रविजा सिंगल
मी नॅशनल स्विमर होतेच. तसं ट्रेन केलं होतं स्वतर्ला. भरपूर एफर्ट्स करत होते. पण मनासारखे रिझल्ट मिळत नव्हते. मला वाटतं होतं की, पुढं काही घडत नाहीये. सॅच्युरेशन आलं आहे. त्याचवेळी मनानं उचल खाल्ली होती की, काहीतरी वेगळं करावं. असं काहीतरी करावं जे आपल्याला चॅलेजिंग वाटेल. तसं काय करायचं याचा विचार करत असताना ट्रायथलॉनचा पर्याय समोर आला. पण मला तरी ते अशक्यच वाटत होतं. मी नियमित पोहण्याचा सराव करत असले तरी मी सायकलिंग आणि रनिंग असं क्रीडा प्रकार म्हणून कधीही केलं नव्हतं. माझे जीम ट्रेनर मुस्तफा टोपीवाला सर म्हणत होते की, हे कर, जमेल तुला. त्याचवेळी आम्हाला कळलं होतं की, मी आयर्न मॅन स्पर्धेत भाग घेऊन ती यशस्वी पूर्ण केली तर मी आशियातली सगळ्या ‘यंगेस्ट’, सगळ्यात तरुण फिनिशर असेल. आजवर माझ्या वयाच्या कुणीच मुलीनं हे केलेलं नाही. म्हणजे आता माझ्यासमोर आव्हान दुहेरी झालं होतं. मग ठरवलं, आता तर करूच या!अर्थात ठरवणं आणि करणं यात फरक असतोच. हे ट्रायथलॉन प्रकरण सोपं नसतंच. मात्र माझ्या घरातच माझ्यासमोर ती स्पर्धा पूर्ण करण्याचं आदर्श उदाहरण होतं. माझ्या वडिलांनी ती स्पर्धा पूर्ण केली होती. त्यांचा सराव मला प्रेरणा देत होताच. आजूबाजूचं वातावरणही पोषक होतं. मात्र हे ट्रेनिंगच पूर्ण वेगळं होतं. जरी आपण हे चॅलेंज घ्यायचं असं मी ठरवलेलं असलं तरीही ते एका रात्रीत घडलं नाही. ते घडत गेलं. इन द फ्लो, इट स्टार्टेट हॅपनिंग! कुठलाही खेळ आपण खेळू लागतो, तेव्हा सुरुवातीला त्यात वेदनाच असतात. शरीर अॅडजस्ट होत नाही तोर्पयत वेदना होतात. तेव्हाही झाल्याच. काय करावं, कसं करावं कळत नव्हतं. कधी कधी वाटायचं ‘मै क्यूं करू?’ 19 वर्षाचे आहोत आपण फक्त, कशाला करायचं हे? माझ्या वयाचे बाकीचे मुलंमुली तर नाही करत, मग मीच कशाला करू, सोडून दिलं तर?पण सोडण्याचा तर प्रश्नच नव्हता. कारण हे आव्हान मीच माझ्यासाठी निवडलं होतं. कुठलाच खेळाडू असा खेळ सोडून माघार घेत नसतो. पण तरी काही क्षण एकटेपणाचे यायचे. भयंकर मानसिक थकवा आल्यासारखं व्हायचं. पण त्यावेळी सोबत प्रोत्साहन देणारी माणसं होती. माझे मित्रमैत्रिणी होते, ते म्हणत, ‘रविजा, इट्स ओके, यू आर ऑन सच अ गुड लेव्हल !’ हे असं इतरांनी सांगणं की, रविजा होईल, जमेल तुला, जमतंय! हेसुद्धा फार महत्त्वाचं होतं.माझ्या वडिलांनी आयर्नमॅन स्पर्धा फ्रान्समध्ये जिंकली. ऑगस्टमधली ही गोष्ट. तेव्हा मीही त्या स्पर्धेत भाग घेतला होता. पण केवळ 5 मिनिटांसाठी माझं जेतेपद हुकलं. आपण ते पूर्ण करू शकलो नाही हे मनाला खटकत होतं. एवढे प्रय} पाण्यात गेले हे काही मन मानायला तयार नव्हतं. मी परत आले आणि स्वतर्शीच ठरवलं की, रविजा, गिव्ह इट अ वन मोअर चान्स. मी स्वतर्लाच एक हलकं ‘पुश’ केलं. त्यादिवशी चान्स गेला आपला; पण आपण फिजिकली वेल ट्रेण्ड आहोत. मग ठरवलं, पुन्हा भाग घ्यायचा.ट्रेनिंग जोरात सुरू झालं. आधी आव्हान दुहेरी होतं, आता तर प्रेशरही दुहेरी झालं. एकदा नाही झालं, यावेळी तरी पूर्णच व्हायला हवं हे मनात होतं. माझ्या पपांनी केलंय, म्हणजे ते करता येऊ शकतं हेही मनात होतं. पण ते सारं बाजूला ठेवून मी फक्त माझ्या गेमवर फोकस करत राहिले.स्वतर्शी बोलत होते. डिसकनेक्ट करून टाकलं स्वतर्ला सगळ्यापासून. फक्त स्वतर्वर लक्ष केंद्रित करत होते. स्पर्धेच्या आधी तर माझा फोनही मी देऊन टाकला होता. मला कुणाशीच बोलायचं नव्हतं, मला एकच माहिती होतं, मला हातात तिरंगा घेऊन ती फिनिश लाइन वेळेत क्रॉस करायची आहे. आणि मी करेनच!
अर्थात ऑस्ट्रेलियातली ही स्पर्धा सोपी नव्हती. पाणी खारं होतं. ते पोहताना तोंडात गेलं की ढवळायचं. सायकलिंग करायचं तर वारा उलटय़ा दिशेनं वाहत होता; पण तरी माझी मेण्टल स्ट्रेंथ उत्तम होती, मी ठरवलं होतं, यावेळी करायचंच.आणि मी केलंही !त्याक्षणी मी जे रडलेय. ते आनंदाचे, पूर्ण समाधानाचे अश्रू मी आयुष्यात पहिल्यांदा अनुभवले. दिवसाला पाच दिवस पहाटे 3 वाजता उठून पळायला जात होते, ट्रेनिंग करत होते. बारा-बारा तास ट्रेनिंग करत होते. ते सारे शारीरिक, मानसिक श्रम आता निवले होते. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे माझ्या पप्पांची शाबासकी. त्यांनी स्वतर् ती स्पर्धा पूर्ण केली आहे, त्यामुळे माझा आनंद ते जाणून होते. ते जेव्हा म्हणाले, ‘बेटा अच्छा किया !’ तो क्षण अत्युच्च आनंदाचा होता. माझ्या घरच्यांना, माझ्या आईबाबांना माझा अभिमान वाटला ते फार मोलाचं आहे..जिंकणं म्हणजे काय हे अनुभवून आता पुढचा प्रवास सुरू झाला आहे.