देशात नोकरदार मुलगा मिळणे म्हणजे दुर्मीळ गोष्ट. त्यातही सरकारी नोकरी असलेला नवरदेव अपवादानेच मिळतो. त्यामुळे मग एखादा व्यवसाय करणारा, कंपनीत कामाला असणारा किंवा एखादे दुकान चालणार्‍या वराला पसंती दिली जाते. मुलींचा जन्मदर घटल्याने उपवर मुलींची संख्यादेखील कमी झाली आहे. गावाखेडय़ात जमिनीची विभागणी झाल्याने जेमतेम दोन ते पाच एकर जमीन असणारी कुटुंबेच अधिक. उत्पन्नाचा मोठा स्रोत नसल्याने या शेतकर्‍यांची मुले एकतर उच्चशिक्षण घेऊ शकत नाही. फारच ओढाताण करून किंवा एखादा सधन व्यक्तीनं त्याच्या मुलाला उच्चशिक्षण दिलं तरी नोकरी लागण्याची शक्यता फारच विरळ. व्यवसाय करावा तर पुरेसं भांडवल उपलब्ध नसतं. त्यामुळे ही मुले आपली वडिलोपार्जित शेती करून उरलेल्या रिकाम्या वेळात शेतमजुरी करतात. अगदीच भूमिहीन असणारे सालगडी म्हणून कामाला राहतात.  या मुलांच्या लग्नाचा खूप मोठा प्रश्न सध्या ग्रामीण भागात निर्माण झाला आहे. यांना मुलगी देण्यासाठी कुणीही तयार होत नाही. यामुळे गावोगावी लग्नासाठी इच्छुक असलेली लग्नाचं वय उलटलेली तरुण मुलं दिसतात.  एका मित्राला सहजच विचारले, काय मित्रा यंदा बुंदी खाऊ घालतोस की नाय.? तेव्हा त्याने दिलेलं उत्तर मोठे गमतीशीर होतं. तो म्हणाला, काय नारायण आमच्या सारख्यांना एखादा आश्रम काढवा लागणार बहुतेक. अशा एकेकटय़ांचे प्रश्न किती गंभीर होतील याची कल्पनाही आता करवत नाहीये! - नारायण काळे  (विद्यार्थी, एमजीएम वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालय, औरंगाबाद)

फक्त नकार!

लग्नाला तीन र्वष होत आली, पण मीही हे सारं भोगलं आहे. जवळ जवळ तीन र्वष माझ्या कुटुंबातील सदस्य माझ्यासाठी मुलीच्या शोधात होते (वैतागले होते अक्षरशर्‍). मी सूक्ष्मजीव शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. माझी मुलीबद्दलची अपेक्षा एवढीच होती की मुलगी किमान पदवीर्पयत शिकलेली असावी. (सायन्स विषयास प्राधान्य), साजेशी असावी, रंगाची अट नव्हती आणि हुंडय़ाची तर नव्हतीच नव्हती.माझं लग्न दोनवेळा मोडलं. एक वेळा फक्त बोलणी होऊन आणि दुसर्‍यावेळी रुपया होऊन. आता हे खात्रीपूर्वक सांगता येणार नाही की का मोडलं, पण माझ्या नातलगांनी या दोन्ही ठिकाणी जाब विचारण्यासाठी प्रयत्न केले. पण काही कारणं कळली नाहीत. मला माझ्या घरातल्या माणसांकडून प्रश्नांची सरबत्ती, तू काय काय बोललास सगळं सांग, मग त्यांची खात्री पटल्यावर माझी सुटी झाली. मला मिळाला तो फक्त मनस्ताप, संताप.  शेवटी लक्षात आलं की, पगार कमी होता, मालकीचं घर नव्हतं म्हणून लग्न ठरलं नाही. मुलगा पसंत असायचा; पण प्रश्न तेच. पगार किती, स्वतर्‍चं घर आहे का, शेती आहे का? या तिन्ही प्रश्नांची उत्तरं नकारात्मक आली की लग्नाला नकार यायचा.पुढे माझं लग्न झालं. ती सूक्ष्मजीवशास्त्रातच पदव्युत्तर शिक्षण घेतलेली आहे. तिनं ना माझा पगार विचारला ना हे सारे प्रश्न. फक्त निव्र्यसनी मुलगा नि स्वभाव पाहून होकार कळवला. - एक मित्र

स्ट्रगल करणार्‍यालाकोण पोरगी देणार?

