- श्रुती साठे
एकाच रंगाच्या, अनेक छटांचा हा कुठला ट्रेण्ड?शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांनी नुकतंच एका मॅगझीनसाठी फोटो शूट केले. त्यात मोनोक्रॉम रंगसंगतीला पसंती दिलेली दिसते. शाहीदचे ब्लॅक आणि व्हाइट पोलका डॉट ब्लेझर आणि मीराचा ब्लॅक टॉप आणि ब्लॅक अॅण्ड व्हाइट प्रिंटेड लाउंज पॅण्ट हा लूक अतिशय क्लासी दिसला.काय आहे हा नवा ट्रेण्ड?
खरं तर ट्रेण्ड नवा नाही, जुनाच आहे. ट्रेण्डी राहण्यासाठी नेहमीच खिसा हलका करावा लागतो हा गैरसमज आहे. ट्रेण्ड काय आहे याचा अभ्यास करून, आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या कपड्यांचं कसं कॉम्बिनेशन करता येईल, कसा उठावदार लूक आणता येईल यासाठी थोडासा वेळ जरी दिला तरी अनावश्यक खरेदी आणि त्यापायी होणारा खर्च टळू शकतो.आता हा ट्रेण्ड काय सांगतो, एकाच रंगांचे टॉप्स, स्कर्ट, पॅण्ट, जॅकेट, स्टोल, ज्वेलरी आणि फुटवेअर यांची छान सांगड घाला. ते घाला. फक्त रंगाच्या शेड्सचं भान ठेवणं गरजेचं आहे.आत्तापर्यंत काळ्या टॉपबरोबर घालायला एखादा कॉण्ट्रास्ट स्कर्ट किंवा पॅण्ट आपण शोधायचो; पण आता कॉण्ट्रास्ट ट्रेण्डला मागे टाकत मोनोक्रोमने डोकं वर काढलंय. मोनोक्रॉम म्हणजे एकाच रंगाच्या विविध छटा वापरून केलेली रंगसंगती. बहुतांशी मोनोक्र ोमचे प्रयोग ग्रेस्केल (करड्या) मध्ये केले जातात. करड्याची सगळ्यात गडद असलेली काळी छटा आणि सगळ्यात फिका असलेला पांढरा रंग वापरून लूक तयार केला जातो. हे ब्लॅक आणि व्हाइटचे मोनोक्रोम कॉम्बिनेशन अतिशय मॅच्युअर आणि क्लासी दिसते.मोनोक्र ोम हे फक्त ब्लॅक आणि व्हाइटपुरते मर्यादित न राहता कुठल्याही रंगात सुंदर दिसते, हे सूर नवा ध्यास नवाच्या शाल्मलीने दाखवून दिले. तिने अतिशय सुरेखरीत्या केलेल्या पिवळ्या रंगाचा वापर मोहक होता. मस्टर्ड येलो मधला श्रग, पॅण्ट, क्र ॉप टॉप आणि थोडे गडद सॅण्डल्स स्मार्ट लूक देऊन गेले.sa.shruti@gmail.com