शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

#metoo- बाय बाय करता येईल नोकरीला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 5:35 PM

घरी आई आजारी, भाऊ शिकतोय. करिअर समोर उभं आहे, आणि बॉस म्हणतो, घरी ये! काय करेल ती? - तेच जे तिनं आणि तिच्यासारख्या अनेकींनी करायला हवं!

ठळक मुद्देतिला ऑफिसच्या दरवाज्यावर कोरलेलं ‘पुश द डोअर’ आकर्षित करत नव्हतं. कारण तिने त्याला बाय बाय केलं पुन्हा कधीही तिथे पाऊल न ठेवण्यासाठी! 

- श्रुती मधुदीप 

ती सध्या फारच धावपळीत होती. आईचं आजारपण, ऑफिसमधली कामाची वर्दळ, त्यात ती ज्या चॅनलसोबत काम करत होती त्याचा नवा इव्हेण्ट सुरू होत होता. त्यामुळे क्षणोक्षणी प्रपोजल्स तयार करणं, ते बॉसकडून अप्रुव्ह करून घेणं. घरी आली तरी आईची काळजी, तिला काय हवं नको ते पाहणं, त्यातही ऑफिसमधून या ना त्या कामासाठी फोन-मेसेजेस. तसा तिचा भाऊ होता घरी आईची काळजी घ्यायला; पण नाही म्हटलं तरी तो तिच्यापेक्षा चार-पाच वर्षानी लहान. नुकताच ग्रॅज्युएशनला आलेला. वडील लहानपणीच एका अपघातात गेलेले. तिने अगदी शून्यातून सगळं उभं केलेलं. तसा मामा होता सोबतीला! पण सारं घर मात्न तिच्या जॉबवर विसंबून. सध्याचे दिवस फारच दगदगीचे होते; पण या दगदगीतून आलेल्या घामाला वार्‍याची झुळुकदेखील मिळते, असा अनुभव होता तिचा. त्या विश्वासानेच ती एकदम हसतमुख जगायची!          आज ती सगळं आवरून- स्वयंपाक बनवून आईला ‘येते गं’ असं म्हणून बाहेर पडली. चप्पल घालताना तिला काय जाणवलं माहीत नाही चप्पल काढून ती पुन्हा घरात आली. बेडवर पडलेल्या आईजवळ जाऊन म्हणाली, ‘‘आई गं! काळजी घे हं. मी येतेच संध्याकाळी. तोवर बरी हो हं. बास झालं आता हे आजारपण’’ आईच्या चेहर्‍यावर थकलेलं हसू उमटलं. तिने आईच्या केसातून हात फिरवला आणि ती ऑफिसमध्ये गेली. गेल्या गेल्या गीताने तिला सांगितलं की सरांनी तिला त्यांच्या केबिनमध्ये अमुक एक फाइल घेऊन बोलावलंय. तिने आपल्या डेस्कवरची फाइल उचलली. आणि ती बॉसच्या केबिनच्या दाराशी उभी राहिली. ती ते दार उघडणार इतक्यात तिच्या मनावर प्रचंड दडपण आलं. तिला परवाचंच व्हॉट्सअ‍ॅप चॅट आठवलं. 