चारएक दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, आम्ही रिसर्च स्टुडंट एकत्र बसलो होतो. बसल्याबसल्या चर्चा रंगल्या. चर्चेच्या एका वळणावर एका मित्रानं साथीदाराचा विषय काढला. लग्न करण्याचं योग्य वय काय? लग्न कधी करावं? कसं करावं? अशा अनेक प्रश्नांवर प्रत्येकानं मतं मांडली. एकानं म्हटलं ‘तुमच्या स्ट्रगलच्या काळात तुम्हाला साथीदार पाहिजे. संघर्षात तुम्हाला साथीदार असेल तर तो त्यात भागीदार होतो आणि संघर्ष निम्मा करतो.’हे वाक्य ऐकायला चांगलं होतं, असं असायला हरकत नाही. पण असं होत नाही ना! त्यामुळे मी आणि एकाने विरोधाची बाजू घेतली. वाढलेल्या अपेक्षा यावर आम्ही बोललो. चर्चेचं रुपांतर वादात झालंच मग.आदर्शवाद सांगणार्‍यांचं काही चुकीचं होतं असं मी म्हणणार नाही कारण आज ती काळाची गरज आहे. दोन सुशिक्षित साथीदार काम करून पोटापुरता पैसा मिळवू शकतात. उत्तम संसार करू शकतात. जगण्यासाठी काय लागतं? पोट चालवण्याइतका पैसा आणि एकमेकांवर प्रेम असलं की जगणं सुंदर होतं, संसार सुखाचा होतो.पण! हा आदर्शवाद मानणारे लोक खूप कमी आहेत असं आमचं मत होतं. स्ट्रगल करणार्‍याला आपली लेक द्यायला कुणीही तयार होत नाही. प्रत्येकाला आपला जावई लखपती, कोटय़धीश किंवा बडय़ा कंपनीत मोठय़ा पदावर असणारा पाहिजे असतो, कारण त्यांचं म्हणणं असतं, ‘आम्ही कमी पैशात दिवस काढलेत, माझ्या लेकीला ती झळ बसू नये.’ कोल्हापूर-सांगली पट्टय़ात तर वरच्या अटीसोबत 4-5 एकर शेतीपण लागते.एवढय़ावर चर्चा संपली. सगळे आपापल्या कामासाठी निघून गेले. पण विचारचक्र चालू होतं.विचार केला, आपला समाज बदल मान्य करत नाही; पण नाकातोंडाला आल्यावर हेच लोक प्रतिहुंडा देऊन कर्नाटकातून साथीदार आणतात. काय म्हणायचं याला?वास्तव! खूप वेगळं आहे.

-सूरज मडके

 

मध्यस्थ आवरा!

