- ऑक्सिजन टीम
पाऊस आता चांगलाच झाला.आता पावसाळी कविता, भजी-समोसे, रंग-गंध आणि पावसाळी फॅशन अर्थात मान्सून फॅशनसंदर्भात बोलायला हरकत नाही. कारण आता खर्या अर्थानं वाटतं की पावसाळा जगून घ्यावा. खरंय, पावसाळे जगायचेच असतात, नुस्ते मी अमुक एवढे पावसाळे पाहिले असं म्हणण्याला काहीही अर्थ नसतो. त्या प्रत्येक पावसाळ्यात आपण किती जगलो हे महत्त्वाचं असतं. तसं आपण करतो का, हा प्रश्न आहे. फॅशनच्या लेखात फिलॉसॉफी का घुसवली जातेय असं विचारू नका, कारण फॅशनमध्येही फिलॉसॉफी असतेच. आपल्या व्यक्तिमत्त्वाचं, आपल्या जगण्याच्या अॅटिटय़ूडचं आणि आपण ऋतूंचं कसं स्वागत करतो याचं स्टेटमेण्टही असतं.रोज कपडे घालताना हे आपल्या लक्षातही येत नाही की आपण आपल्या मूडप्रमाणे कपडय़ांची निवड करतो. आपण गरीब आहोत की श्रीमंत आणि कपडय़ांचे चार जोड आहेत की चाळीस याच्याशी त्याचा अजिबात संबंध नसतो. त्याचा संबंध असतो आपल्या मूडशी, आपल्या स्वतर्कडे पाहण्याच्या दृष्टीशी आणि जगाला आपण कसं सामोरं जातो त्या नजरेशीही.त्यामुळे या पावसाळ्यात जर आपल्या मनातच मळभ असेल तर आपण कसेही काळ्याकरडय़ा रंगाचे, जेमतेम विटकेचिटके, जुनाट कपडे घालू, नव्या कपडय़ातही अगदीच फिके रंग निवडू आणि अजिबात टापटीप न वाटता घराबाहेर पडू. त्यासोबत स्वतर्ला असं सांगू की, पावसाळाच तर आहे, सगळा चिकचिकाट, कशाला पाहिजे चांगले कपडे; पण ती नुस्ती मलमपट्टी असते, कारण आपल्याला आत्मविश्वास नसतो, आपला मूड बरा नसतो.मुद्दा मूडप्रमाणे कपडे घालण्यापेक्षा आपला मूड, लूक, स्टाइल मस्त उजळवून टाकेल असे कपडे घालणं उत्तम. पावसाळ्यात तर ते अधिक करावं कारण नवीन सुरुवात असते, कॉलेजची आणि वर्षातल्या नव्या सहामाहीचीही. पुढे येणार्या विविध सण-महोत्सवांचीही. तर यंदाच्या पावसाळ्यात खिशाला अजिबात त्रास न देता तुम्ही आपला ‘मान्सून लूक’ कसा घडवू शकता आणि कसे हटके दिसू शकता यासाठी विविध डिझायनर आणि मेकअप आर्टिस्टने दिलेली ही यादी वाचा.ते सगळंच करा असं नाही, पण त्यातून स्वतर्साठी एक परफेक्ट यादी तर निवडा, आणि मग तुम्हाला आपलं स्टेटमेण्ट घडवता येईल!पाऊस मनातही झिरपला पाहिजे, जगून घेत मन भरलं पाहिजे आणि नव्या सकस विचारांची, उमेदीची बीजं त्यात रुजली पाहिजे, त्यासाठी आपल्या बाह्यरूपाचीही मदत झाली तर का नाकारायची. उलट सार्या धरतीनं आपलं रूप पालटलेलं असताना आपण तरी का जुनाट, बोअरिंग, काळवंडलेल्या रंगरूपात पावसाची सोबत मागायची.आपणही जरा उजळू आपले रंगरूप.नव्या बहारदार रंगांनी!*****पावसाळ्यात ‘देसी’ ग्लॅमरस लूक हवाय?
पाऊस आला म्हणून लगेच काही शॉर्ट पॅण्ट घालून गावोगावी मुली कॉलेजात जात नाहीत. आपण अंगभरच कपडे घालतो. जिन्स कशीबशी घालायला मिळाली तरी स्वतर्ला (उगीचच) मॉडर्न समजतो अशी अनेक ठिकाणी अवस्था असते. त्यामुळे आपल्या लूकचं ‘देसी’पण ग्लॅमरस कसं करता येईल, याचा या मॉन्सूनलूकमध्ये जरूर प्रयत्न करा.
