शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

‘लास्ट सीन’च्या गैरसमजाचे पतंग

By admin | Published: March 23, 2017 8:44 AM

आपण कुणाला तरी मेसेज करतो,त्यानंतर शंभरदा ती व्यक्ती आॅनलाइन येते-जाते. पण आपला मेसेज वाचतच नाही.कधी मेसेज वाचल्याचे निळे टिकमार्क दिसतात,पण रिप्लाय येत नाही.संताप होतो मग आपला.वाटतं, समजतात काय स्वत:ला आम्ही काय कुणी ऐरेगैरे आहोत का?

 

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर आपला कुणाला मेसेज गेला की त्यानं तो बघितला की नाही आपल्याला लगेच कळतं. फेसबुकवर सीन आणि वेळ कळते, तर व्हॉट्सअ‍ॅपवर दोन निळे टिकमार्क येतात. समोरची व्यक्ती केव्हा-केव्हा आॅनलाइन होती हेही वेळोवेळी कळत राहतं. अगदी सहज समजतं ते. त्यासाठी कॉम्प्युटरतज्ज्ञ असायची गरज नाही की अगदीच कुणी कुणावर लक्ष ठेवून बसलं आहे असंही वाटून घ्यायची गरज नाही. तंत्रानं एक सुविधा पुरवली आणि आपल्याला त्यातून काही अंदाज येतात, म्हणून आपण ती सुविधा वापरतो, इतकंच!

पण आपण कोणीतरी ग्रेट कायमच असतो, नाही का?म्हणजे आपल्याला वाटतं तरी तसं!त्यात आपला मेसेज कुणी वाचला, वाचला की नाही, कधी वाचला, आपल्याला ब्लॉक केलं का, मेसेजचं उत्तर किती वेळाने दिलं, कसं दिलं, हे सगळे हिशेब सुरू होतात. आपल्याला उत्तर द्यायच्या आत कितीवेळा ती व्यक्ती ‘लास्ट सीन’मध्ये येऊन गेली आणि किती वेळानं तिनं आपल्याला उत्तर पाठवलं याचे अंदाज आपण बांधतो. दरम्यान ती व्यक्ती खरंच काही कामात होती की आपल्याला उत्तर द्यायचं नाही म्हणून तिनं असं केलं हे आपल्याला समजलंच पाहिजे असा हट्ट मनात सुरू होतो. आपल्याला समोरची व्यक्ती किती ‘भाव’ देतेय, म्हणजे कितीवेळात आपल्या मेसेजला रिप्लाय करतेय यावरून आपण ते नातं कसं आणि कितपत जवळ करायचं याचे आडाखे बांधत बसतो. कधी सहजच फोन करून बघतो. उचलला जातो का? की टाळला जातो? टाळला गेला तर का? वेगवेगळ्या वेळांनाही फोन करून बघतो.त्या व्यक्तीनं आपला मेसेज उघडून बघितला आणि तरीही आपल्याला उत्तर नाही म्हणजे किती ते दुर्लक्ष केले आपल्याकडे असं वाटतं. मग त्यात आपलं आणि त्या व्यक्तीचं नातं नेमकं कसं आहे तेही बघावं लागतं. समोरची व्यक्ती जुजबी ओळखीची आहे की आॅफिशिअल कामापुरती फॉर्मल ओळख आहे? प्रत्यक्ष नात्यात वगैरे आहे की प्रत्यक्ष बघितलेलं आहे? अनेक वर्षांची तोंडओळख आहे की घनिष्ठ मैत्री आहे? प्रेमात पडून आपण तिच्या मागे लागलो आहोत की केवळ व्हर्च्युअल मैत्री आहे? असं सगळं.आजकाल सगळे सांगतात, ‘मनातलं बोला, मोकळे व्हा’. पण कोणाशी बोला ते सुचत नसत. जवळचे लोक काही ना काही अर्थ काढतील म्हणून त्यांच्याशी बोलणं आपण टाळतो. त्याच दरम्यान आपण ‘कोणीतरी, कुठेतरी भेटेलच जे आपल्याला समजून घेईल’, अशी स्वप्नंही पाहत असतो. मग फेसबुकवर कोणी बरं व्यक्त होणारं सापडलं तर त्याच्या मागे लागतो. आपलं आयुष्य त्यानं ऐकून घेतलंच पाहिजे यासाठी मेसेजवर मेसेज करत राहतो. ‘माझ्याशी मैत्री करशील का?’ची अगतिकता मग हट्टात पेटते. कोणी नाही म्हणालं, आपल्याला टाळलं की लगेच इगो दुखावला गेलाच. आपल्याला ‘नाही’ म्हणते/ किंवा म्हणतो?- म्हणजे काय! इतरांशी बरं ठीक बोलते, अशी तुलनाही सुरू होते. पण प्रत्येक दोन व्यक्तींमध्ये कसं नातं असतं ते त्यांनाच नीट माहीत असतं. त्यांचा काही एक कम्फर्ट झोन असतो. आपणदेखील लगेच त्या प्रकारच्या कम्फर्ट झोनमध्ये समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात दाखल झालंच पाहिजे, असं आपल्याला वाटत राहतं. पण आज ओळख झाली, उद्या घट्ट मैत्री झाली, असं नसतं ना पण! मग माध्यम कोणतंही असू द्या. तरीही कोणी आपल्याला टाळलं तर लगेच आपण सुनावतो, ‘मी कोणी ऐरागैरा नाही. मीपण तमुक आहे. तुम्हीच कोणी महान नाही’.खरं तर या तुलना, असूया, इगो दुखावणं या ट्रॅकवर इतकी पटकन तुमची व्हर्च्युअल मैत्री जात असेल तर मैत्रीत रेड सिग्नल पाडायला हवा. सावध व्हायला हवं. सगळेच काही मैत्री शोधत फिरत नसतात हे समजून घ्यायला हवं. अगदी ओळखीत देखील आपला मेसेज गेला आणि समोरून उत्तर नाही आलं तर आपण अनेक शक्यता लढवत बसतो. मेसेज जाणं आणि त्याला उत्तर येणं म्हणजे आपल्यासाठी सगळं जग होऊन जाते. फेसबुक वगैरे वरून मैत्री शोधणं हे आयुष्याचे इतिकर्तव्य असल्यासारखे आपण मेसेज पाठवत सुटलो आहोत का? हे तपासणार की नाही? नसेल कोणाला आवडत नुसते हाय आणि गुडमॉर्निंग, वेगवेगळ्या सणांचे शुभेच्छापत्र. काही ना काही निमित्त करून कशाला तडमडायचे दुसऱ्यांच्या इनबॉक्सला? मैत्री करायची आहे ना, मग ती अशी फास्ट ट्रॅकवर टाकाल तर रुळावरून घसरणार असं समजा. वेगवेगळे विषय, नानाविध आवडी- निवडी यांच्याबद्दल आधी बोला. एकदम कोण कुठे राहते आणि घरी कोण आहेत, काय काम करता? ही डिटेक्टिव्हगिरी करायला कशाला जायचं? लोकांना त्यांच्या कामावरून जोडणार की काय आपण? की राहण्याच्या ठिकाणावरून? मनातलं बोलायला मैत्री करायची असेल, तर ती वेगवेगळ्या विषयांवर शेअरिंग वाढवूनच होऊ शकते. दुसऱ्या अनोळखी व्यक्तीला एकदम आपल्या भावनांचे ‘डस्टबिन’ कशाला करायला जायचं? ते ऐकून कोणी तुम्हाला तिथेच वाटेला लावून देणार कशावरून? कोणी जरावेळ समजून घेणारं भेटलं तरी त्यांची लगेच आणि ठोस मदत मन हलकं होण्यापलीकडे होणार नाही. आपल्या खऱ्या आयुष्यात आधी आधार शोधायला हवाय. तो सगळ्यांत महत्त्वाचा असतो. घरात, जवळच्या नातेवाइकांत मिळाला तर उत्तमच. नाहीतर, शेअरिंग वाढवायला पर्याय नाही. तसं केलं नाही तर जवळच्या मित्र-मैत्रिणींपासून ते अनोळखी लोकांपर्यंत ‘लास्ट सीन’ची नवी कटकटच आपल्यामागे लागते. या ‘लास्ट सीन’मध्ये किती अडकायचं हे एकदा लास्टचे ठरवूनच टाका बघू...

