शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

मायक्रोग्रीन्स- पोषण  आहाराचा  हा नवा ट्रेण्ड नेमका काय आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 6:43 PM

खाण्यापिण्याचेही नवनवे ट्रेण्ड येतात. सध्या लॉकडाउनमध्ये चर्चा आहे ती पोषण आणि प्रतिकारशक्तीची. त्यावर अनेकजण मायक्रोग्रीन्स नावाचा एक नवा ट्रेण्ड रुजवत आहेत. त्याविषयी..

ठळक मुद्दे कुठलं धान्य पचतंय, कशाचा त्नास होतोय याकडे लक्ष ठेवा. मायक्रोग्रीन्समध्ये तुमची गरज आणि पोषण याचा डाएट प्लॅन यासाठी वैद्यकीय सल्ला घेणं आणि तज्ज्ञांची मदत घेणं उत्तम. ते विसरूनका.

- गौरी पटवर्धन

सगळ्या जगातली तरुण मुलं ज्या गोष्टीचा सगळ्यात जास्त विचार करतात त्या विषयांची यादी काढली तर त्यात काय सापडेल?तर सगळ्यात आधी आपला क्र श असलेला मुलगा/मुलगी !पण मुलांना हे माहिती असतं की नुसता विचार करून काही होत नाही. क्रशच आपल्याकडे लक्ष जावं यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. त्यातला पहिला प्रयत्न अर्थातच असतो तो फॅशन करण्याचा. मग पुढचा शोध लागतो तो असा की आपल्याला कुठलीही फॅशन चांगली दिसण्यासाठी आपली फिगर/बिल्ट चांगला पाहिजे. मग शोध सुरू होतो तो व्यायाम आणि डाएटचा!अर्थातच या दोन्ही गोष्टी एका रात्नीत जमत नाहीत. शिवाय त्यात नवनवीन रिसर्च आणि ट्रेण्ड्स येत असतात.त्यामुळे एक वेळ अशी येते की, आपलं डाएट सध्याच्या ट्रेण्डला अनुसरून असणं हेच एक स्टाइल स्टेटमेंट होऊन बसतं. त्यातले सगळे प्रकार ट्राय करता करता प्रत्येकाला/प्रत्येकीला तिच्या प्रकृतीला आणि सवयीला मानवणारं डाएट सापडतं. मग काही जण दिवसातून सहा वेळा खातात तर काही जण टू मील डाएट करतात. काही जण साखर सोडतात तर काही जण खूप प्रोटिन्स खातात.पण यापैकी कुठलंही डाएट तुम्ही फॉलो केलंत तरी त्यात वर्षानुवर्ष आणि  पिढय़ानुपिढय़ा न बदललेला एक सल्ला असतो, तो म्हणजे शक्य तेवढं कच्चं खा. दिवसातून दोनदा खा नाही तर आठ वेळा खा; पण कच्चं खाण्यावर भर द्या हे आहारतज्ज्ञ कायमच सांगत आले आहेत.त्यातही नुसत्या भिजवलेल्या कडधान्यापेक्षा मोड आलेली कडधान्य जास्त पौष्टिक असतात हेही एक अनेक र्वष टिकून असलेलं डाएट सत्य. यातच आता भर पडली आहे ती नवीन परवलीचा शब्दाची- मायक्र ोग्रीन्स!सध्या सगळीकडे या मायक्रोग्रीन्सबद्दल लोक फार कौतुकाने बोलतायत. त्याचा अनेकांना फायदाही होतोय. मग आपणही ते ट्राय करून बघायला काय हरकत आहे?पण ट्राय करून बघायला ही मायक्रोग्रीन्स असतात तरी काय? तर नुकतेच भुईतून वर आलेले अंकुर असतात त्यांना मायक्र ोग्रीन्स म्हणतात. म्हणजे मोड आलेल्या धान्याच्या पुढची आणि अगदी छोटय़ा रोपच्याही अलीकडची अवस्था म्हणजे मायक्र ोग्रीन्स.त्याहून नेमकं सांगायचं, तर कुठल्याही रुजलेल्या बीला जी पहिली दोन पानं येतात ती आणि त्यानंतरची जास्तीत जास्त अजून दोन पानं आलेल्या अवस्थेतला जो कोंब असतो, तो मायक्र ोग्रीन. या मायक्रोग्रीन्समध्ये पूर्ण वाढ झालेल्या धान्यापेक्षा अधिक पोषणमूल्य असू शकतात असा लेटेस्ट रिसर्च म्हणतोय. त्यामुळे कुठल्याही सॅलड्समध्ये किंवा कोशिंबिरीमध्ये मोड आलेल्या कडधान्यांऐवजी ही मायक्रोग्रीन्स वापरावीत, असा ट्रेंड सध्या जोर पकडतो आहे.पण ही मायक्रोग्रीन्स मिळतात कुठे? तर मोठय़ा हायफाय भाजीवाल्यांकडे मिळतात. आणि मग अर्थातच ती मोठय़ा आणि हायफाय भाजीवाल्यांच्या रेटला मिळतात. मग ती आपल्याला कशी परवडणार? बरं, त्यांच्यातली पोषणमूल्य पाहिजे असतील तर ही मायक्र ॉग्रीन्स रोज खायला पाहिजेत. मग ती आपल्याला परवडणार कशी? (आधीच कोरोना मंदीच्या कृपेने अनेकांचा खिसा गरीब झालेला नाही.)तर त्याचं सगळ्यात सोपं उत्तर असं की ती आपली आपण उगवायची. त्यासाठी लागतं काय? तर दोन इंच खोल असलेले काही ट्रे, माती, बियाणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लॅनिंग, सातत्य आणि चिकाटी.कारण बहुतेक सगळी मायक्रोग्रीन्स पेरल्यापासून आठ ते पंधरा दिवसात खाण्यायोग्य होतात. त्यामुळे आपल्याला रोज लागणारी मायक्रोग्रीन्स काढायची आणि त्याजागी पुढचं बियाणं पेरायचं. अशी सायकल आपण जर का मेंटेन करू शकलो, तर आपल्याला घरच्या घरी ऑलमोस्ट फुकटात अत्यंत पौष्टिक मायक्र ोग्रीन्स रोज खायला मिळू शकतात. आपण इतके फॅशनचे ट्रेण्ड्स फॉलो करतो, कधीतरी हा हेल्दी लाइफस्टाइलचा ट्रेण्डसुद्धा फॉलो करायला हरकत नाही. मात्र त्यासाठी सातत्य नावाची गोष्ट लागते. ते ही यानिमित्तानं शिकता आलं तर बरंच होईल.