Boss : Hey She : yes Sir Boss : your dp is so beautiful She : thank you Sir Boss : One thing I must tell you… She : what Sir ?Boss : you are more than beautiful ! I mean one can not breathe after watching your dpआणि ती ऑफलाइन गेली. आपला बॉस असं बोलू लागतो तेव्हा काय करायचं, कसं उत्तर द्यायचं तिला कळलं नव्हतं. ‘थॅँक्यू’ म्हणावं तरी प्रॉब्लेम, स्माइली पाठवावी तरी पंचाईत! त्या मेसेजनंतर त्या दोघात काहीच मेसेजिंग झालं नव्हतं.      आणि आता ती बॉसच्या केबिनच्या दारावर उभी होती. समोरच्या अर्धवट पारदर्शक दरवाज्याने तिला सूचना दिली होती ‘पुश द डोअर!’ तिने त्याकडे नीरव नजरेने पाहिलं आणि दरवाजा आत ढकलला. ‘मे आय कम इन सर’- ती ‘‘ ओह’’ बॉस तिच्याकडे निव्वळ पाहत राहिला काही क्षण! तिच्या केसापासून पायाच्या नखार्पयत त्याचं तिला स्कॅन करून झालं. ‘सर’ ती अवघडून दरवाजातूनच बोलली. ‘‘अं हो ये ना. ये ये. बस’’ ‘सर ही फाइल. परांजपे येऊन भेटून गेले काल. त्यांनी काही बुलेट पॉइण्ट्स दिले होते आपल्या या नव्या इव्हेण्टविषयी. तेही इंक्लूड केले आहेत फाइलमध्ये. तुम्ही एकदा बघून घेतलेत ते तर बरं होईल.’ ती कामाविषयी बोलू लागली. ‘येस शुअर. तुला त्या मुद्दय़ांविषयी काही हरकत आहे का ?’ ‘अं. नाही सर. आय थिंक द पॉइण्ट्स आर वॅलिड’‘मग काही हरकत नाही. चालू कर पुढे काम’‘नाही पण सर तुमच्या नजरेखालून एकदा गेलं तर.’‘अगं’ बॉस तिला तोडत म्हणाले ‘तुझ्यावर विश्वास आहे माझा’’ तिला यावर काय बोलावं ते कळेना. फक्त सहा महिन्यांच्या जॉइनिंगवर हा माणूस इतक्या मोठय़ा इव्हेण्टच्या प्लॅनिंगमध्ये माझ्यावर विश्वास ठेवतो. काहीतरी विचित्नच वाटलं तिला. ‘ठीक आहे सर.’ असं म्हणून ती फाइल हातात घेऊन निघणार इतक्यात बॉसने ठरवून तिच्या हातावर हात ठेवला. तिने त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला. ‘ओह सॉरी’ बॉस म्हणाले. ती निघणार इतक्यात बॉसने तिला थांबवलं.‘‘अं  मनाली!’ तिने मागे वळून पाहिलं. ‘येस सर’‘यू आर सच अ ब्रिलियण्ट कलिग! तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे.’‘काय सर?’ तिने धपापत्या छातीने विचारलं. ‘विल यू कम फॉर कॉफी टूनाइट ? घरीच ये.’ ‘सर पण गुड न्यूज कुठली?’ ‘ये ना घरी आज तिथेच सांगीन.’तिला काय बोलावं ते कळेना. ‘सर माझी आई आजारी आहे.’ - ती म्हणाली. ‘ओह! एक्चुअली आय वॉण्ट टू गिव्ह यू प्रमोशन विल यू कम टू माय प्लेस ?’ काही क्षण ती त्यांच्याकडे निर्‍स्तब्ध होऊन पाहत राहिली. बॉसही अपेक्षित असलेल्या रिस्पॉन्सची वाट पाहत राहिला. तिच्या डोळ्यात पाणी दाटलं पण तिने ते ढळू दिलं नाही. तिच्या हातातली फाइल तिने क्षणात बॉसच्या टेबलवर ठेवली. आता  केबिनच्या दरवाजा काय सूचना देतो याचा विचार तिने केला नाही. ती बाहेर गेली. स्वतर्‍च्या डेस्कवरच्या तिच्या गोष्टी तिने घेतल्या. इतक्यात गीता अभिमानाने येऊन म्हणाली,‘मनाली, अगं तुला सांगायचं राहिलं, मला प्रमोशन मिळालं!’तिने गीताशी एक अर्थपूर्ण नजरानजर केली तरीही गीताच्या चेहर्‍यावरलं अभिमान किंचितही कमी झाला नाही. मनाली बाहेर पडली.स्फुंदून स्फुंदून ती रडू लागली. इतक्या वर्षाच्या आपल्या लाडक्या गीतासारख्या  मैत्निणीलाही असं होताना पाहणं हे तिला वेदना देणारं होतं. गीतू! तू घेऊ नकोस ते प्रमोशन ! प्लीज! ही स्पर्धा आपल्या दोघीतली नाही गं. तू नाहीस जिंकलीस तुला प्रमोशन मिळालं म्हणजे. आपण सगळ्याच जणी हरतोय. तुझ्या लक्षात येतंय का? हा सामना आहे आपला स्वतर्‍शीचा! हा सामना आहे आपलं असणं फक्त शरीरार्पयत मर्यादित करू पाहणार्‍या त्या बॉसशी, त्याच्या त्या नजरेशी आणि त्याच्यासारख्या अनेक नजरांशी! तुला कळतंय का? ती हमसून हमसून रडली; पण आता तिच्या घरातले किती तरी प्रश्न तिच्यासमोर आ वासून उभे होते. तरीही तिला ऑफिसच्या दरवाज्यावर कोरलेलं ‘पुश द डोअर’ आकर्षित करत नव्हतं. कारण तिने त्याला बाय बाय केलं पुन्हा कधीही तिथे पाऊल न ठेवण्यासाठी!