मी ग्रामीण भागात राहातो. आमच्याकडे समाजाचे तीन गट पडतात. रोजंदारी करणारा कामगार वर्ग, शेती आहे असा मध्यम वर्ग आणि तिसरा उच्चशिक्षित शहरी नोकरदार वर्ग. मुलींना शहरातला, नोकरी करणारा मुलगाच हवा असतो. अशी स्थळं मुलींच्या पालकांना पाहून देणारे अनेक मध्यस्थ असतात. ग्रामीण भागात लग्न जोडून देणारे असे मध्यस्थी अनेकदा त्या त्या  समाजातील लोक असतात. लग्नाळू मुलाला अडचणीत आणण्याचे काम मध्यस्थी लोक करतात. एखाद्या मुलाची आर्थिक बाजू मजबूत असल्यास त्या मुलाला आपल्याकडे आकर्षित करून त्याचं लग्न लावून देण्यासाठी हे पुढाकार घेतात. त्याचं त्यांना श्रेय मिळतं. ग्रामीण भागात ज्या मुलाकडे तीन ते चार एकर जमीन असेल तो खाऊन-पिऊन सुखी असेल तरी पण त्या मुलाला मुलगी देण्यास मुलीकडील मंडळी तयार नसतात. कारण असं की शेतकर्‍याची जरी मुलगी असली तरी ती शेतात काम करायला तयार नाही. कमी शेती असणार्‍या मुलांचे लग्न जुळणं तर कठीणच झालं आहे.अवघड आहे परिस्थिती.विद्याधर पुस्तोडे

वेल सेटल्ड नाही म्हणत मोडलं लग्न!

मी कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातला, लहानपणापासून भविष्य घडवण्याच्या नादात प्रेमात पडायला काही जमलं नाही. ते सगळं कधी नजरेपुढय़ातच आलं नाही. त्यामुळे लग्नाचं वय आल्यावर घरच्यांचं स्थळ शोधणं आलं. या महिन्यात रितसर बघण्याचा कार्यक्रम होऊन माझं लग्न ठरलं खूप स्वप्न बघायला लागलो होतो, रोज फोनवर बोलायचो, डिसेंबरची तारीख ठरली. हॉल बुक झाला, साखरपुडय़ाची तयारी झाली, थोडी खरेदी झाली. लग्न ठरलं मग तीन महिन्यांनंतर ती मुलगी म्हणते की, मला नाही हे लग्न करायचं कारण मला हवा तसा वेल सेटल्ड मुलगा तू नाहीस. माझी आर्थिक परिस्थिती म्हणाल तर वडिलोपार्जित एक घर, पुन्हा अजून एक घर मी घेतलंय, फक्त शिक्षण डिप्लोमा झालंय पण सध्या इंजीनिअर म्हणून नोकरीत आहे. महिन्याला 25 ते 30 हजार कमावतो. वडिलांची पेन्शन येते. तरीही त्या मुलीने दिलेली कारणे शॉकिंग होती, ती स्वतर्‍ 12 हजार कमवते तरीही तिला फक्त मुलाचा इनकम 40 हजार इन हॅण्ड हवा होता. इंजिनिअर मुलगा हवा. तिचं शिक्षण फक्त बी.कॉम. लग्न मोडलं. खूप मनस्ताप झाला, काय करणार?

  - वरु ण 

अपेक्षांना उत्तर काय?

मी एक शिक्षक आहे. वय 34. लग्नासाठी अनेक मुली पाहिल्या. अनेक ठिकाणी नाव नोंदवलं; पण काही उपयोग झाला नाही. मुलींच्या अपेक्षा खूप असतात. सरकारी नोकरी पाहिजे, चांगला स्वतर्‍चा प्लॅट पाहिजे. आई-वडील नको. मुलगी बारावी जरी शिकलेली असली तरी मुलगा उच्चशिक्षितच हवा म्हणते. आणि सरकारी नोकरी कुठून आणणार सगळी मुलं? पण कोण समजावणार? काय उत्तर देणार? मुलांच्या कर्तबगारीवर विश्वास ठेवा, एवढंच म्हणता येईल फार तर!  विशाल गेंगजे

उल्लेखनीय प्रतिसाद

‘न उडालेला बार’या लेखाला तरुण मुलींनीही भरभरून पत्रं पाठवली, या अंकात केवळ तरुण मुलांनी मांडलेली आपबिती मांडत आहोत. जागेअभावी सर्व पत्र समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. मात्र त्यातही सर्वेश बडगुजर, कृपेश भुतडा, सुनील सुरंगलीकर यांची पत्रं विशेष उल्लेखनीय होती.