मायक्रोग्रीन्स कुठल्या धान्यांचे असतात?

* मायक्रोग्रीन्स सर्व एकदल आणि द्विदल धान्यांचे असू शकतात. * म्हणजे अगदी गहू, तांदूळ, मका, हळीव इथपासून ते मूग, हरभरा, मटकी, चवळी इथपर्यंत कुठल्याही धान्याची मायक्रोग्रीन्स उगवता आणि खाता येतात.* प्रत्येक धान्याच्या मायक्रोग्रीन्सच्या वाढीचा काळ आणि  पोषणमूल्य वेगळं असतं. त्याची संपूर्ण माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहेच. ती वाचून आपल्याला कुठली मायक्रोग्रीन्स पाहिजे आहेत त्याचा विचार करता येईल. त्याआधी कुणी शेतीतज्ज्ञ आणि आपल्या जवळचे डॉक्टर, आहार तज्ज्ञ यांचाही सल्ला घेऊनच काहीही प्रयोग करणं उत्तम.* प्रत्येक मायक्रोग्रीनची वाढीची गरज वेगवेगळी असते. उदा. मका अंधारात वाढवला तर त्याची मायक्र ोग्रीन्स सौम्य गोडसर चवीची येतात, याउलट जास्त प्रकाशात यांची चव कडवट होऊ शकते. * प्रत्येक बी किती खोलवर लावायचं, त्याला किती आणि कधी पाणी घालायचं याची माहिती करून घ्या.* तुम्ही वेगवेगळ्या दिवसांसाठी वेगवेगळी धान्य पेरू शकता. त्यामुळे तुम्हाला विविध प्रकारचं पोषण मिळेल.* हे काम अगदी रोज केलं तरी रोज पंधरा ते वीस मिनिटं त्यासाठी द्यावी लागतात. स्वत:च्या आरोग्यासाठी तेवढा वेळ इन्व्हेस्ट करून बघा. * शिवाय हाताला माती लागल्यामुळे मिळणारी मानसिक शांतता त्यातून मिळते हा अजून एक फायदा आहेच.* मात्न हा प्रयोग करताना एका गोष्टीची काळजी घ्या. पोट सांभाळा. सर्व प्रकारचं अन्न सगळ्यांना पचत नाही. त्यामुळे एकदम जेवणाच्या ऐवजी बकरीसारखी मायक्रोग्रीन्स खायची असले उद्योग करू नका. सुरु वातीला थोडं खा. * कुठलं धान्य पचतंय, कशाचा त्नास होतोय याकडे लक्ष ठेवा. मायक्रोग्रीन्समध्ये तुमची गरज आणि पोषण याचा डाएट प्लॅन यासाठी वैद्यकीय सल्ला घेणं आणि तज्ज्ञांची मदत घेणं उत्तम. ते विसरूनका.

(गौरी मुक्त पत्रकार आहे.)