पर्यावरण दिन नुकताच जगभर साजरा झाला. सगळ्यांनी एकत्र येऊन निसर्गावर माया करणं, त्याच्याशी दोस्ती करणं हे आता गरजेचं झालं आहे.
तसाच एक प्रयत्न केला बिरादरी कल्याण -डोंबिवली आणि मिड अर्थ या दोन संस्थांमधल्या तरुण मुलांनी. त्यांनी एक छोटेखानी कार्यक्रम केला, त्याचं नाव ‘लेट्स टॉक अबाऊट नेचर’. यानिमित्तानं ते वेगवेगळ्या शाळा कॉलेजात गेले. तिथल्या दोस्तांना त्यांनी निसर्गातल्या गमतीजमती सांगितल्या. काही इकोटीप्स दिल्या. सापांविषयीच्या गैरसमजुती दूर व्हाव्यात म्हणून कार्यक्रम केला. वाशिंदमधल्या सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालयातही असाच एक कार्यक्रम केला.
लहान वयात जर निसर्गाची गोडी लागली, निसर्गस्नेही लाईफस्टाइल जर आपण स्वीकारली तर अनेक गोष्टी आपोआप सवयीच्या होतील. अंगी मुरतील. शिस्त अंगी बाणवेल आणि निसर्गाचा र्हास न करता उलट त्याच्याशी दोस्ती करत आपल्याला जगता येईल का, हा या उपक्रमाचा प्रयत्न. निसर्गाविषयी या गप्पा शाळाशाळांमध्ये अशाच रंगल्या तर अजून काय हवं?
- सुदिप्त पात्रा
नॅचरल दोस्ती
पर्यावरणाच्या संदर्भातले लेर्स बोअरच होतात हे खरंय, पण इतरांनी काही सांगत बसण्यापेक्षा आपणच आपली लाइफस्टाइल बदलली तर? स्वत:हून काही पर्यावरणपूरक अर्थात नेचरफ्रेण्डली काम केलं तर? ते तुम्ही करत असाल तर नक्की लिहा? फार मोठं ना सही, पण मनापासून केलेली एखादी छोटी कृती, एखादा छोटा बदल आणि त्याचा फायदा, ग्रुपनं एकत्र येऊन केलेले काही उपक्रम, हे सारं लिहा आणि पाठवा आम्हाला. पाकिटावर ‘नॅचरल दोस्ती’ असा उल्लेख करायला विसरू नका.