विश्वास चरणकर
जे स्वप्न 35 वर्षापूर्वीच विझून गेलं होतं,त्या स्वप्नावरची धूळ पुसण्याचं काम खेडय़ापाडय़ातल्या
जिद्दी-हट्टी मुली मोठय़ा हिमतीनं करताहेत. कोण त्या मुली? कुठलं स्वप्न छळतंय त्यांनाही?
---------------
गेली 35 वर्षापासूनचे एक स्वप्न घेऊन देश जगतोय.
इतक्या वर्षात कधीही भारतीय महिला हॉकी संघ ऑलिम्पिकर्पयत पोहचू शकला नाही.
आणि यंदा अचानक त्या दूर कुठंतरी गाडल्या गेलेल्या स्वप्नाला संजीवनी मिळावी तसं ते स्वप्न मातीतूनच तरारून वर आलं.
आणि सगळ्या हॉकी जगतालाच आशा वाटू लागली की,
होऊ शकतं असं? भारतीय महिला हॉकी संघ पुन्हा ऑलिम्पिकचे सामने खेळताना दिसू शकेल? तशी आशा तरी आता निर्माण झाली आहे. भारतीय महिला संघ ऑलिम्पिक क्वालिफाय करण्याच्या उंबरठय़ावर उभा आहे.
आणि हे स्वप्न पाहण्याची हिंमत दाखवणारी टीम आणि तिची कॅप्टन, यांच्या हिमतीची आणि जिगरबाज लढाऊ वृत्तीची ओळख करून घेणंही गरजेचं आहे.
महिला हॉकी संघाची कॅप्टन आहे, रितू राणी. आज या राणीच्या कप्तानीतच जेमतेम वयाच्या विशीत असलेल्या तरुणी एक नवंच स्वप्न डोळ्यात घेऊन निघाल्या आहेत.
एक असं स्वप्न, जे 35 वर्षापूर्वीच विझून गेलं होतं. शेवटचं म्हणजे 1980 साली भारतीय महिला संघ रशियात झालेल्या ऑलिम्पिकमध्ये खेळला होता. त्यानंतर आजवर भारताला ऑलिम्पिक पात्रता मिळविता आलेली नाही. भारतीय महिला संघ ऑलिम्पिकमध्ये पुन्हा कधी खेळणार, असा एकच प्रश्न सतावत होता. पण रितू राणीच्या नेतृत्वाखाली हे स्वप्न यंदा साकारताना दिसतंय. नुकत्याच बेल्जीयममध्ये झालेल्या विश्व हॉकी लीग सेमीफायनलमध्ये भारताने जपानला हरवून पाचवे स्थान मिळविले. या विजयामुळे ही टीम 2016 च्या रिओ ऑलिम्पिकच्या दरवाजावर पोहचला आहे. 198क् साली या संघातली एकही मुलगी जन्मालाही आलेली नव्हती. सा:याजणी नव्वदनंतर जन्मलेल्या, अवघ्या विशीतल्या. त्यातल्या अनेकींनी तर वयाच्या दहाव्या वर्षापासून हॉकी खेळायला सुरुवात केली आहे. आणि जे स्वपA अनेक पिढय़ा विसरून गेल्या होत्या त्या स्वप्नावरची धूळ पुसण्याचं काम तरी या मुलींनी केलं आहे.
या अचाट कामगिरीचं श्रेय आहे संघाची कर्णधार रितू राणी हिचं आणि अर्थातच संघात लढणा:या खेडय़ापाडय़ातल्या हिमतीच्या तरुण मुलींचं.
हरयाणात शाहबाद नावाचं एक गाव आहे. हे गाव म्हणजे हॉकीपटूंचं उगमस्थान. आपल्याकडं बाळ जन्माला आलं की त्याच्या पाचव्या दिवशी पूजा करतात. याच दिवशी सटवाई त्या बालकाचं भविष्य लिहिते असे मानतात. या पूजेत वही-पेन अगदी हमखास ठेवतात. पण या शाहबादमध्ये हॉकी स्टीक ठेवून पूजा केली जात असेल, इतकी हॉकी इथल्या मुलामुलींच्या नसानसांतून खेळते आहे. त्यात शाहबादच्या फॅक्टरीतून आलेल्या बहुसंख्य मुली या हॉकी संघात खेळतात. कामगार कष्टकरी वर्गातून आलेल्या या मुली, एका खेळाच्या जोरावर त्या स्वत:सह भारतीय हॉकीचं भवितव्य घडवण्याचा प्रय} करत आहेत.
कॅप्टन रितू म्हणते, ‘‘जपानविरुद्धचा सामना आमच्यासाठी लास्ट चान्स होता हे आम्हाला माहीत होते. आम्ही जीवतोड मेहनत केली. आम्ही जपानला हरवलं आणि पाचवं स्थान मिळवलं. हा विजय आम्हाला ऑलिम्पिकचे तिकीट मिळवून देऊ शकतो ही भावना आनंददायी होती. बेल्जीयम ते हरयाणा व्हाया दिल्ली असा या जल्लोषाचा मार्ग होता. अजून बरंच काही बाकी आहे, ही सुरुवात आहे हे मात्र आम्हाला पक्कं माहिती आहे!’’
खरंच ही जर सुरुवात असेल, तर नव्या आशेनं पाहायला हवं या सुरुवातीकडे !