ती म्हणजे.. असं म्हंटलं की तिची कितीतरी रुपं येतात समोर, कितीतरी आठवणी जाग्या होतात. तिचं नसणं जीव कातर करतो आणि असताना चिडणं काळजाला घरं पाडतं.. पण ती असतेच.. ‘तिचं’ आयुष्यातलं स्थान सांगायचं तर शब्द कमी पडतात आणि डोळ्यांत पाण्याचे झरे फुटतात.. हे सारं असतं, तेव्हाही ती असते, आणि ती नसते, तेव्हाही ती असतेच.. तिचं आपलं स्थान उलगडून सांगणाºया काही हळूवार, सुखद, तरल आणि सच्च्या भावना तरुण दोस्तांनी आॅक्सिजनसोबत वाटून घेतल्या.. ‘आॅक्सिजन’ने तरुण दोस्तांना सांगितलं होतं की, ती म्हणजे... हे वाक्य पूर्ण करा आणि शूट करून आम्हाला पाठवा.. व्हीडीओंचा अक्षरश: पूर आला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ते सारे व्हीडीओ पाहून आम्हीही सुखावलो..
कधी हसलो, कधी रडलो.. कधी तर रडता रडता हसलो.. त्या साऱ्या दोस्तांचे मनापासून धन्यवाद. आणि आता सरप्राइज..‘आॅक्सिजन’ने प्रॉमिस केल्याप्रमाणं हे घ्या सरप्राइज.. तुम्ही सगळ्यांनी पाठवलेल्या व्हिडीओंतून आम्ही व्हीडीओंचा एक हार गुंफलायत्यातून एक नवा व्हीडीओ साकारलाय.. ‘लोकमत’च्या वेबसाइटवर आणि फेसबुकवरही तुम्हाला हे दोन व्हीडीओ पाहता येतील..पाहा त्यात तुमचाही चेहरा दिसेल.. त्यासाठीच्या या दोन लिंक्स..
https://goo.gl/4hXo6u
- https://goo.gl/uV4p7r
- https://goo.gl/jHzhg1
https://goo.gl/ALzzZt
उल्लेखनीय प्रतिसाद.काही व्हीडीओ त्यातल्या तांत्रिक अडचणींमुळेसहभागी करून घेता आले नाहीत;मात्र या उपक्रमात सहभागी झालेल्यादोस्तांची ही नावं..राजेश पाटील (जळगाव), तुषार ढोले ( पिंपळगाव निपाणी, अहमदनगर), सुरेश हिरे (नाशिक), अमोल गोरे (नाशिक), राजेंद्र लोहारे (पैठण), पृथ्वीराज पाटील (सोलापूर), अमोल कोल्हे ( खाकुर्डी, जि. नाशिक), प्रशांत पाटील (चिंचोली, जि. जळगाव), काशीनाथ रेऊर, सॅम अत्राम (लोहारा, जि. यवतमाळ), प्रतीक चोरडिया (औरंगाबाद), अभिषेक दुरूगाले (कोल्हापूर), गोविंद कुलकर्णी (औरंगाबाद), दीपेश राजपूत (औरंगाबाद), प्रथमेश महाजन, सुधीर तिदार (नाशिक), मोरेश्वर चतूर (उमरडा, जि. यवतमाळ), प्रथमेश नवले, धीरज चामे (ताजबंद, जि. लातूर) किरण चव्हाण, मंगेश खोकले, अक्षय तावर (तरहाळा, जि. वाशिम), शुभम जाधव (वरणगाव), रणवीर पवार (अकोला), धीरज इंगळे (अकोला), रेणुकादास मुक्कावार (धर्माबाद, जि. नांदेड), आसिफ मणियार (अहमदपूर, जि. लातूर), आकाश मोरे (खापरवाडा, जि. अकोला), महेश मोरे (औरंगाबाद), विश्वजित घोडगे, कुणाल गोटेफोडे (लाखंदूर, जि. भंडारा), विकास पवार (दिंडोरी, जि. नाशिक), सुनील अवचर (मेडसिंगा, जि. उस्मानाबाद), अक्षय बर्वे (ओझर, जि. नाशिक), मनोज आहेर (बदलापूर), गंगाधर दळवी (दोनवाडा, बसमत, हिंगोली)