आठवतात ते जुने दिवस.
तुमची पहिली ओळख.
त्या ओळखीतच
‘काहीतरी’ खास वाटणं.
हळूच थॅँक्यू म्हणणं.
हे सारं किती सुंदर,
किती अलवार होतं.
<<<<
आणि मग एक दिवस
आपण ‘तो’ हवाहवासा
मोबाइल नंबर मिळवला
किंवा आपण स्वत:हून
एक्सचेंज केला.
त्यानंतर आला कहानी में ट्विस्ट!
<<<<
ते नवेनवे दिवस.
ते तासंतास बोलणं,
सतत चॅट करणं.
रात्री झोपताना
डोक्यावर पांघरुण घेऊन
कुणाला ऐकूही जाणार नाही
इतक्या हळू आवाजात बोलणं.
बोलणंच कशाला,
मिस कॉल सुद्धा महत्त्वाचाच
सकाळी उठताक्षणी एक मिसकॉल
फोन कट केला,
समोर आईबाबा असतील
तर चोरून मिसकॉल,
कुठे पोहचलं की मिसकॉल
आठवण आली तरी मिसकॉल.
फोनवरच काय मिसकॉलवरही
बोलण्याचे फुलपाखरी दिवस
<<<<
पण मग अशा सुंदर
आयुष्यात कसा काय
जातो एकदम आपला
‘कॉल वेटिंग’वर.
पाच रिंग वाजल्या तरी
उचलला नाहीस म्हणून भांडण.
ना एसएमएसला उत्तर
ना मिसकॉलला रिप्लाय?
<<<<
हे असं ‘कॉल वेटिंग’वर
जात आपलं रिलेशन
कधी हॅँग झालं,
आठवतंय?
<<<<
आठवत असेल तर लिहा.
गंमत म्हणून,
आपलेच जुने दिवस
आठवायचे म्हणून
किंवा आपलं नेमकं काय चुकलं
हे गवसायचं म्हणून
किंवा पुन्हा जगायचा
तो आनंद म्हणून.
आपल्या मोबाइलमुळे
आपण किती जवळ आलो,
सदैव जवळ असतो
या भावनेचं सेलिब्रेशन म्हणून.
<<<<
एक मात्र नक्की,
सुरुवातीचं तासंतास बोलणं,
मग मोबाइल का उचलला नाही,
फोनच का केला नाही,
नॉट रिचेबलच का होतास,
कुणाशी बोलत होतीस.
या अशा भांडणांवर
पोहचतंच अनेकांचं.
आपण काहीतरी महत्त्वाच्या कामात
किंवा अगदी कुणाच्या
अंतिम संस्काराला गेलेलो
तेव्हा ‘मिस यू’चा
एसएमएस आल्यावर
तत्क्षणी काय रिअँक्ट करावं
हेच कळत नाही.
<<<<
हा मोबाइल नाही
आपल्या गळ्यात बांधलेला
कासरा आहे,
आणि त्यानं सगळा
रोमान्सच संपवला
असं अनेकांना वाटू लागतं.
<<<<
अशाच अवस्थेत जगताय
का तुम्ही?
मोबाइलने आपलं नातं
जमवलं, फुलवलं आणि बिघडवलं.
असं कधी कधी वाटतं तुम्हाला?
नेमकं काय केलं या मोबाइलनं तुमच्या नात्यात. जरा लिहाल.
स्पष्ट आणि अर्थातच मनमोकळं.
मी-यू अँण्ड मोबाइल.
नावाची ही तुमची गोष्ट सांगा.
त्या गोष्टीवर तुमचं नाव लिहा
किंवा नका लिहू.
पण सांगा दोघांच्या नात्यात
तिसरा मोबाईल आल्यानं नेमकं काय झालं.?
<<<<
पत्ता - शेवटच्या पानावर तळाशी
अंतिम मुदत -६ डिसेंबर २0१४
पाकिटावर-टी-व मोबाईल असा उल्लेख करायला विसरू नका.
--------------------------------------
- हर्षद देशपांडे, बदलापूर
----------------
.जमलं !
मला वाटायचं की, मी उत्तम मुलाखत देते. मुलाखतीत प्रत्येक प्रश्नाची छान उत्तरं देते, पण मी दिसायला चांगली नाही म्हणून माझं सिलेक्शन होत नाही. पण गेले काही महिने मी सतत ऋ1 कॉलम वाचतेय. त्यावरून माझ्या लक्षात आलं की, मी बोलते खूप पण चुकीचं किंवा चुकीच्या पद्धतीनं बोलते. नेमकं आणि तरीही कॉन्फिडण्ट कसं बोलायचं हे मी शिकले. गेल्याच आठवड्यात माझा एका बड्या कंपनीत इंण्टरव्ह्यू झाला आणि मला सेकंड राउण्डला बोलावलंय. जे जमत नव्हतं, ते तुमच्यामुळे जमलं. म्हणून हे शेअर करतेय.
- प्रांजली कुंभार, पुणे