1. तुमच्या जुन्या सलवार, पटियाला यांना काही दिवस कपाटात बंद करून ठेवा. जिन्स कितीही आवडत असली तरी ती अजिबात घालू नका. एक तर हे सारं ओलं होतं आणि वाळत लवकर नाही, त्यामुळे त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे सलवार, पटियाला, जिन्स वापरू नकाच.2. मोठमोठे दुपट्टे, सिंथेटिक दुपट्टे अजिबात वापरू नका, त्यामुळे पावसाळी अजागळ लूक येतो.3. त्याऐवजी स्टोल किंवा मोठे स्कार्फ वापरा. छान रंगबिरंगी, ब्राइट कलरचे स्टोल किंवा स्कार्फ तुमचा लूकच बदलून टाकतील. ड्रेस नेहमीचाच असला तरी हे रंगीत स्टोल त्याला नवी चमक देतात.4. या पावसाळ्यात शक्यतो शॉर्ट कुर्ती घाला. शॉर्ट बाह्यांची. त्यासोबत चुडीदार.पूर्वी सिनेमात नायिका असे कुर्ते, चुडीदार, त्यावर स्टोल असं वापरत. मस्त रंगबिरंगी, कॉण्ट्रा फॅशन, प्लेन किंवा प्रिंटेट कॉम्बिनेशन यात वापरणं उत्तम.5. शक्यतो फ्लोरल प्रिंट निवडा. बारीक फुलाफुलांचे प्रिंट उत्तम. त्याला प्लेन बोल्ड कलरची जोड देता येईल.6. अॅँकल लेन्थ म्हणजेच घोटय़ार्पयतचे स्कर्ट आणि त्यावर टी-शर्ट घालणं किंवा टय़ुनिक्स घालणं फार देखणं दिसतं.7. टय़ुनिक्स आणि मॉन्सून हे सध्या एकदम हिट कॉम्बिनेशन आहे.8. क्रॉप टॉप, टी-शर्टही स्कर्टवर घालता येतील. तुम्हाला गुडघ्यार्पयतचे स्कर्ट घालायची सवय असेल तर स्ट्रेट फिट स्कर्ट जरुर वापरता येतील.9. एवढंही करून चुडीदार-कुर्ता, सलवार-कुर्ताच वापरणार असाल तर कॉटनचेच कपडे निवडा. सिंथेटिक नको. ते पावसाळ्यात अंगाला चिकटतात, अनेकदा प्रवासात असे कपडे वाइट दिसतात.10) आपल्या मूळ कपडय़ात काहीच बदल करायचा नसेल तर एक साधंसं जॅकेट घालूनही लूक बदलता येतो. जिन्सचं जॅकेट किंवा एम्ब्रॉयडरी केलेलं जॅकेट, बॉम्बर जॅकेटही वापरता येईल.11) धोती पॅण्ट हा आणखी एक नवा ऑप्शन आहे. नेहमीच्या कुत्र्यासह धोती पॅण्ट उत्तम दिसते.12) उत्तम रेनकोटही घ्या. चांगला रेनकोट हा आपलं फॅशन स्टेटमेंट ठरू शकतो असा विचार आपण करत नाही; पण ते खरं आहे.
पावसाळ्यात आणि साडी?
पावसाळ्यात कुणी साडी नेसतं का? असा प्रश्न पडला असेल तर तुम्हाला लेटेस्ट ट्रेण्ड माहितीच नाही. सध्या पावसाळ्यात साडीचा फुल रोमॅण्टिक मूड ट्रेण्ड आहे. रोज रोज साडी नेसता येणार नसेल तर विविध पूजा, समारंभ यासाठी साडी नेसली जातेच. ती टिपिकल पद्धतीनं न नेसता त्यात प्रयोग केला तर मान्सून साडी आपली गाडी फुल रोमॅण्टिक पटरीवर घेऊन जाते. त्यासाठी.1) पावसाळ्यात नेसायला बोल्ड कलर म्हणजे पिवळी, लाल, निळी, तांबडी अशा रंगाची कॉटनची साडी निवडा. शक्यतो प्लेन किंवा मग भौमोतिक प्रिंटची किंवा फ्लोरल प्रिंटची.2. साडीवर लांब पायघोळ जॅकेट घालता येईल.3. ओव्हरसाइज देखणं स्वेटर घालता येईल. 4. डेनिमचं किंवा एखादं कॉटनचं एम्ब्रॉयडरी केलेलं जॅकेट घालणंही उत्तम दिसतं.5. फार पारंपरिक कार्यक्रम असेल तर मांगटिका, मोठे कानातलेही उत्तम दिसतील.
हातात बांगडय़ा भरपूर
पावसाळ्यात ( खरं तर कधीही) शक्यतो भरमसाठ दागिने घालूच नयेत; पावसाळ्यात तर अजिबात नाही.मात्र त्याला अपवाद बांगडय़ा.1. तुम्हाला भरपूर बांगडय़ा घालायला आवडत असतील तर रंगीत, बहुरंगी, अनेक रंगांच्या बांगडय़ा तुम्ही एकाच वेळी हातात घाला. तुमचा मॉन्सून लूक या एकाच कृतीनं पूर्ण होऊ शकतो.2. ब्रेसलेट, मोठं कडं, मोठय़ा घाटाच्या पाटल्यावजा बांगडय़ाही घालता येऊ शकतात. अट एकच, त्या सोनेरी, चंदेरी नाही तर रंगीत असाव्यात.3. कानातलेही मेटलचे पारंपरिक न वापरता सरळ क्रोशाचे, क्वचित क्लिलिंगचे वापरून पाहा.
**********
परफेक्ट मान्सून लूक हवाय,हें ट्राय करून पाहा.
आपला मूड उत्तम ठेवायचा असेल आणि पावसाळा समरसून जगायचा असेल तर मान्सून लूक जरा आपणही आपला घडवायला हवा. त्यासाठी ही एक यादी. यातलं सगळंच सगळ्यांना जमेल असं नाही; पण त्यातल्या काही ट्रिक्स वापरून एक खास लूक स्वतर्साठी डिझाइन करता येऊ शकतो.1. पावसाळ्यात बोल्ड व्हा. म्हणजे बोल्ड कलर्स वापरा. पिवळा, लाल, गुलाबी, निळा या चार रंगात तुम्हाला जेवढय़ा वॉर्म शेड्स मिळतील त्या वापरणं म्हणजे बोल्ड होणं.2.मुलींच्याच नाही तर मुलांच्याही टी-शर्टमध्ये सध्या अनेक निऑन शर्ट उपलब्ध आहेत. फार काही विचार न करता हे निऑन शर्ट नक्की वापरता येतील.3. केप्रीजमध्येही अनेक ब्राइट प्रिंटेड पर्याय युिनसेक्स स्वरूपातही उपलब्ध आहेत, ते वापरणंही चांगलं दिसतं.4) बाजारात अनेक रंगीत विंडचिटर, रेनकोट मिळतात. बाकी कपडे तेच; पण हे रंगीत रेनकोट अत्यंत फॅशनेबल लूकही देऊ शकतात.5. शक्यतो जिमवेअरही कलरफुल, व्हायब्रण्ट घ्या. त्यामुळे जिमला जावंसं तर वाटेलच, व्यायाम केल्यानं फ्रेशही वाटेल.6) कॉटन शर्ट्स, कॉटन पॅण्ट हा सगळ्यात सेफ आणि उत्तम पर्याय.7) राउण्ड नेक, पोलो नेक शर्ट तर एकदम ट्रेण्डी.8) ब्लॅक स्पोर्ट शूज तर हमखास यशस्वी लूक देतात.9) श्रग्ज वापरणं सगळ्यात मोठं स्टेटमेण्ट ठरावं, कारण हे श्रग्ज तुमचा लूकच बदलून टाकतात.10) छान फ्लोइ, फुलापानांच्या प्रिंटचे कपडे, चपला, बॅगा, सॅक, कानातले वापरणं कधीही छान. ****‘हे’नको!
मुलींसाठी
1) पावसाळ्यात जिन्स अजिबात वापरू नका. पलाझो, मॅक्सी ड्रेस, पायघोळ लांब अनारकली ड्रेस हे सारंही न वापरणं उत्तम.2. हिल्स अजिबात वापरू नयेत.3. सलवार, पटियाला, दुपट्टा वापरू नये.4. लेदर बॅग्ज वापरणं चूकच.5. वूडनचे, मेटलचे, खडय़ांचे दागिने अजिबात वापरू नयेत. 6. कपडे, साडय़ा निवडतानाही जॉर्जेट, चंदेरी, सिंथेटिक, मिक्स पॉलिस्टर असे कापड निवडू नये.7. ट्रान्सपरण्ट, पातळ पोताचे कपडे वापरू नयेत.8. केस मोकळे सोडू नयेत.9) खूप भडक मेकअप करू नये, तो विचित्र दिसतो.10) खूप काळ ओले राहील असे कापड निवडू नये.
मुलांसाठी
1. जिन्स तरुण मुलांनीही पावसाळ्यात वापरू नये. त्या लवकर वाळत नाहीत. त्याऐवजी कॉटन पॅण्ट्स, कॅप्री, थ्री फोर्थ वापरणं उत्तम.2. अंगाला चिकटणारे टाइट टी-शर्ट वापरू नये.3. गॉगल शक्यतो वापरू नये. ****
हाय रे जुता
पावसाळी चपला या विषयाला आपण फारच कमी महत्त्व देतो. खरं पाहता चालायला दणकट, पायात मजबूत, स्लिप न होणार्या, चपचप आवाज न करणार्या चपला ही महत्त्वाची गोष्ट असते. त्यासोबतच त्या पायात दिसतात कशा याकडेही लक्ष दिलं जातं. स्टाइल आणि कम्फर्ट याचा उत्तम मेळ साधला गेला तर पाय पावसाळ्यात दुखत नाहीत.त्यासाठी.1. उत्तम स्निकर्स बाजारात सध्या मिळतात. त्यात रंगही भरपूर आहेत. ते वापरा.2. बूट घालायचेच असतील तर जुन्या काळ्या गमबूटचे अनेक रंगीत पर्याय आहेत, अगदी गुडघ्यार्पयतचे बूट मिळतात. त्यातलं काही वापरून बघा.3. स्पोर्ट शूट वापरणं तर कायम उत्तम.4. शक्यतो स्लिपर वापरू नये, प्लॅस्टिक चपला वापरू नयेत, त्यानं पाय दुखावतात, टाचा दुखण्याचीही तक्रार वाढते.