शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

स्मुदी

By admin | Published: October 06, 2016 5:21 PM

तरुण मुला-मुलींच्या जगात कपडे आणि स्टाईल्सचेच नाही, तर खाण्यापिण्याचेही ट्रेण्ड्स येतात..सध्या एका पेयाची अशीच क्रेझ आहे..

- अवनी साठे
 
तरुण जगण्यात फॅशन्सचे ट्रेण्ड्स येतात तसेच खाण्यापिण्याचे नवनवीन ट्रेंड्स येत असतात. आणि प्रयोग करून पाहिले नाहीत तरी अनेकजण असे फॅशनेबल ट्रेण्ड्स एकमेकांना ट्राय करायला सांगत असतात. त्याचे प्रयोगही मग घराघरात सुरू होतात.
 
हल्ली जमाना आहे स्मुदीचा. 
आरोग्याबद्दल जागरूक असणारे अनेक लोक, अर्थात तरुणही हल्ली स्मुदीबद्दल बोलत असतात. ‘इट फ्रेश’ हा आजच्या खाद्यसंस्कृतीचा नारा आहे. ताजी फळं, भाज्या जशा आहेत तशा खा असं हल्ली अनेक आहारतज्ज्ञ सांगत असतात. फळं चिरून खाण्यापेक्षा तशीच थेट खा. भाज्या शिजवण्याआधी फार काळ चिरून ठेवू नका. तसं केल्यामुळे फळं आणि भाज्यांमधली जीवनसत्व नष्ट होतात अशी बरीच (आणि खरंतर चांगली) माहिती हल्ली व्हॉट्सअ‍ॅपवरही घरपोच येते. त्यामुळे बरेच जण खाण्या-पिण्याबाबत जागरूकही होताना दिसताहेत.
या सगळ्या विचारांचाच पुढचा धागा आहे ही स्मुदी.
एकाच वेळी शरीरात फळं, भाज्या आणि इतर आवश्यक घटक एकदम जावेत यासाठी स्मुदीसारखा सोपा उपाय नाही. शिवाय स्मुदी पोटभरीच्या असतात. 
सकाळी एक ग्लासभर स्मुदी प्यायली की पुढचे दोन तीन तास पोटाची तक्र ार नसते. सारखी खा खा होत नाही. शरीराला सगळी पोषक मूल्ये तर मिळतातच पण डी टोक्सिंगसाठी चांगलं म्हणूनही स्मुदीचा चांगला उपयोग आहे, असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. शिवाय या स्मुदीमध्ये फळं असल्यानं वरून साखरेची गरज नसते. म्हणजे अतिरिक्त साखर पोटात जात नाही. पोटभरीचा आणि शुगरलेस प्रकार असल्यामुळेही तो सध्या तरुण- तरुणींच्या जगात अतिशय प्रसिद्ध झाला आहे.
सकाळी उठल्यावर पहिल्यांदा चहा नाहीतर कॉफी पिण्यापेक्षा अनेक जण स्मुदी पितात. स्मुदीमुळे सकाळी पोट व्यवस्थित भरतं. अन्नपचन व्हायला मदत होते. मुख्य म्हणजे वेळ नाही, नाश्ताच केला नाही अशी सबब उरत नाही आणि उपाशी पोटी कामं करावी लागत नाही. आणि घरच्यांनाही भल्या सकाळी आपल्यासाठी नाश्ता म्हणून खूप काही करत बसावं लागत नाही.
त्यामुळे अनेकांना सध्या हे स्मुदी प्रकरण भयंकर हवंहवंसं वाटतं आहे. जिभेला आणि पोटाला बरं असं हे कॉम्बिनेशन आहे.
सगळ्यांनाच आवडेल असं नसतंच काही. पण अनेक तरुण मुलंमुली क्रेझ म्हणून असे पदार्थ करून पाहतात. आपला फिटनेस सांभाळायचा म्हणून आणि चेहऱ्यावरच्या ग्लोसाठी म्हणूनही बिंधास्त या नव्या गोष्टी ट्राय करतात.
त्याचे फोटो समाजमाध्यमात शेअर करतात. त्यावर लाइक कमावतात आणि आपल्या आनंदाची वाटही जरा स्मूद करून घेतात, यानिमित्तानं!
नाहीतर लाटा येतंच असतात. 
टर्मरीक लाट्टे नावाची अशीच एक लाट, अमेरिकेतली. दुकानात तयारही मिळतं हे पेय तिथं.
म्हणजे काय तर हळद घातलेलं पिवळं दूध.
आपण एरवी पितो का?
पण तिकडं लाट आली तर आता बघा काही दिवसात आपल्याकडेही अनेकजण हळददूध पिऊन पाहतील..
फॅशन नावाचं चक्र खाण्यापिण्याच्या दुनियेतही शिरलं आहेच..
 
आता हे स्मुदी प्रकरण घरी करायचं कसं असा प्रश्न अनेकांना पडला असेलच. सध्या हिट ठरलेल्या स्मुदीच्या या काही रेसिपी..
खरं म्हणजे स्मुदी तुम्ही कशाचीही बनवू शकतात. ही फक्त काही उदाहरणं..
 
पालक केळ्याची ग्रीन स्मुदी
(एका माणसासाठी)
पालकाची ३-४ ताजी पानं, १ केळ, तुळशीची ३-४ पानं, कडीपत्ता, पुदिन्याची पानं, चिमुटभर सैंधव, मिरपूड, दालचिनी पावडर, हळद हे सगळे पदार्थ एकत्र करून मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून चांगलं गुळगुळीत वाटून घ्यायचं आणि प्यायचं..
 
रेड स्मुदी
(एका माणसासाठी)
कुठल्याही लाल पालेभाजीची ३-४ पानं, २-३ स्ट्रॉबेरी, तुळशीची ३-४ पानं, पुदिना पाने, चिमुटभर मीठ, मीरपूड, दालचिनी, हळद सर्व एकत्र वाटून पिणे.
आवडत असल्यास त्यात बाजारात मिळणारं बदामाचं किंवा सोया दूध घालता येतं. 
 
अननस, आंबा स्मुदी
अननस आणि आंबा प्रत्येकी १वाटी, अर्धी वाटी शहाळ्याचं पाणी किंवा बाजारात मिळणारं बदामाचं दूध, किंचित मीठ, मीरपूड, आवडत असल्यास तुळशीची ३-४ पानं एकत्र वाटली की स्मुदी तयार!
 
स्मुदीचे फायदे काय?
* रोज पोटात फळं आणि कच्च्या भाज्या जातात.
* वेळ वाचतो. पोट भरते.
* कॉलेजला जाताना/आल्यावर तेच तेच पदार्थ खायचा कंटाळा आला असेल तर स्मुदी हा बेस्ट पर्याय आहे.
* नास्त्याला तेलकट, तळणीचं आणि वजन वाढवणारे पदार्थ खाण्यापेक्षा स्मुदी प्याव्यात. वजन कमी करणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय.
* अन्नपचनाचा किंवा पित्ताचा त्रास असणाऱ्यांना स्मुदीचा फायदा होतो.
* चवीला छान असतात. रोज नवीन चवीची स्मुदी करून आठवड्याचं झक्कास शेड्यूल तयार करता येऊ शकत.
*उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी अघोरी डाएट करून काहीही होत नाही. उपासमारीने कमी होणाऱ्या वजनामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. पण स्मुदीमुळे पोट तर भरतंच, पण वजन आटोक्यात राहायलाही मदत मिळू शकते.
* एनर्जी मिळते आणि दिवसभर छान टवटवीत वाटतं.
 
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत)