शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

व्हाया मुंबई आयआयटी खरगपूर

By admin | Published: June 22, 2017 10:00 AM

दहावीत असताना आयुष्यात पुढे काहीतरी मोठं करायचं एवढाच विचार मनात होता. वाशीम जिल्ह्यातील शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या कारंजा (लाड) तालुक्यात लहानपणापासून शिकलो होतो

 - धीरज केशवराव चौधरी

दहावीत असताना आयुष्यात पुढे काहीतरी मोठं करायचं एवढाच विचार मनात होता. वाशीम जिल्ह्यातील शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या कारंजा (लाड) तालुक्यात लहानपणापासून शिकलो होतो म्हणून आपला बेस पक्का आहे, अशी खात्री होती. आपल्या भागातल्या फारच कमी लोकांनी यश मिळवले म्हणून ‘आयआयटी’ची तयारी करण्याचा आव्हानात्मक निर्णय घेतला. घरून असलेल्या पूर्ण स्वातंत्र्यामुळे पुढचा प्रवास स्वत:च ठरवायचा होता. आणि ठरलं, मुंबई गाठायची!दहावीची परीक्षा संपताच मुंबईच्या एका नवीन क्लासने सहा दिवसांचा कॅम्प घेतला होता आणि आठवीत एनटीएसईमध्ये मिळवलेल्या यशामुळे अकरावी, बारावीची फी पण माफ केली होती. पहिल्यांदाच मी मुंबईला एकटा गेलो. स्वत:च्या सुरक्षेसाठी आणि आपला उद्देश लक्षात घेऊन काही नियम मनाशी पक्के बांधून घर सोडलं. स्वप्नांच्या मायानगरीत असं काय विशेष वारं वाहतं हे अनुभवायला माझा प्रवास सुरू झाला.अ‍ॅडमिशन पक्की होईपर्यंत क्लासवाल्यांनी अनेक झुठे वादे केले. पण कोचिंग सोडून राहण्या-खाण्याची व्यवस्था, जाणं-येणं, हॉस्टेल, केअर-टेकर अशा गोष्टींची सोय दूरदूरपर्यंत नव्हती. सुरु वातीच्या काळात १-२ तास प्रवासातच जायचे. सगळं ठरवून, कधीतरी, संपूर्ण कुटुंबासोबत प्रवास करणाऱ्या मला आता रोज धावत, ठरलेल्या वेळेची लोकल पकडावी लागायची. सोबत राहायला माझ्याचसारखी अजून ५-७ मुलं होती. यश मिळवण्याची जिद्द मनात होतीच. किराणा, स्वयंपाक, घरभाडे, कधी अचानक रूम शिफ्ट करणं असं सगळं आम्हालाच बघावं लागत होतं. घरी या सगळ्या गोष्टी सांगून फायदा नव्हता. आपला निर्णय आपल्यालाच सार्थ ठरवायचा होता.दिवसागणिक हवेतली जादू तर नाही पण लोकांची मेहनत मात्र दिसायला लागली. इथं कॉम्पिटिशन अफाट होती.बेस पक्का असल्यामुळे मराठी आणि इंग्रजीविषयी न्यूनगंड नव्हता. हिंदीची काळजी नव्हती. ते खरंच आहे की, प्रवास जेवढा खडतर असतो तेवढी यशाची मजा पण जास्त येते. नवनवीन लोकं भेटत होती. कॉलेज, मित्र-मैत्रिणी, मज्जा, खेळ या सगळ्यांचा समतोल साधूनही अभ्यास करता येतो, तोही अधिक चांगल्या पद्धतीने हे कळलं. एक सर्वसामान्य शेड्युलच आपण फॉलो केलं पाहिजे हा समज दूर होऊन सेल्फ असेसमेंट करून आपल्यानुसार आपली कार्यपद्धती ठरवायची हे लक्षात आलं. वाईट स्वप्नातही नाही दिसणार एवढी गरिबी बघितली मुंबईच्या रस्त्यांवर, तर दुसरीकडे नजरेतही नाही मावणार एवढी श्रीमंतीपण पाहिली!आपल्या स्वप्नांचे पारडे आपल्या समस्यांपेक्षा जड करून ठेवले की मार्ग आपोआपच निघतात हे मुंबईच्या धावत्या आयुष्याने शिकवलं. पहिल्यांदाच भारताच्या विविध भागांतून आलेल्या लोकांशी माझा संपर्क, संवाद झाला. आपला कम्फर्ट झोन सोडून नवीन प्रांतात, नवीन लोकांत, भाषा येत नसताना, धड इंग्रजीही नाही आणि धड हिंदीही नाही, एकटे-दुकटे येऊन छोटी छोटी (समाजासाठी) कामं करणारी अनेक मंडळी मी दुरूनच पाहत होतो. अभ्यासासाठी एक चांगला मित्रांचा ग्रुप बनला. त्या कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीच्या अभ्यासाने, मौजेने, स्पर्धेने घरापासून एवढे दूर राहूनही जास्तीत जास्त काळासाठी मन रमलेलं असायचं. तरीही संध्याकाळी घरची आठवण यायचीच. एफबी, व्हॉट्सअ‍ॅप डिस्ट्रॅक्शन नको होतं म्हणून सोबत कुणाची नव्हतीच, इतरही कुठली मनोरंजनाची साधनं नव्हती.मुंबईत अपॉर्च्युनिटी तो है बॉस म्हणत स्ट्रगललाच आपला ‘आॅक्सिजन’ बनवलेल्या लोकांची फौजच दिसली मला ! ते चित्र नेहमीचंच माझ्या मनात कोरलेलं राहील. तरीही त्या धकाधकीच्या मुंबईत अजून न राहण्याचा निर्णय मी माझ्या दोन वर्षाच्या वास्तव्यानंतर घेतला. म्हणून आज भारतातल्या सगळ्यात जुन्या व मोठ्या आयआयटी खरगपूर येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायला गेलो. आज तिथं इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षात पदार्पण करतोय.इथून निघाल्यावर पुन्हा मुंबईने बोलावले तर नक्की जाईन. नवीन स्वप्नांची नवीन कहाणी पूर्ण करायला !