 
रिप्लाय करायला वेळ नाही?कदाचित काही अर्धसत्यदेखील घटना असतात. म्हणजे मेसेज गेला पण व्हॉट्सअ‍ॅपवर तो समोरच्याला उघडलाच नाही. तुम्ही म्हणू शकता, मेसेज पाठवला. समोरची म्हणू शकते, ‘हो, पण टेकिंग टाईम टू ओपन असं अडकलं आहे ते. मला अजून वाचताच आलेलं नाही’. किंवा काही अडचणीत असेल, मेसेज नुकताच वाचून नेट/ रेंज नसलेल्या भागात काही तास कामाला गेलेली असेल. देऊ उत्तर नंतर हक्काची व्यक्ती आहे म्हणून देखील कंटाळा केला असेल. प्रत्यक्ष फोन करून बोलू असं वाटलं असेल. जरा धीर धरणार की नाही? की लगेच गैरसमजाचे पतंग उडवणं सुरू! आपल्याकडून ही हुरहुर, तर समोरच्याला वाटत असतं आपल्याच मागे कुणी लागलं आहे. पण तुम्ही कोण की तुमच्या मागे कुणी लागावं? हे प्रश्नच अनेकांना अशावेळी पडत नाहीत. लगेच आक्रस्ताळेपणा, चार लोकांत थट्टा, चर्चा सुरू होते.- प्राची पाठकprachi333@hotmail.com( मनमोकळं जगण्याचा ध्यास असलेली प्राची मानसशास्त्रात सुवर्णपदक विजेती आहेच, शिवाय सूक्ष्मजीवशास्त्राची तज्ज्ञ आणि पर्यावरणाची अभ्यासक आहे.)